ती जिंकली...भाग 3 अंतिम

Be positive
ती जिंकली...भाग 3 अंतिम

त्यानंतर अकरावीला सायन्स घेऊन तिने तिचा पुढचा अभ्यास सुरू केला.
खरंतर हे सगळं सोपं नव्हत कारण मनस्ताप घडवून आणणारी हि घटना होती.
याचा तिला प्रचंड मानसिक त्रास झाला.
किती तरी महिने लोक पैशासाठी यायचे. नको नको ते बोलायचे. काही जण तर निराली वर घाणेरडी नजर टाकायचे आणि त्यातल्या त्यात भर म्हणजे शेजारी.
शेजारी घालुन पाडून बोलायचे.

"तुझे बाबा नाही आहेत. आता काय करणार. तुझं शिक्षण कसं पुर्ण होणार?" 

"ह... हि काय शिकणार आता. शिक्षणाला पैसा लागतो, तो आहे का हिच्या आई जवळ."

शेजारी नको नको ते बोलायचे आणि ती निमुटपणे ऐकायची, ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता.

वडिलांनी केलेली चुक, भुगतान मात्र यांना कराव लागल.
शेजा-याच्या बोलण्याने निरालीला मात्र जिद्द चढली.

तिने बारावीला खुप अभ्यास केला.
सगळ्याचं बोलणं ऐकायची, टोमणे ऐकायची. ते सगळं मनातल्या एका कप्प्यात साठवून ती जिद्दीने पेटली होती. 

आईची दगदग, भावाची घुसमट, सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होती.

तेव्हाच तिने मनाशी ठरवलं आपण काहीतरी करून दाखवायचं.

बारावीला सत्याऐनशी टक्के मार्क मिळवले.
तिला लहानपणापासून डॉक्टर बनण्याची खुप इच्छा होती.
इन्ट्रान्स एक्साम दिली त्यात चांगल्या मार्काने पास झाली.

तिला मेडिकलला ॲडमिशन मिळाली. एजुकेशन लोन घेऊन तिने तिचं शिक्षण पुर्ण केलं आणि तिला जॉबही मिळाला.

लहान भाऊ पण शिकुन इंजीनियर झाला.


खांद्यावर कुणाच्या तरी स्पर्शाने निराली आठवणीतून बाहेर आली.

डोळे पाण्याने डबडबलेले होते.
डोळे पुसून मागे वळली तर सुशांत उभा होता.

ती काहीही न बोलता सुशांतला सगळं कळलं आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं.

निराली खुप ढसाढसा रडली, मनातल्या एका कोप-यात साठवलेल दु:ख आज बाहेर आलं.

बाईला एक मिठी पुरी असते सगळं दु:ख  विसरायला. तसंच निरालीचही झालं.
शेजा-यांनी त्यांची भुमिका निभावली.
निंदा करणे, टोमणे मारणे वगैरे.

पण त्यामुळे निरालीचं आयुष्य सुखमय झालं म्हणुन म्हणतात ना 

"निंदकाचे घर असावे शेजारी.."


पण यात नाण्याच्या दोन बाजू आहेत.

निगेटिव्हीटी आणि
पॉझिटिव्हीटी


निरालीने पॉझिटीव्ह घेतलं म्हणुन ती आज सक्सेसफुल झाली, तिने जग जिंकलं, आयुष्यात बाजी मारली आणि निगेटिव्ह घेतलं असतं तर... तर कदाचित ती या जगात नसती किंवा असती , तरी चित्रं मात्र वेगळं असतं  किंवा अजुन काही घडू शकलं असतं.

सो " बी पॉझिटिव्ह "

समाप्त :
 


🎭 Series Post

View all