ती जिंकली...भाग 1
निराली.
सुंदर, हुशार, संमजस.
आकर्षक व्यक्तिमत्व.
व्यवसायाने डॉक्टर.
सुशांत
उंचपुरा, धडधाकट, आकर्षक व्यक्तिमत्त्व,
व्यवसायाने डॉक्टर.
सुशांत आणि निरालीचं लव्ह मॅरेज होतं, दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये कामाला असल्यामुळे तिथेचं त्यांची ओळख झाली.
निरालीचा स्वभाव शांत आणि अबोल, त्यामुळे कुणाशीही जुळवून घेताना तिला खूप वेळ लागायचा.
लहानपणापासून परिस्थितीची जाणीव होती, त्यामुळे उगाच इतरत्र खर्च नको म्हणून ती बाकीच्यांसारखी फिरायला पण जायची नाही.
एकदा लंच ब्रेकमध्ये सगळे बाहेर जेवायला गेले आणि निराली कॅबिन मध्ये एकटीच बसली होती.
त्यावेळी सुशांत तिच्याजवळ जाऊन बोलला होता.
ती त्यांची पहिली भेट आणि पहिली ओळख.
हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं.
गप्पा सुरु झाल्या. कधीही चेहऱ्यावर हसू नसलेली निराली आता थोडी हसायला लागली होती.
गप्पा सुरु झाल्या. कधीही चेहऱ्यावर हसू नसलेली निराली आता थोडी हसायला लागली होती.
सुशांतला तिचा शांत स्वभाव खुप आवडला. पण सुशांत अगदी तिच्या विरुद्ध होता म्हणजे तो खूप बोलका होता.
हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
दोघांच्या परिवाराच्या संमतीने थाटामाटात लग्न झालं.
लग्नाच्या वेळी बाबा लग्नात उपस्थित नव्हते पण सुशांतने एका शब्दानेही तिला काही विचारले होते.
त्याच्या आई वडिलांना सगळं माहीत होतं, लग्नाच्या रात्री तिने त्याला तिच्या वडिलांबद्दल सगळं सांगितलं होतं.
त्याच्या मनात तिच्याविषयी कुठलीच अढी नव्हती.
राजा राणीचा संसार सुरू झाला.
नवलाईचे नऊ दिवस संपले आणि दोघेही आपल्याआपल्या कामाला लागले.
निरालीच्या सासरचे खुप छान होते, तिला समजून घेणारे होते त्यामुळे तिला कधीच कुठलाच त्रास झाला नाही.
सुशांत आणि निरालीच्या लग्नाला दोन वर्ष उलटून गेली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा