ती जिंकली...भाग 2

Chikati ani Jidd Havi Yash nkki mialt
ती जिंकली...भाग 2


एक दिवस सहज निरालीने कपाट आवरायला काढलं.
तिला कपाटात जुनी अल्बम दिसली. बघता बघता निराली जुन्या आठवणीत गुंतली.


निराली, तिचे आई बाबा आणि एक लहान भाऊ असं चौकोनी कुटूंब होतं त्यांच.

निरालीचे बाबा एका कंपनीत कामाला होते. पगार ही चांगला होता.
आर्थिक दृष्ट्या सगळं व्यवस्थित होत.
निराली दहावीत असतानाची गोष्ट आहे.

एक दिवस त्यांच्या घरी खुप लोक आली होती.

सगळे तिच्या बाबांची विचारपुस करत होते आणि


"आमचे पैसे आम्हाला परत करा नाहीतर आम्ही पोलिस कम्प्लेंट करू." अस काही काही बोलु लागले.
आधी कुणालाच काही कळलं नाही नंतर विचारपूस केल्या वर कळलं कि तिच्या बाबांनी अनेकांकडून पैसे घेऊन तुम्हाला नोकरी देतो अशी फूस लावली होती आणि तिचे बाबा पैसे घेऊन फरार झाले होते.
घरच्यांना काहीही न सांगता निघून गेले.


ते तर निघून गेले पण या तिघांवर दुःखाच डोंगर कोसळला होता.

मुलांच शिक्षण, घरखर्च, त्यात ही रोज येणारी माणसे, हे सगळं कसं मॅनेज करायचं.

सगळ्याचा तिघांना खुप मनस्ताप झाला. निरालीचं दहावीचं वर्ष होतं, तिलाही मानसिक त्रास होतच होता पण निरालीने धिर नाही सोडला.

तिने जिद्दीने अभ्यास केला.
आई एका दुकानात कामाला जायला लागली.

परिस्थितीची जाण ठेवून निराली वागायाची.
तिने जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून दहावीत पंचाएशी टक्के मार्क मिळवले.


क्रमशः

🎭 Series Post

View all