Login

ती फुलराणी- वैचारिक

She is an angel. Keep her like an angel.

ती फूलराणी

वाळवंटात भयाण शांतता असताना देखील त्यातही मृगजळाचा भास व्हावा असा आशेचा किरण दाखवणारी ती फुलराणी. काट्याकुटयातुन, कितीतरी मैल चढाई करून अखेर शिखरावर पोहोचल्यावरचा जो आनंद असतो तेव्हा ते करण्यासाठी आपल्याला जिने प्रोस्ताहित केलेलं असतं ती फुलराणी. अगदी कठीण परिस्थितीतही न डगमगता न हरता आपल्या पाठी उभी राहते ती फुलराणी. आपल्याला जे करायचं होतं पण काही कारणांमुळे आपली स्वप्न पूर्ण करता आली नाहीत ती स्वप्न आपल्या मुलांच्या डोळ्यांत पाहते ती फुलराणी.

खरंतर प्रत्येक स्त्री ही त्या त्या कुटुंबामधली फुलराणी असतेच. आई,मुलगी, बहिण किंवा मग पत्नी ती खरोखर फुलवते ते घर, उभारी देते पंखाना, जगण्याचं बळ देते, आपली स्वप्न जगावित म्हणुन प्रवृत्त करते. आपलं आयुष्य बऱ्याचदा आपली स्वप्न पूर्ण करण्यात जातं. आणि, तिचं आयुष्य आपलं स्वप्न पूर्ण व्हावं ह्या प्रयत्नांत. तुमचं स्वप्न ती देखील तेवढंच जगते जेवढे कष्ट तुम्ही करता. कित्येकदा आपल्या भावनांना मुरड घालुन घराचं हित पाहते ती. मुलाचं स्वप्न, मुलीचं शिक्षण, पतिचे कष्ट अगदी सगळ्या गोष्टिंत ती अगदी साथीने भागीदार असते. सवय असते तिला दुसऱ्यासाठी जगण्याची आणि तरिही निस्वार्थीपणाने प्रत्येक गोष्टिंत आनंद मानून घेण्याची


का ? तिला तिचं आयुष्य नसावं ? तिला तिची स्वप्न नसावीत? तुमच्या स्वप्नांची काळजी करणारी ती स्वतःच्या स्वप्नासाठी एक पाऊल उचलू शकली नसती? कि तिच्यात तेवढी ताकद नव्हती? खरं म्हणाल तर तुमच्या पाठीशी उभी राहणारी तिची एकच माफक अपेक्षा असते... तिच्या पंखांना उभारी देणारं कोणीतरी असावं जे प्रोत्साहन देईल तिच्या केलेला, जे तिच्या संकुचित आयुष्याला फुलायला मदत करेल असं कोणीतरी. आयुष्य फुलवणाऱ्या तिला तुझ्यासाठी देखील कोणीतरी आहे याची जाणीव करून देईल असं कोणीतरी. त्या फुलराणीला प्रेमाची साथ दया बघा तुमचं ही आयुष्य फुलेल.