A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session3d0a7b9daa3fef70beef33d192a17e02b2406358490c70416d3617f0e64f1954ea7a7e7d): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Ti fulrani
Oct 30, 2020
स्पर्धा

ती फुलराणी

Read Later
ती फुलराणी

ती फुलराणी 
(प्रेरणादायी कथालेखन स्पर्धा )
सिद्धी भुरके ©®
  शकुच्या घरावर शोककळा पसरली होती. तिचा नवरा देवाघरी जाऊन आज महिना होऊन गेला होता. घरातला कर्ता माणूस गेला होता.घर भाडं थकलं होतं.. वाण सामान संपत आलं होतं.. कोरोनामुळे लॉक डाउन असल्याने पैसे कमावण्याचं दुसरं साधन नव्हतं तिच्याकडे. आज तिची दोन्ही लेकरं पाण्यात भाकरी बुडवून जेवली होती. शकू  बेचैन झाली होती. 
     कुठून ही महामारी आली आणि आमचं होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेली असं तिला वाटत होतं. मध्यरात्र झाली होती पण तिला काही झोप येत नव्हती.  तिचं लक्ष देवघरातील दिव्यामुळे पडलेल्या मंद प्रकाशाकडे गेलं. तिचं आराध्य दैवत कृष्ण मुरारी आज आपल्याकडे बघून हसतोय असं तिला वाटलं.. फार राग आला तिला, आपल्याला मोठ्या संकटात टाकून तो कृष्ण निवांत बासरी वाजवत बसलाय असं तिला वाटलं.
"का ही महामारी आली?? का कोरोनामुळे माझ्या धन्याचा जीव गेला.. का माझी लेकरं उपाशी झोपलीये?? "..
असे सगळे प्रश्न तिला त्या देवघरातील कृष्णाला विचारायचे होते...
        देव्हाऱ्या शेजारील नवऱ्याचा फोटो पाहून ती भूतकाळात गेली... शकू जेमतेम  १८ वर्षाची असेल जेव्हा लग्न होऊन पुण्याला आली. तिच्या माहेरी काही चांगली परिस्थिती नव्हती,  त्यात आई वडिलांना तिन्ही मुलीच असल्याने  त्यांनी कशीबशी पोरींची लग्नं लावून दिली. शकूचं तिच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या रंग्याशी लग्न लावण्यात आलं होतं.असं असलं तरी  रंग्या शकूवर जीव ओवाळून टाकायचा. मार्केट यार्डला फुलांच्या गाळ्यावर कामाला होता. रोज न चुकता शकूसाठी फुलं घेऊन यायचा. शकूला फुलांची लहानपणापासून खूप हौस होती. इथे छोट्याशा भाड्याचा खोलीतपण तिने गुलाब, मोगरा, अबोली अशी कितीतरी फुलझाडं लावली होती.  बघता बघता त्यांना दोन मुलं झाली. शकुने संसाराला हातभार लावायला चार घरची धुणं भांड्याची कामं धरली होती. दोघे खुश होते. पण गेल्या महिन्यात रंग्याला कोरोना झाला, त्यात वय जास्त आणि बी पी, शुगर सारखे आजार असल्याने तो वाचला नाही. शकूची धुणं भांड्याची कामं पण सुटली होती. नवऱ्याला कोरोना झाल्याने तिच्या सगळ्या कुटुंबाचे कोरोनाचे अहवाल घेतले होते पण देवा कृपेने बाकी सगळे अहवाल नेगेटिव्ह आले होते मात्र शकू आणि तिच्या लेकरांना चौदा दिवस घराबाहेर पडायला बंदी होती.घरात सामान नाही.. पैसे नाहीत आणि बाहेर जायचे पण नाही त्यामुळे शकू हैराण झाली होती. चौदा दिवस झाल्यावर तिने  एक दोन घरी पगार देता का विचारलं होतं पण.." फुकटचा कसला पगार देऊ".. "आणि आमचंच कसं बस चाललय"
 अशी तिला उत्तरं मिळाली. शेवटी ती गेली पाच वर्ष काम करत असलेल्या साने काकू आठवल्या. त्या नक्की मदत करतील तिला वाटले. उद्या त्यांना भेटूनच येऊ असं तिने ठरवले. 
    साने काकूंकडे शकू गेली आणि दाराच्या बाहेर उभी राहून  तिने सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली.काकू स्वभावाने अतिशय चांगल्या होत्या. त्यांनी लगेच शकूला थोडे पैसे आणि वाण सामान दिला. शकूला खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी कोणीतरी मायेने तिची चौकशी केली होती. पण तिला साने काकू काहीशा चिंताग्रस्त दिसल्या, "बाईसाहेब काय झालाय का? आज नेहमीसारखा हसरा चेहरा नाहीये तुमचा.. "शकुने विचारले. 
"अगं काय सांगू तुला.. श्रावण सुरु झाला..सणवार सुरु होतील आता.  सुनेचा पहिला श्रावणी सोमवार.. पहिली मंगळागौर येईल.. पण पूजा करायला फुलचं नाहीयेत.. माझ्या बागेतली पुरेशी नाहीयेत गं.. त्यात सोमवारी महादेवाला बेल लागणार, मंगळालागौरीला  पत्री लागणार.. कुठून आणू प्रश्न पडलाय मला.. "  काकू म्हणाल्या.. 
"पत्री म्हंजी काय व्ह बाईसाहेब? " शकुने उत्सुकतेनं  विचारलं.. 
"अगं देवीला विविध झाडांची पानं अर्पण करायला लागतात त्याला पत्री म्हणतात.. पत्रींसोबत देवीला लाल किंवा पिवळी फुलं वाहतात ... उद्या तर पहिला श्रावणी सोमवार.. शंकराला बेल आणि पांढरी फुलं वाहतात.. आता कसं करू सांग.. म्हणून जरा विचारात आहे.. "काकू म्हणाल्या.
"माझ्या घरची फुलं बी पुरेशी नाहीये.. नाहीतर दिली असती तुम्हास्नी.. चला बाईसाहेब येते मी.. लई उपकार झाले तुमचे.. " म्हणून शकू निघाली. 
घरी येऊन पण तिच्या डोक्यात साने काकूंचा विचार चालू होता. ती येऊन आपल्या फुलझाडांसमोर बसली. किती दिवस झाले तिच्या झाडांची काळजी घेतली नव्हती तिने..  पाणी सुद्धा रोज घालायला जमलं नव्हतं तिला. पण ती कुंडीतली रोपं मातीतील ओलाव्याचा शोध घेऊन आपली मुळं पसरून जगली होती. त्यांनी जगायची जिद्द सोडली नव्हती.. ऊन पाऊस वारा झेलत ती ताठ मानेनं उभी होती.  त्यांच्याकडे बघून शकूला वाटलं एवढ्याशा रोपट्यात पण किती जगायची जिद्द आहे.. हार मानली नाही त्यानं परिस्थिती समोर.. पण मी रडत बसलीये.. जगणं विसरून गेलीये.. शकू काही वेळ रोपाकडे बघत बसली.. काही वेळानं डोळे पुसून उभी राहिली. जणू काही त्या रोपांनी आज तिला पुन्हा जगायला शिकवलं होतं. शकुने काहीसा विचार केला मनात आणि साने काकूंना फोन करून  म्हणाली.. 
"मी देते तुम्हास्नी बेल अन पांढरी फुलं आणून उद्या .. ती पत्री काय ते बी मला सांगा .. त्याची पण सोय करते.. "
"अगं पण तू कुठून आणणार हे सगळं?? लॉक डाउन चालू आहे" काकू म्हणाल्या. 
"तुम्ही नका काळजी करू.. मी उद्या नऊ वाजेपर्यंत देते आणून." म्हणून शकूने फोन ठेवला.  
   रंग्या फुलाच्या गाळ्यावर कामाला होता त्यामुळे तिने रंग्याच्या मालकाला फोन केला. किती वाजता माल येतो, कोणती फुलं येतात ते सगळं विचारून घेतलं आणि पत्रीबद्दल पण कल्पना दिली. 
"वाहिनी सगळं मिळून जाईल..  माल सकाळी सात वाजता येतो.. तेव्हा या.. उशीर करू नका.. आम्हाला तो पुढे पाठवायचा असतो.. कोरोनामुळे मार्केट बंद आहे.. पण लग्न समारंभ वगैरेला फुलं लागतात मग आम्ही कुठे कुठे ती पाठवून देतो.. म्हणून वेळेत या.. "मालकाने सांगितले. 
    झालं तर मग शकू सकाळी लवकरच उठून मार्केट यार्डला ५ किलोमीटर चालत गेली. काकूंना लागणारी पांढरी फुलं आणि बेल घेतले आणि दुसऱ्यादिवशी लागणाऱ्या पत्री आणि फुलांविषयी पण सांगून आली. 
     घरी येऊन तिने ते सगळं एका पिशवीत भरलं.. त्यावर एका चिट्ठीवर मुलाला चांगल्या अक्षरात  'फुलराणी ' असं लिहायला लावलं. 
"आई फुलराणी काय? "मुलाने विचारलं. 
"मला फुलांची लई आवड म्हणून मला माझी आय फुलराणी म्हणायची.. म्हणून तेच नाव ठेवलं.. कसं वाटतंय रं..? "तिने विचारलं.. 
"खूप छान आई.. छान नाव सुचलंय.. "
शकू ती पिशवी घेऊन उशीर झाल्याने धावतपळत काकूंकडे गेली. फुलं बघून काकूंना पण आश्चर्य वाटलं. 
"अगं कुठून मिळाली तुला? "
"बाईसाहेब नवऱ्याच्या कामावरून आणलीये.. उद्या पण घेऊन येते.. "शकू म्हणाली. 
"फुलराणी.. अगं किती छान नाव..  किती पैसे झाले सांग.  उद्याचे पण पैसे घेऊन जा.. आणि  हो आता दर सोमवारी.. मंगळवारी.. शुक्रवारी माझी ऑर्डर पक्की समज.. "काकू बोलल्या.. 
शकूला पण खूप आनंद झाला. 
"बाईसाहेब अजून कोणाला पाहिजे काय ते बी जरा बघा ना.. " शकुने विचारले.. 
"झालं.. सोसायटीच्या ग्रुप वर तुझी फुलराणीची जाहिरात मी टाकली सुद्धा.." काकू खुश होऊन म्हणाल्या. 
    आणि त्या नंतर शकूला साने काकूंच्या सोसायटीमधून अनेक ऑर्डर मिळू लागल्या. कधी मंगळागौर.. कधी श्रावणी सोमवार.. कधी श्रावणी शुक्रवार .. अशा कित्येक ऑर्डर मिळाल्या. गौरी गणपतीच्या तर आगाऊ ऑर्डर सुद्धा मिळाल्या शकूला.
    कोणाच्या पुढे हात पसरण्या पेक्षा मेहनत करून शकू आज संसाराचा गाडा ओढत होती आणि नवऱ्याची कमी पूर्ण करत होती याचं तिला समाधान होतं. 
       काही दिवसांपूर्वी ज्या कोरोना आणि लॉक डाउन मुळे ती हतबल झाली होती आज त्याच महामारीच्या निमित्ताने तिचं आयुष्य बदलल होतं. आज लॉक डाउन आणि कोरोना होता म्हणून तिला या नवीन व्यवसायाची कल्पना सुचली. या महामारीने तिच्या धन्याचे प्राण नेले पण शकूला जीवन जगायला शिकवले होते. छोट्याशा रोपट्याचा आदर्श घेऊन ती ताठ मानेनं उभी होती. 
       आज जन्माष्टमी असल्याने शकूने तिचं दैवत कृष्णाला छान फुलांची आरास करून सजवलं होतं.. त्याच्या समोर उभं राहून त्याची माफी मागत होती.. "उगाच देवा तुला मी दोष दिला... नाय नाय ते बोलले.. तू  रोपट दाखवून   मला पुन्हा जगायला शिकवल  देवा , साने बाईसाहेबांमुळे पोट भरायचा रस्ता दावलास .. लई चुकलं माझं देवा... माफ कर मला .. " कृष्णा समोर मन मोकळं करून शकू रडू लागली. खरचं फुलझाडाने शकूला जगायला शिकवलं होतं, त्यानिमित्ताने कृष्णाने तिला जगायला शिकवलं होतं. 
       आणि इथे साने काकू शकुने दिलेली फुलं वाहून देवघरातल्या कृष्णाचे आभार मानत होत्या.. 
"मुरलीधरा किती रे तुला माझी काळजी.. पूजेला फुलं नाही म्हणून मी नाराज झाले होते पण तू शकुच्या रूपाने फुलांची सोय केलीस..भक्तांचे हट्ट पुरवायला तू धावून येतोस हे खरंय..  चुकलं असेल काही माझं तर क्षमा कर रे बाबा... " आणि त्या भजन गाऊ लागल्या.. 

"तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा..."

वरील कथा काल्पनिक असून तिचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. आढळल्यास योगायोग समजावा.. 

कथा आवडली तर like आणि कंमेंट करायला विसरू नका..नावासकट share करायला हरकत नाही..   धन्यवाद..

सिद्धी भुरके ©®

Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..