ती एक काळ रात्र....

रहस्य बाबांच्या वाढदिवसाचे...

बाबा या वेळेस मलाही यायचयं तुमच्यासोबत,नुसते गाडीत बसवून ठेवता,काहीच सांगत नाही---सावी

काहीही न बोलता दरवर्षीप्रमाणे अतुल गाडीतून उतरला आणि त्या सामसूम रस्त्याच्या दिशेने चालत गेला.
त्याच्या पाठोपाठ त्या मायलेकी पण गेल्या...

एका जागी तो थांबला,जोरात रडू लागला,सावीला म्हणाला,बाळा इथे माझे गाव होते...मी शिक्षणासाठी बाहेर होतो तेव्हा...

काही वर्षापूर्वीची ती काळरात्र,जास्तीचा पाऊस झाला अन डोंगर कोसळला अख्खा गाव नाहीसा झाला,अन त्याच्यासोबतच माझे आई,बाबा,बहीण,आणि आमचे घर सर्व काही नामशेष झाले...आता राहिलाय तो फक्त हा वाहून गेलेला रस्ता....मी शोधतो त्या फक्त त्यांच्या आठवणींच्या खुणा.....म्हणून माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी इथे येतो...या मातीमध्ये त्यांच्या प्रेमाचा वास आहे...ह्या मातीचा स्पर्श जो मला जगायची नवीन उमेद देतो..आणि त्यांचा आशीर्वाद....

सावी अगदी निशब्द झाली... एवढ्या वर्षाने तिला बाबांचे रहस्य समजले जे अगदी काळीज तोडून टाकणार होते...

© अनुजा धारिया शेठ