ती अजूनही दिसते(भाग 4)

Horror

ती अजूनही दिसते ( भाग 4) 

( माघील भागात आपण पाहिले मुक्ता ला सगळ्यांनी मध्ये बसवले होते 
व आजी तिला काहीतरी विचारत होती 

आता पुढे .....


ताई आता शांत झाली, 
आजी चा प्रश्नाचं भडिमार चालू च होता, 

सांग कोण आहेस ??? 


सांगते पण अगोदर तो ग्रंथ बाजूला करा, 
आवाज ताई चा च होता पण त्याला एक वेगळी च धार होती, 

तो ग्रंथ आहे तिथेच राहील 
तू बोल 
आजी तिच्यावर ओरडत म्हणाली 


काहीतरी भगवे आडवे येतंय 
मला बोलता येत नाही 
तुमची भलाई यातच आहे की 
तो ग्रंथ बाजूला करा, 
ताई विनवणी करत होती 
रडत होती हात जोडत होती पण कुणाला ही दया येत नव्हती 
मी विचार केला पळत जावे व तो ग्रंथ बाजूला करावा 
पण मोठे माणसे देखील तिथेच होते व त्याना न विचारता असे करणे योग्य वाटत नव्हते, 

शेवटी मी डोळ्यात पाणी आणून तशीच बसले कोपऱ्यात 
मनाला ते पटत नव्हते 
पण माझा  नाईलाज होता, 


काहितरी करा 
मला तो भगवा प्रकाश त्रास देतोय 
दिसत नाहीये मला काहीच 
करा लवकर 
काहीतरी करा, 
ताई पुन्हा ओरडली 

आता देवा ने त्या ग्रंथावर स्वतः चा पंचा ठेवला 
त्यांनी पंचा ठेवताच ताई हसू लागली, 

कसे नाटक केले, 

तू बोल नाहीतर तो ग्रंथ तुझ्या हातात देईन बोल आजी पुन्हा ओरडली 


नाही नको 
नाही नको 
सांगते, 

मी सविता, 
वहिनी च्या शेजारी राहायचे, 
कॉलेज ला होते 
छान चालू होतं सगळं 
पण त्यात असे काही घडले की मला जीव गमवावा लागला, 

मग तू त्या दिवशी ती मेहदी बघून का ओरडली, 
तुला मेहदी लावायची आहे का,?????आजी 

हो मला मेहदी लावायची आहे, 
मला लग्न करायचं होतं 
मला नवरी होयचे होत 
पण मधेच सगळं संपलं 
संपून टाकलं त्याने , सविता 


त्याने कुणी????
व तू नंतर का नाही आलीस पहिला दिवस झाल्यावर आजी 

येणार होते 
पण तुमची ही पोथी मला येऊ देत नाही, 
म्हणून मी

पोथी ची वेळ झाली की बाहेर दडून बसायचे व झाड एकटेच आत यायचे म्हणून झाडाला काही झाले नाही, 

झाड कोण आहे तुझे व का आलीस तू इकडे, 
आजी 

झाड माझी वहिनी आहे 
पण मला वहिनी सोबत नव्हते यायचे, 
मी त्या दिवशी बाहेरून आवाज दिला , 
वहिनी च्या सासूबाई ने दार उघडले , 
मी त्यांच्या कडे जाणार तोच त्यांच्या गळ्यातील तुळशी माळेने मला झोरात झटका दिला 
मला काही कळणार तोच वहिनी सासूबाई पाटोपाट बाहेर आल्या, 
त्यांची व माझी रास एक आली व ईच्छा नसताना देखील मी वहिनी चा आसरा घेतला, 
ताई 


पण तू नेमकी आहेत तरी कोण व तुला काय झाले, 
आजी 

मी मनीषा वहिनी शेजारी राहायचे 
आमचे खुप सुखी कुटुंब होते, मी आई बाबा व भाऊ, 
मी  कॉलेज ला जात होते खुप हुशार देखील होते, 
छान चालले होते आमचे सगळे 
व अचानक ताई खुप रडू लागली 
भिंतीवर डोकं आपटून घेऊ लागली, 
ताई कुणाचेच ऐकत नव्हती 
ती फक्त जोरात  ओरडत होती व भीतीला डोकं मारत होती 
ती पुढे काहीच बोलेन मग कुणीतरी म्हणे तिच्या हातावर कापूर लावा 
पण पोटच्या गोळ्या च्या हातावर चटके कोण देणार म्हणून कुणीच पुढे येईनात शेवटी मोठ्या आजी ने ताई चा हातावर कापूर ठेवला व तो पेटवला, 
काही कळण्याच्या आत ताई ने तो तोंडात टाकला 

बाप रे .....
मी तर फक्त बघत होते पेटता कापूर तो पण तोंडातआता ताई ला किती भाजेल 
ताई आणखी ओरडेल या विचाराने मीच थरथर कापू लागले, 

पण बघते तर काय ताई क्षणात शांत झाली, 
व कोपऱ्यात जाऊन बसले व ती आमच्याकडे असे बघत होती जसे काही झालेच नाही 

कमल होती सगळी 
जे घडतंय त्यावर। विश्वास ठेवावा की नाही तेच कळत नव्हते, 
घरात एखाद्या पिचर ची शूटिंग चालू आहे असे वाटायचे कधी कधी तर 

मुक्ता चा पुढील प्रवास जाणून घेण्यासाठी सोबत राहा

🎭 Series Post

View all