ती अजूनही दिसते(भाग 2)

Horror

ती, अजूनही दिसते. (भाग 2) 

( माघील भागात आपण मुक्ता ला बरे वाटावे म्हणून तिच्या घरातील लोक वेगवेगळे प्रयोग करत होते) 

आता पुढे .............

घरात सुख समाधान मिळावे म्हणून आजी ने पोथी लावली होती
पोथी संपली व प्रसादाच्या वेळी ताई वेड्यासारखे करू लागली, 
माझे हात ओढू लागली, 
असे करत करत ताई माझ्या पायावर कोसळली 

घरातील सर्वजण शांत झाले कुणीतरी ताई च्या तोंडावर पाणी मारले, 

ताई शुद्धीवर आली, 

मला खुप झोप  येतेय असे सांगून ताई झोपी गेली, 
पण झोपण्यापूर्वी ताई इतक्या गडबडीत देखील जेवण करायला विसरली नाही.
आजी कडून जेवण घेऊन ताई झोपी गेली


घरात भयानक शांतता पसरली काय झाले असेल ताई ला 
मी आई ला विचारू लागले, 
पण तुला काही गरज होती का यायची 
काकू माझ्यावर ओरडली 

अग तिला काय ओरडती 
तिने थोडीच काही केलं, 
काका माझी बाजू घेत म्हणाले

मला तर माझी चूक काय होती ते कळण्यापेक्षा ताई ला काय झाले होते हे समजणे जास्त गरजेचे होते .

मोठे माणस काही तरी बोलत असायचे पण तेव्हा ते काही कळत नव्हते,

ताई झोपेतून उठली 
जसे काही झालेच नाही असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते 

न  राहवून मी विचारलं 
तायडे तुला बर वाटते का ग 

मला, ती हसून म्हणाली 
मला कुठे काय झाले मी मस्त ठणठणीत आहे 

तुझी तब्बेत बरी आहे का??
मी घाबरत च म्हणाले 

हो ना 
आणि मला काय झालंय 
पण तू सारखी सारखी अशी का विचारते 
तू बरी आहे का 
तू बरी आहे का ???
ती पुन्हा हसू लागली तू नक्की बरी आहेस ना, 

मी हो म्हणून निघून गेले 

कालची ताई व आजची ताई खुप वेगळी होती, 
काल तिचा चेहरा वेगळाच दिसत होता


आज पुन्हा संध्याकाळी पोथी साठी सगळे

जमा झाले 
ताई ला आजी ने आज कुठेही जाऊ दिले नाही 

दिवसभर आजी ताई सोबत होती
पोथी ची तयारी चालू झाली देवा आले 
सगळे सामान घेण्यात आले 
पण आज ताई नेहमी प्रमाणे वाटत होती 
तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसत नव्हते. 

सर्वांप्रमाणे तिने देखील पूर्ण पोथी ऐकली 
शेवटी प्रसादाची वेळ आली प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून ताई च्या हालचालीवर लक्ष ठेऊन होता, 
पण ताई प्रत्येक गोस्ट नेहमीप्रमाणे करत होती 
मला आठवते ताई नेहमी चुकून दोन नंबर च्या बोटाने कुंकू लावायची व आई ओरडली की मग तीन नंबर च्या 
आज देखील ताई ने दोन नंबर च्या च बोटाने कुंकू लावले आई ओरडली मग तीन नंबर च्या बोटाने लावले. 

सगळ्यांचा हिरमोड झाला आज ताई ला काहीच झाले नाही
कसे काय 
काल जे पाहिले ते सत्य मानावे की आज 
जे चालू होते ते हा सगळ्यांना प्रश्न पडला. 

आज ताई ने छान पोथी ऐकली प्रसाद देखील घेतला व मला भूक नाहीये भूक लागली की करेल जेवण असे सांगून ताई झोपण्याची निघून गेली. 


जे घडत होतं ते खुप भयानक होत ताई त होणारा बदल तर भयंकर होता. 

ताई जेव्हा दुसऱ्या दिवशी उठली तेव्हा पुन्हा ती नेहमीप्रमाणे वागू लागली 
हा वाऱ्याच्या वेगाने बदलणारा बदल घरातील कुणालाच पचत नव्हता.

प्रत्येकजण फक्त एकाच विचारात होते की मुक्ता ला झाले तरी काय 

तितक्यात काकू म्हणाल्या 
आपण चिऊ ला आज पुन्हा मेहदी लावून तिच्या समोर बसवू 

काही पण काय सांगतेस 
एकीचा जीव वाचवण्यासाठी दुसरीला असे धोक्यात टाकायचे का? 
काका म्हणाले 
अहो धोक्यात नाही 
त्या दिवशी ती चिऊ ची मेहदी बघून बेशुद्ध पडली होती म्हणून म्हणाले मी, 
काकू म्हणाली 


हो ते पण बरोबर आहे 
काका 

सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आज संध्याकाळी पोथी मध्ये मला त्या दिवशी प्रमाणे मेहदी लावून बसवायचे 
मुळात मी खुप घाबरले होते पण ताई ला नेमकं काय होतंय ते जाणून घेणं देखील गरजेचं होतं 


म्हणून मी तयार झाले मेहदी लावायला 

आज पुन्हा पोथी ची तयारी झाली देवा आले, पाठ ठेवला 
पोथी ठेवली 
त्यांनी पोथी वाचायला चालू केली 

मी मुद्दाम हात समोर धरून बसले होते वाळवण्याचे निम्मित करून. 

पण आज पुन्हा ताई नेहमी प्रमाणे भासत होती तिच्यात काहीच बदल झाला नाही 
उलट ती म्हणाली 
चिऊ जास्त मेहदी वाळवू नको हात च सुकून जाईल 

आणि ती हसू लागली 
बाकीच्यांना हसू आले नाही पण ते मुद्दाम हसले, 
पोथी संपली सगळे आपापल्या ठिकाणी गेले 

मी विचार करू लागले ताई आज मेहदी बघून रडली का नाही 
काय कारण असेल 
त्या पाठीमागे??????

जाणून घेण्यासाठी सोबत राहा,

🎭 Series Post

View all