ती अजूनही दिसते(भाग 1)

Horror

ती , अजूनही दिसते, (भाग1) 


कथा ही सत्य घटनेवर आधारित असून लेखिकेने फक्त त्यात शाब्दिक खेळ केलेले आहेत, 
कथा वाचून कथेचा फक्त आनंद घ्यावा हाच लेखिकेचा उद्देश असून कुठल्याही सामाजिक घटकाला हानी पोहचवणे किंवा  अंधश्रधे ला खतपाणी घालणे हा उद्देश नाही, 

मी सगळी कामे आवरून बसले होते, तितक्यात भाऊजी चा कॉल आला तुझी बहीण वेड्यासारखी करतेय साग तिला काही, 
मी ताई शी बोलल्या नंतर कळले ते तिची उडवत होते जुन्या गोष्टी आठवून, 
जुन्या गोष्टी 
जसे हे नाव ऐकले मी तिच्या भूतकाळात गेले, 

आज पंचमीच्या सण होता, मी  छान कपडे घालून तयार झाले होते, 
नाग पंचमी म्हणलं की आमच्याकडे लहान थोर सगळे झोका खेळायचे, खुप मजा करायचो आम्ही सगळे, 

माझ्या ताई चे आता च लग्न झाले होते, 
ती देखील तिच्या पहिल्या पंचमी ला माहेरी आली होती, 

तशी माझी ताई लग्न झाल्यापासून माहेरी चा जास्त होती कारण खुप आजारी पडायची ती, 
आजी म्हणते तिला लग्न मानवले नाही 
डबल असलेली माझी ताई आता मायनस मध्ये गेली होती, 
ती दिवसभर फक्त खावं खावं करायची, 
मधेच हसायची 
मधेच रडायची 
कधी कधी तर जिवंत माणूस मेले म्हणून 
निरोप देऊन यायची, 

तिच्या सासरी तिच्या या वागण्याला सगळे परेशान झाले होते,
शेवटी त्यांनी सणाचे कारण सांगून तिला माहेरी आणून सोडले, 


आता ताई वर एक एक प्रयोग 
चालू झाले, 

आम्ही एकत्र कुठूब पद्धतीने राहतो त्यामुळे सगळ्यांचे मिळून अनेक सल्ले जमा झाले, 


त्या डोगरवरील बाबा ला दाखवूयात का???
आजी 

नको आरती घालवू आपण 
मोठी काकू, 


शैलनी बाबा च्या खेत्या करू 
लवकर फरक पडेल , छोट्या काकू 

हळदी च्या अंगावर काही झाले असेल का?? देवा ला विचारू का ??
तिची कुंडली तर दाखवली होती तेव्हा काही नाही बोलले ते,आई 

तुम्ही सगळ्या गप्प बसा, डॉक्टर ला दाखवू, काही नाही झाले तिला , बाबा ओरडून सगळ्यांना गप्प करत म्हणाले, 

पण या बायका ऐकतील तर त्या बायका कसल्या, 
यांनी प्रेमापोटी चालू केले एक एक प्रयोग, 
कुठे भारून पाणी आणणे, 
तिला अंगारा लावणे, 
तिच्यावरून लिंब उतर, कुठे नारळ उतर, अंडे उतर नाहीतर मिरच्या उतर 
त्या हे प्रयोग रोज करत होत्या, 
अर्थात त्या ताई च्या काळजीपोटी च करत होत्या, 

ताईवर मात्र या सगळ्याचा काहीच परिणाम होत नव्हता, 
तिची तब्बेत आणखी खराब होत होती, 
आता ती खुपच शांत झाली,
 नेहमी बोलकी बडबड करणारी माझी ताई आता शब्द ही काढत नव्हती, 

घरातील बायका सगळे प्रयोग करून थकल्यावर बाबा नि ताई ला डॉक्टर ला दाखवायचे ठरवले, 
बाबा ताई ला घेऊन डॉक्टर कडे गेले, 
पण तिच्यात काही जाणवले नाही म्हणून की ती त्या अवस्थेत च नव्हती म्हणून माहीत नाही पण डॉक्टर ने तिला गोळ्या दिल्या व जास्त काही झाले नाही सांगून माघारी पाठवून दिले, 
बाबा चा प्रयत्न देखील अपयशी ठरला होता, त्यामुळे आता करायचे काय या विचारात सगळे होते, 

तेवढ्यात आजी म्हणाली आपण नवनाथाची पोथी लावू, 
काही नाही निघाले तरी कमीत कमी घरात देवकार्य तरी होईल 
व सर्वाना समाधान देखील मिळेल , 

हो नाही करण्याचा प्रश्न च नव्हता 
आजी चा शब्द म्हणजे फायनल असायचा, 

घरात ठरले मग

की घरातील लोकांना समाधान लाभावे म्हणून ,
नावनाथाची पोथी घरात वाचावी, 
आई ने सगळी तयारी केली, 
घर छान पुसून घेतले, 
भिंतीच्या कडेला एक नावनाथाची फोटो ठेवला त्या समोर चौरंग ठेवला त्यावर भगव्या कपड्यात बांधून पोटी ठेवली, 
देवा पोथी वाचणार होते त्यांना बसण्यासाठी पाठ ठेवला , त्या चौरंग व पाटाभोवती रांगोळी काढली घरादाराला आंब्याची तोरण लावली, केळीचे खांब उभे केले, 
घरातील सर्वजण मदत करत होते, 
पण ताई फक्त बघत होती, 
ती काही केल्या त्या घरात येईना, 

आजी ने तिला सांगितले, 
मुक्ता पुढे हो व नमस्कार कर, 

हो करते, मुक्ता 

तिने दुरूनच नमस्कार केला व आजी जवळ जाऊन बसली, 

मी आपली पंचमी चा झोका खेळण्यात व्यस्त होते पण आरती चा आवाज आला व आम्ही सगळी भावंडे पळत घरात आलो प्रसाद मिळेल म्हणून, 

पंचमी होती म्हणून मी मेहदी काढली होती, 

मी प्रसादासाठी हात पुढे केला व प्रसाद वाटणाऱ्या ताई ने माझा तसाच हात घट्ट धरला, 
मी ओरडू लागले किंचाळू लागले, 

तायडे दुखतंय सोड 
खुप दुखतंय सोड 

पण ताई फक्त तो नेहदीचा हात पकडून जोरजोरात रडत होती, 
ती वेड्यासारखी माझा हात पकडून तिच्या हातावर मारत होती, 

तुझ्या हाताची मेहदी माझ्या हातावर दे 

लवकर दे 

पटकन दे 

माझी वेळ संपत आली 

दे म्हणते ना तुला 
देते की नाही 

लवकर दे लवकर 

असे ताई बोलत होती, 

असे ओरडत ओरडत च ताई माझ्या पायाजवळ बसली व अचानक शांत झाली, 
तिला खुप घाम आला, 
ती थंड पडली होती, 

काय झाले असेल मुक्ता  ला??? 

खरच असेल काही की असेल मनाचे खेळ 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा

🎭 Series Post

View all