Jan 19, 2022
नारीवादी

ती आपली सून नाही

Read Later
ती आपली सून नाही

मानसी आणि मनोजचे लव्ह मॅरेज.. ते दोघेही इंजिनिअर असून मोठ्या पदावर नोकरी करत होते.. त्यांनी लव्ह मॅरेज केल्यामुळे मनोजचे आईबाबा खूप नाराज झाले.. इतकी शिकलेली मुलगी संसारात तिचे लक्ष राहिल का?? असे त्यांना वाटत होते..

मनोजचे आईबाबा खूप साधे होते.. मनोजने इतकी प्रगती केलेली असूनही ते त्यांच्या गावीच राहत होते.. त्यांच्या मते, नोकरी करणारी सून अथवा खूप शिकलेली सून म्हणजे खूप गर्विष्ट, घमेंडी असणार.. शिक्षणाचा गर्व असणार, श्रीमंतीचा गर्व असणार.. म्हणून ते मनोजचे लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी त्याच्याकडे एकदाही आले नव्हते..

मनोजची मुलगी रिया आता आठ वर्षाची झाली होती.. तिचे ते बोलणे ऐकून त्यांना तिला भेटायची इच्छा झाली.. म्हणून ते दोघेही मनोजकडे आले.. मनोजची प्रगती बघून त्यांना खूप आनंद झाला.. मानसीची प्रगती मनोजपेक्षा अर्थातच जास्त होती.. पण त्यांनी तिचे काहीच कौतुक केले नाही..

मानसी घरातले सगळे आवरून ऑफिसला जात होती.. मनोज तर लवकरच जात होता.. मनोजचे आईबाबा नातीसोबत खेळायचे, गप्पा मारायचे..

एक दिवस असेच खेळत असताना मनोजच्या बाबांना अचानक छातीत दुखू लागले.. त्यांना घाम आला होता.. मनोजच्या आईला घाबरून काहीच सुचेना.. मग मनोजच्या आईने लगेच मनोजला फोन केला.. मनोज कामानिमित्त बाहेर गेला होता.. त्यामुळे आई आणखीनच घाबरल्या.. तिला काहीच सुचेना..

ते सगळे बघून रियाने तिच्या आईला फोन केला.. मानसी ते ऐकून लगेच घरी आली.. आणि बाबांना हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेली.. तिच्यासोबत आईपण गेल्या.. तिथे बाबांचे सगळे टेस्ट करून झाले.. त्यांना सौम्य अटॅक आला होता.. हाॅस्पिटलमध्ये मानसीची औषध वगैरे आणण्यासाठी झालेली धावपळ बघून आईला काहीच कळेना..

बाबांच्या ट्रिटमेंट सुरू झाल्या.. मानसी तिथेच बसून होती.. बाबांना थोडं बरं वाटू लागल्यावर सगळ्यांना हायसं वाटलं.. वेळेवर आणल्यामुळे धोका टळला.. असे डाॅक्टर म्हणाले.. तेव्हा आईबाबांना मानसीची किंमत कळली..

"आज मानसी होती म्हणून जीव वाचला.. नाहीतर काय झाले असते काय माहित?" बाबा

"मग सून आहेच तशी.." आई

"अहो ती आपली सून नाही मुलगीच आहे.." बाबा

"हं.. शिकलेल्या मुलीचं खूप हुशार असतात.. कठीण परिस्थितीत अगदी धीराने तोंड देतात.. मी तर बाई अगदी घाबरूनच गेले होते.. ते म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली.. अगदी तसंच.." आई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..