तीन झुंजार सुना भाग १६

तिन्ही सुना आता जोमाने कामाला लागल्या आहेत.

       तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य          डॉ. अनंत बिजवे

                              Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेव राव सुळे                  वर्षाचे वडील

विजया बाई                      वर्षांची आई.

शिवाजी राव                     विदिशाचे  वडील

वसुंधरा बाई                     विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीक राव                      शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

भाग १६

भाग १५ वरून पुढे वाचा .................

तीन चार दिवसांत कुंपण घातल्या गेलं. Flood lights लागले, drip पाइप चं काम पण पूर्ण झालं. मग सरितानी सर्वांना बोलावलं, आणि सूचना दिल्या.  “आता drip lines चालू करा. Sprinkler  आठ तासांतून  एकदा तासभर चालू ठेवा. वाफे चांगले दमट ओलसर होऊ द्या मग दोन तीन दिवसांनी आपण रोवणीला सुरवात करू. पावसाच्या आशेवर आता थांबता यायचं नाही.”

“आणि हो,” सरिता पुढे म्हणाली. “आता तुम्ही सगळे आळी पाळी ने रात्री राखण करायला या. यापुढे पुन्हा कशाची चोरी होता कामा नये. ती तुमची जबाबदारी. नाही तर उद्या कळायचं की बोरिंग चा पंप नेला म्हणून.”

बालाजीला काही बोलायचं होतं. तो चुळबुळ करत होता. सरिताच्या ते लक्षात आलं.

“काय रे बालाजी, काही बोलायचं आहे का ?” – सरिता.

बालाजी, कोपरांनी बारक्याला ढोसत होता. तू बोल या अर्थाने

“बालाजी, अरे तुला बोलायचं आहे मग बारीकरावांना का त्रास देतो आहेस ?” – सरिता.

“वहिनी साहेब, तुम्ही त्या परदेशी लोकांना इथे राहायला जागा दिलीत तशीच आम्हाला द्या. आम्हाला पण इथेच राहायचं आहे.” – शेवटी बालाजी धीर करून बोलला.

“आमची काही हरकत नाहीये पण तुम्हाला सुद्धा त्यांच्या प्रमाणे २०० रुपये मिळतील. चालतील का ?” – सरिता.

“चालते ना वहिनी साहेब.” बालाजी आणि बारीकराव एकदमच बोलले.

“अरे पण तुमचा संसार आहे. बायको आहे मग ?” सरिताचा प्रश्न.

“आम्ही दोघंही येऊ. चालेल का ? मी, सदा आणि कृष्णा तिघांच्या बायका स्वयंपाकाचं सांभाळतील. चालेल का ? वहिनी साहेबांचं पण स्वयंपाक घर सांभाळतील.” – बालाजी.

“ठीक आहे. चांगलंच आहे. सगळेच एका ठिकाणी राहू. हे शेत  सगळ्यांच आहे अश्या भावनेने काम करा. मग सगळ्यांचाच उत्कर्ष होईल. बारीकराव आता तुम्हा सर्वांचीच  व्यवस्था करा. एक एक बाथरूम आणि संडास अजून बांधा. पण मला एक सांगा त्या परदेशी लोकांबरोबर तुमचं पटेल का ? की भांडणं होतील ?” – सरितानी शंका काढली.

“नाही वहिनी साहेब, ती लोकं चांगली आहेत आणि आमचं छान जमतं आहे. त्यांनीच आम्हाला म्हंटलं की तुम्ही पण या एकत्र राहू म्हणून. त्यांनी आता इथेच तुमच्याकडे राहायचं ठरवलं आहे. ते आता पुढच्या वर्षी आपल्या बायकांना पण घेऊन येतील असं म्हणत होते.” – बालाजी.

“चला ठीकच आहे. या तुम्ही, एक नवीन सुरवात होईल.” – सरिता.

घरी गेल्यावर सरितानी बाबांना अपडेट दिलं. विदिशाला आणि बाबांना दोघांनाही आनंद झाला. म्हणाले

“सरिता, एका मोठ्या कुटुंबाची जबाबदारी घेते आहेस. चांगली गोष्ट आहे. चालू दे.”

विदिशा म्हणाली की हे ऐकून वर्षाला पण आनंद होईल. “वहिनी you are great.”

“जास्तीची माणसं घेतली होती ते एका दृष्टीनी बरंच झालं.” सरिता बाबांना सांगत होती. “रोवणी ची काम हातांनीच करावी लागणार आहेत. मुसळीचं बियाणं फेकून चालत नाही. ते पेरायची एक विशिष्ट पद्धत आहे, ट्यूबर ची क्राऊन कॅप  वरती असावी लागते. ते त्या प्रमाणेच अतिशय काळजी पूर्वक लावावं लागतं. टिलरला जी अटॅचमेंट आहे, त्यांनी ते काम होतं पण परफेक्ट होत नाही. मग त्याचा yield  वर परिणाम होईल. उत्पन्न कमी मिळेल.”

“बरं झालं असं, म्हणते आहेस म्हणजे, आधी तुला याची कल्पना नव्हती का ?” – बाबा.

“नाही न. रोवणी  करता करताच कळलं. पण बरं झालं वेळेवारी कळलं.” - सरिता.

“सरिता,” बाबा म्हणाले, “आम्ही जेंव्हा यांचा अभ्यास केला होता, तेंव्हा जरा वर वरच केला होता. उत्पन्न तिप्पट चौपट येतं एवढंच माहीत होतं. पण मला सांग, रोवणी च्या आधी मुसळीच्या रोपांना, म्हणजे ट्यूब ला कसली तरी ट्रीटमेंट द्यावी लागते ती दिली का ?”

“हो बाबा, तुम्हाला माहितीच आहे की मी सतत कृषि महाविद्यालयातल्या एका प्राध्यापकाच्या संपर्कात असते. ते व्यवस्थित मार्गदर्शन करतात. त्यांनीच सांगितल्या प्रमाणे, हुमीसील आणि दिथेंन च्या पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती रोपं.” सरितानी सांगितलं. ती पुढे म्हणाली “ बाबा, वाफारे तयार करतांना aldrin मातीत मिसळावं लागतं, पिकावर बुरशी पडू नये म्हणून. ते पण करून झालं आहे. आता पानं खाणाऱ्या किड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर २० २५ दिवसांनी फवारणी करायची आहे. त्या बद्दल कृषि महाविद्यालयातल्या आपल्या  प्रोफेसरशी मी बोलून ठेवलं आहे. ते येतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील.”

“वा वा. सरिता खूप विचार करून तू पावलं उचलते आहेस. प्रोफेसरांचं मार्गदर्शन घेते आहेस फार चांगलं झालं. प्रताप असता तर सगळ्या गोष्टी आपोआप झाल्या असत्या. पण मला समाधान आहे की तू चांगली तयार होते आहेस.” बाबांनी आनंद व्यक्त केला

“खरंय बाबा. पण हे असते तर आजची परिस्थिती उद्भवलीच नसती. पण आता मी पण चंगच बांधला आहे की यांच्या सारखंच काम करून दाखवीन  म्हणून.” – सरिता.

“हे काय वहिनी, आम्ही दोघी काहीच करत नाही का ? बाबा फक्त तुझीच तारीफ करतात. बाबा हा आमच्यावर अन्याय आहे.” – विदिशा रुसली.

“अरे बापरे, आमचं हे पिल्लू रूसलं की. अग, तुझ्याशिवाय सरिताचं पान हलत नाही. इतकी महत्वाची आहेस तू. पण कसं आहे न, मॅच जिंकली की  कौतुक टीमच्या कॅप्टन चं होतं न, तसंच आहे हे.” बाबा म्हणाले. मग विदिशा मनमोकळं हसली. तिचं निरागस  हसणं बघून बाबा आणि सरिता दोघंही कौतुकानी हसले.

“एक विचार येतो आहे मनात,” बाबा म्हणाले “आपली आजची कंडिशन जरा वेगळी झालेली दिसते आहे. इतका अफाट खर्च झाला आहे की तो आधी भरून निघाला पाहिजे. जरा चिंतेचीच बाब दिसते आहे. त्या कडे लक्ष द्यावं लागणार आहे.” 

विदिशा तिथेच होती. वर्षा आणि विदिशा अगदी मनापासून सर्वोपरी सरिताला मदत करत होत्या. निशांत आणि विशाल चं जे काही चाललं होतं, सरीताला त्रास देण्यासाठी, त्याचा दोघींना खूप त्रास होत होता. आणि तसं त्या वारंवार बोलून पण दाखवत होत्या. ती म्हणाली

“बाबा, कुंपण, विहीर, बोरिंग, पंप, आणि टिलर हे सगळे  खर्च अनाठायी झालेले आहेत. तो खर्च निशांत, आणि विशाल कडून वसूल करा.” 

सरीताला तिचं बोलणं सहन झालं नाही. ती म्हणाली

“अग काय बोलतेस विदिशा हे. आपसामध्ये कधी असे व्यवहार होतात का ? आपल्या कुटुंबा  मध्ये असले हेवेदावे नकोत. थोडा काळ जाऊ देत, सगळं सुरळीत होईल याची  मला खात्री आहे. तू चिंता करू नकोस आणि त्यांचा राग तर मुळीच धरू नको. कितीही झालं तरी तुमचे नवरे  आहेत ते. आपलंच कुटुंब आहे.”

विदीशाला ते पटलं. ती हसली. म्हणाली

“वहिनी तुम्ही आहात म्हणूनच हे घर टिकून राहील याचा विश्वास वाटतो आहे.”

“आणि बाबा, वर्षा म्हणते की हा जो खर्च झाला आहे हा one time खर्च आहे. Capital investment. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाहीये.” सरिता म्हणाली.

“आता वर्षा म्हणते आहे म्हणजे बरोबरच असेल. तिलाच माहिती. तीच सगळे जमा खर्च बघते आहे ना ?” – बाबा.

“हो बाबा. खूप मदत होते आहे तिची.” – सरिता.

“आणि माझी ग ? की मी नुसतीच नाचा नाच करते ?” विदिशा फुरंगटून म्हणाली.

सरितानी तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, “अग  तू तर माझी राइट हँड आहेस. किती थोडक्या  काळात माझ्या बरोबरीने कामात लक्ष घालते आहेस. मला तर असं वाटतंय की तिघी मिळून आपण ३० एकर सुद्धा आरामात सांभाळू.”

“वाटायचं काय आहे त्यात ? माझी आता पक्की खात्री झालेली आहे. फक्त या दोघांच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा.” बाबा म्हणाले.

आता सगळे झड झडून कामाला लागले होते. रोवणी  जवळ जवळ पूर्ण होत आली होती.

रात्रीची राखण सुद्धा आळी पाळीने सुरू झाली होती. रोजच्या रोज वाफे चेक केल्या जात होते. अजून पावसाचा पत्ता नव्हता पण बोरिंग चं पाणी असल्याने काही चिंता नव्हती.

एका कोपऱ्यात अर्ध्या पाऊण एकरांचा पट्टा वेगळा ठेवला होता. त्यात ज्वारी लावली होती. आणि एका कोपऱ्यात तांदूळ लावायचा होता.दुसऱ्या कोपऱ्यात तूर लावली होती.  सगळ्या मजुरांचं वर्षभर भागेल एवढं पीक येईल इतका तो जमिनीचा तुकडा होता. घराच्या आसपास छोट्याशा जागेवर थोडी भाजी लावली होती. रोजच्या भाजीचा प्रश्न त्यामुळे सुटणार होता. दूध तर काय घरचंच होतं. मजुरांनी वीस एक कोंबड्या पाळल्या होत्या. त्यामुळे अंडी पण मिळत होती.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all