Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

धागे नात्यांचे भाग-१४

Read Later
धागे नात्यांचे भाग-१४


जयवंतरावांचा परिवार बिखरला होता खरा पण मोठ्या मुलाच्या व सुनेच्या समजदारीने लवकरच सावरला होता .खरच नितिनच कौतुक कराव तेवढ कमीच होत.नात्यांची जान ,समजदारपणा ,एकमेकांप्रति प्रेम व झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा नव्याने केलेली सुरवात त्यामुळे सारंग व जयाची अपराधीपणाची भावना जाऊन नव्या उमिदीने उभ रहायला प्रेरणा मिळाली होती...

जयाने सासूबाई व मेघाताईला कडकडून मिठी मारली .सासर्यांच्याही पाया पडली .

"आई ,माई..तुमचे कसे उपकार फेडू हो..!माई मी वागत होती ते तुमच्या लक्ष्यात येत होत तरीही परिवाराच्या भल्यासाठी तुम्ही कधीच माझ्याशी वाद घातला नाहित हो,मी दिशा व यशमध्ये सतत भेदभाव केला पण तुम्ही कधीच मुलांमध्ये भेदभाव केला नाही चौघाही मुलांना सारखीच वागणूक दिली ,आजही तुम्ही त्या दोघांचा विचार केला.व आमचा गुन्हा पोटात घातला .याची माणसिकता समजून घेतली .."

"अगं जया जाऊ दे ना ?नको काढुस मागचे विषय .."इती मेघा .

"माई ..बोलू द्या हो मला ..मीच माझ्या संसाराची घाण केली हो ..!.फ्लाँट घेतला बहिणीच्या नावावर ती नाकबुल झाली .माहेरी तुम्हा सगळ्यांना चोरून सार पोहचवलं .माझ्या नातलगांनाही नको तेवढा मान दिला .मला सतत वाटायचं हो ..!माझे आहेत ते मला काम पडतील पण बहिण व भावानेच मला दगा दिला ..कर्ता ,हुशार नवर्याला नादी लावल व माहेरच्या लोकांच्या वागण्याने माझा जोडीदारच खचला ..व्यसनाधीन झाला .माझ्या संसाराची वाताहत झाली संपल सार वाटत होत तरी माहेरच्यांना किव नाही आली हो .."

जया ढसाढसा रडत होती .सारंग शांत शुन्य नजरेत बघत बसला होता .

जयवंतराव म्हणाले,"सूनबाई चुक लक्ष्यात आली ना ?आता नका मनस्ताप करून घेऊ दोघा नवराबायकोंनी अगोदर मनातले गैरसमज दुर करा ..आम्ही आहोत ना ?चुकतात वाटा कधीकधी मग हारायचं असत का?"

"आप्पा अहो संपल होत ना ?सार ,पण तुम्ही सावरता आहात ना?आम्हाला.शेवटी तुम्हालाच मुलाची व सूनेची किव आली माझा पाठिचा भाऊ बहिण बदलले पण माझ्यापाठीमागे नितिनदादा व माई उभ्या राहिल्या .शेवटी परिवारच कामी आला हो..!"

"जया आता नको ना ?मनस्ताप करू अगं तुम्ही स्वतःहून थोडच केल असणार हे ..पण सांगणारे व आपल्याला वाईट मार्गाला लावणारे असतात ना ?त्यांच किती ऐकायच हे आपण ठरवायचं पण तुम्ही वाहात गेलात व फसलात येथेच चुकलं बघ..चुकितूनच शिकतो माणुस .."

सारंग फक्त ऐकत होता.

"चुक कोणाची ?कोण बरोबर ?कोणी भरीस घातलं?कशासाठी केल?कशामुळे सारंग व्यसनाधीन झाला हे सोडा आता ..मुल व घरसंसारात पुन्हा व्यस्त व्हा ..आम्ही तुम्हाला यातून बाहेर पडायला मदत करतो त्याचा गैरफायदा न घेता नात्यांना जपा ..व पुन्हा उभारी धरा ..एकदा कि सार ठिक व सुरळीत झाल ना?मग तुझे भाऊ व बहिणही तुझ्याकडे परततील बघ .."

जयाला नितिनदादाच बोलण बरोबर वाटत होत.

आप्पा म्हणाले,"आता नको हा विषय चिघळायला ..सारंग मी तुझ्यावर विश्वास टाकला रे .!आता जरा सुधर बर ..नितिन तुम्ही लक्ष देत रहा रे याच्यावर.."

नितीन म्हणाला,"आप्पा आजपासून मी सारंगला सोबतच ठेवतो ना ?काय सारंग ह्या वेड्या भावाची संगत चालेल ना?तुला .."

सारंग नितिनच्या जवळ आला व ढसाढसा रडु लागला ,"दादा माफ कर रे मला ..तुझ्यासारखा भाऊ मिळाला हेच माझ पुर्वजन्माच पुन्य बघ..जया बोलली ते खरच आहे रे ..खरतर तुम्ही मला घरातून हकलायला हवं होत, पण तुमची माया व प्रेम बघून मी जे गमावल त्याच काहीच वाटत नाही रे..आजपासून मी माझ्या मोठ्या मनाच्या भावासोबत अभिमानाने वावरेल बघ.."

"चल मग हो तयार लगेच जाऊ कामावर .."

नितिन बोलल्यावर सारंग लगेचच तयारीला चालला गेला .सारंगचा चेहेरा खुलला होता .जयाही आता नितिनदादाच साथ देतात म्हणून निश्चिंत होती..जयाने पटकन दोघांचा टिफिन भरून आणला ...आज किती दिवसांनी सारंगने उभारी धरली होती व जयाच्या बोलण्याला दूजोरा दिला होता.हळूहळु नात्यामधील कटुता संपणार होती .फक्त जयालाच विस्कटलेली घडी संयमाने सोडायची होती.

तारामती आप्पांना म्हणाल्या,"अहो माझ्या मुलांना तुम्ही तोडलं नाही जोडलं हो..!आता माझी काहीच इच्छा नाही ..मी आजही डोळे मिटलेत तरी ..मेघा व जया परिवाराला सावरून नेतील बघा.."

नितीन आईला म्हणाला ,"ये आई वेडी आहेस का?अग तुझ्यामुळे ह्या गोकुळाला शान आहे गं..तु हवी आहेस आम्हाला .."

दोघी सुनाही तारामतीला म्हणाल्या,"आई अहो तुमची सर आम्हाला थोडीच नातसूनांना तुमची साथ लाभू द्या ना?..."

पुन्हा एकत्र व आनंदात परिवार बघून जयवंतराव खुश होते .सुखी परिवाराला ग्रहण लागता लागता परिवार तुटता तुटता वाचला होता ...

क्रमःशा

©®वैशाली देवरे
राज्यस्तरिय करंडक कथामालिका
सामाजिक कथा
शिर्षक -धागे नात्यांचे
जिल्हा नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//