Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

धागे नात्यांचे भाग-९

Read Later
धागे नात्यांचे भाग-९


सारंगच व्यसनाधीन होण जयवंतरावांसाठी धक्कादायकच होत.पण तो त्याच्या आहारी का?गेला व कोणती गोष्ट घडली कि त्याला दारूचा आधार घ्यावा लागला हेही पालक म्हणुन समजून घ्यावच लागणार होत..तारामती तर पुरत्या गोंधळल्या होत्या ...समाजात एक वेगळीच छबी असणार कुटुंब आज जगासाठी हसू झालं होत...

आपण कुठे चुकलोत का? जास्त बंधने मुलाला व्यसनाधिन बनवल कि जास्त सुट दिल्याने तो तसा बनला नाना विचार जयवंतरावांच्या डोक्यात दंगा करत होती .पण मुलाला सावरण्याच एक बाप म्हणुन त्यांनाच कराव लागणार होत...हताश सारंगला बघता बापाच काळिज आतुन पोखरून निघाल होत ...

जयवंतराव सारंगजवळ गेलेत ..सारंगच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले

"बोल रे सारंगा बोल...काय कष्ट होते तुला कि तु हा मार्ग निवडलास रे ...एखाद्या पार्टीत किंवा कधीतरी मित्रांबरोबर घेण वेगळ व असा कायम व्यसनाधीन होण वेगळ रे बाबा ...कोणता असा आघात तुझ्या मनावर झाला तु प्यायला लागलास रे.."

आप्पा कळकळीने बोलत होते .तोच जयाही आली ..घरात काय गोंधळ चालला म्हणुन मेघाही मागोमाग आली .तस मोठ्यांमध्ये मेघा कधी बोलत नव्हती पण सासूबाईचे थरथरणारे हात बघून ती घाबरलीच ...तीने तारामतीच्या खांद्यावर हात ठेवत सहारा दिला ...तीलाही हे सार नवखच होत...भल मोठ घर व मुल नसल्याने घराला घलपणच नव्हतं ...दिवसभर थकलेली कधी झोपी जात होती कळत नव्हतं...पण एकदा नितिने  विचारलं होत...

"सारंग पितो का?मेघा "

तेव्हा ती म्हणाली होती ,"छे काय हो तुम्ही काही संशय घेता हं..!..स्वतःच्या भावाबद्दल बोलतांना लाज कशी वाटत नाही हो..!"

तेव्हा तो म्हणालाही होता ,"अगं माझ्या कानावर पडलं गं..म्हणुन विचारतो बस तु घरी असतेच त्याला बघतेस ना ?म्हणून .."

मेघाला खरच वाटल नव्हत तेव्हा पण हे प्रमाण खरतर दोन /तीन महिण्यातच जास्त झाल होत...

आप्पांच्या त्या स्पर्शाने सारंग घडाघडा बोलू लागला होता ....

"आप्पा चुकलो मी व चुकतो आहे पण काय ?करू हो मी ...आप्पा खरतर मी तुमचा विश्वासघातकी आहे बघा ...दादाला व तुम्हाला गंडवल आहे मी ....घरातील पैसा बळकावला मी ...व आपल्या अंगावर येऊ नये म्हणुन मी तो सासरच्यांच्या नावावर चालवला हो..!...जयाच्या बहिणीच्या नावावर जमिनी घेतल्या घर घेतलं...आप्पा पैसाही साल्याच्या नावावर टाकला ....आणि हे करतांना मी इकडचा हिशोब ठासळू नये म्हणुन कर्ज काढत बसलो बघा ...एक एक करत कर्जाचा हप्पा थकत गेला ...डोक्यावर भरभसाठ कर्ज झाल तेव्हा मी माझी प्रापर्टी विकायच ठरवल तर ...सारे नाकबुल झाले हो....!"

सारंग ठसाठसा रडत होता व जया खाली मान घालून ऐकत होती .आप्पांचा संताप वाढत होता ...
"म्हणजे...सुनबाईला हे सार माहित होत.."

"हो आप्पा ...तीही माहेरच्यांच्याच बाजून आहे हो..!...तीच्यामुळेच तर मी आज बरबाद झालो ना ?तीचा हव्यास तीची अतिमहत्वकांक्षा ...मला सार करण्यास भाग पाडलं...जीवाच्या भावाला सुध्दा मी नाही सांगितल हो..!"

"सुनबाई..काय आहे हे ..सारंग बोलतो ते खर आहे का?...तुम्हाला हे सार माहित होत म्हणुन तुम्ही इतक्या शांत होता म्हणायचं...नाहितर आकाश पाताळ एक केल असतं....काय गरज होती हो इतक्या उपादी करायची ...चांगले संबध खराब केलेत बघा ...काय कमी पडल होत तुम्हाला त्यात आजून संपत्ती हवी होती ...आपल्या नवर्याला खड्यात घातलत तुम्ही सूनबाई त्याचा आत्मविश्वास व सारच ढासळल हो .!."

जया आता पुरती अटकली होती .खरतर माहेरच्या लोकांनीही तीची फसवणुकच केली होती व सासरीही बदनामीला सामोर जात होती ...

"आप्पा माझ चुकलं मान्य आहे ...पण माझ्या माहेरच्यांनी नाही दगा दिला देणार आहेत ते पैसे पण आज नाहीत त्यांच्याकडे व यांना आता हवे आहेत हो...! "

"अहो...सूनबाई गरज आहे त्याला तर आताच मागेल ना ?...आजही विश्वास ठेवता तुम्ही त्या लोकांवर ...अहो कष्टाची संपत्ती ती कष्टाची हो ...वाईट मार्गाने जमवलेल सारच गेल ना ?वाया ...अहो गोकुळ होत हे गोकुळ पण ह्या गोकुळात घाण केलीत तुम्ही कळतय का?तुम्हाला .."

आप्पांचा संताप अनावर झाला होता पण आता जयाही शांत बसत नव्हती ...

"आप्पा तुमचा मुलगाही तेवढाच दोषी आहे मी सांगितल व त्यांनीही ऐकलं ना ?...मी मागेच थोडी लागली होती त्यांनाही हाव होतीच कि माया जमवायची.."

तारामती व मेघा जयाच्या बोलण्याने दचकल्याच ..तारामती म्हणाली ,"जया अग आजवर तुझं सार सहन केल गं ...तुझ्या चुकांवर पाघरूणही घातल पण तु तर घरचाच भेदी निघालीस ...अग गोकुळात घाण केलीस तरी माहेर माहेर करतेस ...अग तुझ्या कर्माची फळ बघ न पैसा व संपत्ती राहिली न तुझा सोन्यासारखा संसार... अग चांगल्या कर्त्या पुरुषाच कटपुतल करून ठेवलस तु ..."

सारंग फक्त रडत होता व आईवडिलांपुढे क्षमेची याचना करत होता ...सारंग मेघाला म्हणाला ,वहिणी मी तुमचाही गुनेगार हो..!...जयाच्या डोक्याने चाललो व हसत खेळत घर खंडर करून बसलो बघा ...दादाला आजवरच काही माहित नाही हो...तो कसा माफ करेल मला किती विश्वास होता त्याचा माझ्यावर ...मोठा अधिकार मला दिला होता त्याने...मुलांमध्येही भेदभाव केला हो मी ...भावंडाना ही एकमेकांपासून दुर नेल हो मी .माफ करा मला .."

"आप्पा व आई माफ करा मला पण मला पिण्याशिवाय चैन पडत नाही हो..!मी जर पिलो नाही ना तर माझ मन मला सतत सतावत बघा ...मी घरचा भेदी आहे आप्पा ...माझी औकात नाही हो ...तुमचा कारभार सांभाळायची ...मी तुमच्या संसाराची वाट लावली आप्पा ..फक्त आणि फक्त ह्या बाईच्या नादी लागून ..".

तारामती व जयवंतरावांना सारंगचा हताशपणा गहिवरून सोडत होता .चुक तशी छोटी नव्हतीच ...आता ती सगळ्या घरच्यांना घेऊन मरणार होती .नितीनला सारा प्रकार कळल्यावर आजुन एक संकट पुढ्यात उभ रहाणार होत....व्यसनाधीन मुलाला आपल्यापासून दुर कस करणार ह्याचीही चिंता सतावत होती...पण काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागणार होता ...थकलेला जरी असला तरी बाप व कुटुबांच आधारछत्र भक्कम होत...

आप्पांनी सारंगला जवळ घेतल ,"सारंगा तु चुकलास व तुझी बायकोही ...पहिला गुन्हा मी णाफ केला होता पण तु तो लपवण्यासाठी किती कांड केलीत व त्या कांडात तुलाच घेऊन डुबलास रे ..आता निर्णय घेतांना मला नितीनलाही विचाराव लागेल बघ ...घरचा मोठा मुलगा आहे तु तु त्याचही नुकसान केलस रे...आजवर प्रामाणिक असणार पोरगं तुझ्या कर्माची फळ त्यालाही भोगावी लागणार बघ...काय?दोष रे त्याचा तुझ्यावर केलेल्या वेड्या मायेचा का अतीविश्वासाची परतफेड ही ...आता आल्यावर बघु काय करायचं ते ...पण सुनबाई तुमच वागण घराला घेऊन डुबल हो..!हा जयवंता कधी समाजात हारला नव्हता त्याला पोटच्या मुलानेच हारवल बघा .."

आनंदी घरात आता एकमेकांवर दोषारोप व अविश्वासाचा काळोख पसरला होता नितीन आल्यावर पुढचा निर्णय होणार होता ....

क्रमःशा

(नितीन आता काय?ठरवेल जयवंतराव कोणता निर्णय घेतील ..सारंगच्या चुकेला माफी मिळेल का?व सारंग त्याच व्यसन सोडेल का?त्यासाठी वाचत रहा धागे नात्यांचे ...)

©®वैशाली देवरे..

राज्यस्तरिय करंडक कथामालिका
सामाजिक कथा
कथेचे शिर्षक-धागे नात्यांचे भाग -९
जिल्हा -नाशिक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//