धागे नात्यांचे भाग-६

पारिवारिक नात्यांमधील किलिष्टतेचे चित्रण

राज्यस्तरिय करंडक कथामालिका

टिम ईरा नाशिक

सारंग व जया आता सेफ झाले होते .नाही नाही करता बरीच संपत्ती कमवून घेतली होती .जयवंतरावांची कडक नजर होती पण सार काही निस्तरुन ठेवल होत लेकाने ...तारामती तशा विचारी होत्या .एके दिवशी त्या जयवंतरावांना म्हणाल्या

"अहो..सारंग व जया दोघेही चालू आहेत .दोघ मुलच त्यांना जरा दिशाच्या नावावर चार पैसे टाकले तर बर होईल हो ..!,आपल्याला मुलगी नाही नातीसाठी काहितरी कराव अस वाटत बघा .."

जयवंतराव म्हणाले,"बरोबर आहे तुमचं सरकार पण आईवडिलांचीही जबाबदारी आहे ना ?त्यांनाही कळू दे कि संसार...लग्नात करू ना मदत आजच सोय करून ठेवली तर मग काय?करतील मुलांसाठी ...नितीनने आता जरा संसारात लक्ष घालायला हवं ना?..."

तारामती शांत बसली .मेघालाही आता जरा काळजी लागुन राहिली होतीच ..यश असाही दहावी झाला होता व दिशाही डोक्याला लागू लागली होती ..पोरीची जात वाढायला लागली कि पटकन वाढते ...तीच्या लग्नाची सोय करायला हवी आताच साठवलं तर हळुहळू साचेल जीवावर येणार नाही ह्याच मताची होती ती ..

रात्री नितीन आल्यावर तीने नितिनला सांगायचा प्रयत्न केला.

"अहो..मी काय ?म्हणते जरा आपलाही विचार करा हो..!.सतत भाऊ आई वडिलच नका धरून बसू ..उद्याची काय परिस्थिती असेन सांगता येत नाही एखादी एफ डी किंवा थोडेतरी पैसे दिशाच्या नावे टाका की ...पोरगी आता येईल हो लग्नाची ...आपल्या मुलांची जबाबदारी आपण नको का?घ्यायला .."

नितिन म्हणाला ,"काय हे खुळ मेघा ..आप्पा आहेत ना ?...व तेव्हा सगळेच करतील मदत नको अस चोरून पैसे टाकायला ..तीच नशिब व ती एकुलती एक मुलगी आहे घरातली ...सारंगही जीव लावतोच कि ...अस लग्न होऊन जाईल बघ ..नको चिंता करू .."

"अहो पण..आपली मुलगी दोन पैसे गाठी असावेत कि नाही .जरा लक्ष द्या हो संसाराकडे ...गाफिल नका राहु असे मोकळ्या हताने नका राहु हो...जरा ऐका माझ मी म्हणतं नाही लगेचच टाका थोडे थोडे पैसे साचवू शकतो ना ?"

नितिनने फक्त मान हलवली .तसा तो श्रावणबाळच होता ..मेघा काय म्हणाली हे सार आईला सांगणारच होता म्हणुन ती सहजचं बोलली.

"आता सकाळी आईला मी काय?म्हणाली ते सांगा हं.."

नितिनने "हो ..! मग सांगावच लागेल "
म्हणत दुजोरा दिला .व कटकट सुरू केली .

"बायका ना डोकं फिरवतात बायकांच्या डोक्याने चालल ना ?सार्या संसाराच वाटोळ होत बघा .ह्या बायकांपाईच रामायण ,महाभारत घडल ...आता काही बोलू नको माझी पोरगी आहे मी कसही करेल लग्न ..तु फक्त तुझ्या कामाशी काम ठेवं..."

मेघाही शांत बसली .मेघाच बोलण नितिन कधीच मनावर घेत नव्हता .तो फक्त नवरा होता तिच्या शब्दाला किंमत अशी त्याच्या माथीच नव्हती त्यामुळे घरातही तो हो म्हटला कि तीचाही होकारच असेल असच परिवारात समजलं जात होत...मोठी सून असली तरी कोणत्याही गोष्टीत तीची बाजू कधीच समजून घेतली जात नव्हती ...तसही तीने नवर्याचा स्वभाव चांगलाच ओळखला होता बरेचदा नको त्या गोष्टी अंगावर आल्यावर तीच्यावर त्याने ढकलल्या होत्या ...

म्हणतात ना ?नवर्याची साथ बायकोला असली तर सार सुख पायाशी असत ,पण मेघाच्या बाबतीत तेच नव्हतं...प्रामाणिक ,कुटुंबवात्सल्य व परिवाराचा आपल्या बायको पोरांपेक्षा जास्त विचार करणारा नितिन दैव कृपेने तिचा नवरा होता ..ते तीने मान्यही केल होत ..आपल काम भल्ल व ती भल्ली असा तीचा स्वभाव होता कोणत्याही गोष्टीत ती पडत नसे व उगाऊपणा तर मुळीच नव्हता तिच्याच ..कधी कोणी बोलल तर उलटून बोलणही नव्हतं..संस्कारी व सुसंस्कृत अशी मेघा मोठ्या सुनेच कमी पण प्रामाणिक व कुटुबवात्सल्य सुनेच कर्तव्य पार पाडत होती ..

***

दुसर्या दिवशी सकाळी सगळे चहा घेत असतांना नितिन तरी पचकलाच ,"आई मेघाच म्हणणं आहे दिशाच्या नावावर जरा पैसे टाकायला हवीत तुला काय ?वाटत गं ..!"

आईला तर बरच वाटणार होत ना ?"अरे बरोबरच बोलते ती ..थोडीफार बचत हवीच ना दादा .."

"अस म्हणतेस "नितिन मेघाकडे बघत म्हणाला

तोच जया म्हणाली ,"दादा तुम्ही आजुन हा विचारही केला नाही अहो कधीचेच पैसे टाकायला हवे होते ..? मला तर वाटल तुम्ही बरेच पैसे साठवले असतील दिशाच्या नावावर .."

"म्हणजे ...मी कुठुन आणणार पैसे ...सारा चोख हिशोब देतो  आप्पांना आजवर नाही वाटल मला अस चोरून पैसे ठेवणं ...तुम्ही सारा परिवार असतांना दिशाच्या लग्नाची काय ?चिंता मला .."

जयाचा चेहेराच पडला तीने रागातच सारंगकडे बघितलं ..

"दादा बरोबर आहे तुझं एकुलती एक मुलगी करु तीच लग्न धुमधडाक्यात नको आजपासून विचार करूस आजुन लहान आहे ती .."
आतातर जयाचा चेहेरा रागाने लालच झाला .

मेघाही चिडली होती नवरा बायकोचा विषय असा परिवारात आणला होता नितिनने ..तिला कळत नव्हत काय?बोलावं.पण मनातन म्हणतं होती

"काय म्हणावं नवर्याला भोळा कि आतीवेडा ...याला आपल्या बायको मुलांच हितही कळू नये ...ह्या परिवारावर जीव टाकतो त्याच परिवाराने नंतर दगा नको द्यायला नाहितर असा तुटेल देवा कि मला सांभाळण आवघड होऊन बसेल.."


मेघाची चिंता वाढली होती तर नितिनचा बिनधास्तपणा तसाच होता .सारंग बोलल्यापासून तर जास्तच निवांत झाला होता ..कामावर जातांना तो मेघाला टोमणा मारूनच गेला ..

"बघितल ना ??माझा भाऊ काय?म्हणाला ते ...दिशाचा काकाच करून टाकेन लग्न ..."

मेघाने फक्त शांततेने ऐकून घेतल होत ...जे होईल ते आता फक्त बघत बसायच व काही वाईट घडल तर झेलायला तयार राहायचं असच तीने स्वतःला सांगितलं...

क्रमःशा

(पुढे बघू काय काय रंगते ह्या परिवारात त्यासाठी वाचत रहा कथा "धागे नात्यांचे..")

©®वैशाली देवरे
जिल्हा -नाशिक

🎭 Series Post

View all