धागे नात्यांचे भाग -१३

पारिवारिक नात्यांमधिल किलिष्टतेचे चित्रण


आता घरच्यांच्या निर्णयाला विरोध करण म्हणजे मुर्खपणाच होता.

तारामती ,नितिन व मेघाला वाटणी होवू नये असचं वाटत होत..शेवटी नात्यांचे धागे घट्ट होते .आपल्याच माणसांना दुर सारत त्यांची विटंबना होतांना कोणत्या परिवाराला आवडत बर...समाजाला काय हो नाव ठेवायची असतात व चांगल्या घरात काहीतरी चुकिच घडवायच असत नाही का?..तसच तर ह्या हसत्या खेळत्या घरात झाल होत बघा ..सारंगला मित्रकंपनी व सासरच्या लोकांनी भरिस पाडून आज देशोधडीला मिळवल होत नाही का?..

आप्पांनाही तिघांच म्हणणं पटत होत.वाटणी केली तर शेवटी सारंग हातचा बिघडणार होता .जयाला बघून त्याच व्यसण सुटणार नव्हत..दोघ सोबत राहुन त्यांचे वाद वाढणार होते..समाजाला हसू होणार होत त्यापेक्षा नितिनच्या व मेघाच्या हातात सारी सत्ता देय परिवाराला सावरण हा ऐकच पर्याय जयवंतरावांसमोर उरला होता...इतके दिवस त्यांच्यावर होणारा आन्याय ही त्याने थोड्याफार प्रमाणात मिटणार होत..जयवंतरावही संसारातून सुटणार होते व सारंगची जबाबदारी नितिनवर पडणार होती..

"नितिन ,मेघा व सरकार  तुमचही बरोबर आहे ..पोरांचा,ऐकिचा व परिवाराचा विचार आपण करायला हवा ..त्यासाठी मी आता असा निर्णय घेतो.." सारेच  शांततेने ऐकत होती.

"हे बघ नितिन आजपासून मी सारंगच्या हातातले सारे व्यवहार व तुझेही व्यवहार तुझ्याकडे देतो.सारंगने सतत तुझ्यासोबत राहुन मदत करायची .घरच्या संपत्तीची वाटणी हि दोघांची बरोबरीनेच होईल पण त्याआधी दिशाच लग्न दोघांच्या संपत्तीतील कमाईतून होईल.सारंगला मुलगी नाही तीच्या लग्नासाठी वर्षा दोन वर्षात त्याच्याकडे पैसे आलेत तर तो मदत करू शकतो .माझ्या नावावरचा पैसा माझाच असेन पण मी गेल्यावर तो चौघाही नातवंडात व सरकारमध्ये वाटला जाईल.घराची धुरा मोठ्या सूनबाई मेघा सांभाळतील..जया तुम्हाला सारंगसोबत राहुन व्यवसायातल व्यवहारज्ञान कळल आहे .नितिनला मार्गदर्शन व मदत करण्याच काम तुमचं...चौघाही मुलांच शिक्षण कमाईतील पैशांतूनच होईल.दोघांनी केलेल्या कष्टातील पैशांचा समसमान वाटा असेन..मान्य आहे का?तुम्हाला .."

तोच तारामती बोलली ,"अहो नितिन मोठा मुलगा बिच्चाराने सतत समजून घेतल आजही ह्या घराचे तुकडे पडू नाहित म्हणून त्यानेच नमत घेतल त्याला जरा उजवा वाटा द्या हो..!"

"हो हो सरकार माझ्या लक्ष्यात आहे ते ,मला रिटायर्टमेंटनंतर मिळालेल्या पैशातून मी एक गुंतवणुक केली होती शहरात त्याचा एक प्लाँट आहे तो नितिनची समजदारी,तारतम्य व परिवाराप्रती जान ह्या गोष्टिखातर बक्षिस देणार आहे मी ह्यावर कोणाचाच हक्क नाही तो माझा होता व मी माझ्या संमतीने नितिनदादाला देतोय.वाटणी झाली म्हणजे बाजुला राहायच अस नाही हं..!तुम्ही दोघांनी आमच्या सोबत एकाच घरात राहायचं हे फक्त नाव ठेवून मी लिखापटटी करून ठेवतं म्हणजे सारंगकडून झालेली चुक नितिनकडुन किंवा कोणाकडूनच होणार नाही "

मेघा व नितिन आवाक् झालेत ."आप्पा तुम्ही सोबत रहा बस एक मुलगा मला नको तो प्लाँट मला ..तुमचे आशिर्वाद हवेत बस.."

"नितिन मी माझा निर्णय सांगतो विचारत नाही .."
"सारंग मान्य आहे का ?तुला "

आप्पांनी विचारताच सारंग उठुन उभा राहिला ..

"अहो आप्पा मी इतके वर्ष व्यवहार सांभाळून दादाच व तुमच किती नुकसान केल तरी तुम्ही दोघांनीही माझा व माझ्या परिवाराचा मुलांचा विचार केला .खरतर आज मला संपत्तीपेक्षा तुमची साथ हवी होती ती दिली यातच धन्य पावलो हो ..!मान्य काय एकदम मान्य आहे बघा .."

जया म्हणाली,"नितीनदादा,माई आप्पा आई खरतर तुमचा आशिर्वाद व साथ भेटली हेच खुप झाल बघा मी माझ्यापरिने सारीच मदत करायचा प्रयत्न करेल.."

नितीन म्हणाला,"आप्पा वाटणीची घाई होती का?हो."

"काय आहे ना ?नितिन मी फक्त वाटणीला नाव ठेवलीत बस व हे योग्यच केलं..आता परिवाराची गेलेली लया तुम्ही दोघ भावांनी परत आणायची ...त्यासाठी सर्वात महत्वाच म्हणजे सारंग तुला दारू सोडावी लागेल बघ...मला वचन दे..मी येथून पुढे दारूला शिवणारही नाही म्हणुन.."

सारंग शांतच बसला होता.व्यसन होत ते सहजा सहजी थोडीच सुटणार होत.त्याच मन आधीच हारल होत व त्या हरलेल्या मनाला शांत करायला तर त्याने दारूच व्यसण लावून घेतल होत.सार वैभव ,एक रूतबा होता तो ...सोबतीचा महाराजासारखा थाट होता ,सगळच गेल्यावर त्याच्या मनावर मानसिक आघात झालेला होता.

सारंग म्हणाला ,"आप्पा ,दादा खरतर मी तुमचे हे ऋण कधीच विसरणार नाही पण तुमची इच्छा इतक्या पटकन पुर्णही करू शकत नाही बघा ...मला माफ करा ..मला माझ वागण आठवल तरी त्रास होतो हो ..माझ्या जगण्याचा आधार झाली ती दारू ..पण मी प्रयत्न नक्किच करेल ...आता तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे पण मला सावरायला व सुधरायला वेळ लागेल.."

तारामतीने सारंगच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं,"सारंगा होईल रे निट सार ..तु प्रयत्न कर रे आम्ही आहोत ना सोबत मग कशाला घाबरतोस .."

"हो गं आई मला तुमच्या छत्रछायेत ठेवल ना ?आता मला काही होत नाही बघ ...आपलं घर पुन्हा हसत खेळत होईल म्हणजे होईल ...हे वचन आहे माझं..."

सारंगच्या बोलण्याने सार्यांनाच उभारी मिळाली होती ...


©®वैशाली देवरे

राज्यस्तरिय करंडक कथामालिका

सामाजिक कथा

कथेचे शिर्षक-धागे नात्यांचे

जिल्हा -नाशिक

🎭 Series Post

View all