Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

धागे नात्यांचे भाग-१२

Read Later
धागे नात्यांचे भाग-१२


सांरग व्यसनात डुबला होता पण भावाने त्याच मन समजून घेतल होत .जयवंतरावांना पुढचा निर्णय घेण सोपं जाणार होत.तारामतीणीही चिंता मिटणार होती .मेघाची समजदारी व मोठेपणाचा परिवार सावरायला उपयोगच होणार होता.

जयाला मात्र परिवाराची साथ हवी होती .ती देवाच्या धावा करत होती .सारंगला तस काही सोयरसुतक नव्हतं..जया सारंगला म्हणाली,

"अहो माझं चुकलच हो ..! तुम्ही माझ्या सागण्यावर सार केल पण माझेच नातलग दगा देणारे निघालेत त्यात मी काय करू ..तुम्ही माझ्या चुकिची शिक्षा स्वतःला का?करून घेतात हो..!.उद्या घरात आप्पा महत्वाचा निर्णय घेणार आहेत त्यांनी वाटणी केली तर रस्त्यावर येऊ हो आपण ..तुमच अस सततच पिणं त्यात सारच हातच जाईल.. आधाराला कोणी उरणार नाही हो.."

सारंग फक्त एकत होता ,"तुझेच भोग आहेत हे तु केल त्याची शिक्षा भोगतो आहे मी ..माझ्याच चुकिचे प्रायचित्त करतो आहे मी ...मी सार्या परिवाराला धुळिस मिळवल एका नालायक बाईच्या नादी लागून ..आता काय करू मी तुच बघ आता ..."

"अहो..मी वाटलस तर आप्पांचे पाय धरते हो .माहेरच जाऊ द्या पण हे माणस नको हो तुटायला .आपण पाप केल त्याची शिक्षा भोगतो ना ? चोरीने मिळेवलेल चोरीतच गेल हो ..चुकली मी पण आता डोळे उघडलेत ना माझे.."

सारंग चिडलेलाच होता ."तुझे डोळे उघडलेत का?परत नाटक चालवून आजुन धोका द्यायचा घरच्यांना ...नवर्याला संपवलसं तु .."

सारंग सतत सार्या गोष्टीचा दोष जयावर टाकत होता.घरच्याचा विश्वासघात केल्याचा पश्चाताप त्याला सतावत होता .आठवण झाली ,त्रास झाला कि दारूला जवळ करत होता .

***

सकाळ झाली तस घरातील सार्यांची धाकधुक वाढु लागली .आप्पा रात्रीच बोलले होते सकाळी सगळ्यांनी आवरून माझ्या खोलीत यायचं म्हणुन तारामती तशी आप्पांच्याच खोलीत बसून होती ..लहान लहु पोरगं सारंग आईचा जीव आडकलेला ..एकदा कि वाटणी केली तर कायमच दुरावणार होत .व्यसन आधीकच घट्ट होणार होत.आता तरी डोळ्यासमोर दिसत होता नंतर तर दिसणारही नव्हता..

"अहो चुकल हो पोर पण जरा त्याचाही विचार करा हं..!मी तुम्हाला विनंती करते कधीच काही मागितल नाही मी आज पदर पसरवते हो पोराचा योग्य न्याय करा ...धनी".

तारामती जयवंतरावांना थोड्या थोड्या वेळात आठवण करून देत होती..

सकाळचे दहा वाजलेत तसे दोघीही जोड्या आप्पांच्या खोलीत आल्या.सारंगकडे बघतच आप्पा म्हणाले,"काय महाराज उतरली का?.."

वडिलांच वाक्य ऐकताच लाजेने खाली गेली .बराच वेळ शुकशुकाट होता .जयवंतरावांनी सरळ सरळ विषयालाच हात घातला ..

"हे बघ सारंग .."

"आणि जया तुही ऐक,काही वर्षापुर्वी मी तुम्हाला तुमचे हे उद्योग समजल्यानंतर वार्निंग दिली होती आठवत ना?तेव्हाच तुम्ही \"त म्हणता तपिल \"समजला असता तर लोकांनी अविश्वास दाखवला नसता बघा तुमच्यावर ,तुम्ही आम्हा सगळ्यांना गंडवून सार जमवलं तेथेच तर त्यांच फावले ...तुम्ही तेथेच अविश्वासाला पात्र आहात हे कळल बघा ...सारंग तु तर समजदार होतास ना ?कसा फसला गेलास रे व जया आतातरी तुला तुझ्या चुकिची जाणिव झाली ना?..कि आजुनही संसाराची वाताहत करून घ्यायची आहे .अगं क्षणिक मोहापायी नवरा हातचा घालून बसली ना बाई तु .."

आप्पा खूपच चिडलेले होते.सारंग तर शांतच होता .त्याने जयाला ताकिदच दिली होती मी घरचे बोलतील ते मान्यच करेल काढु दे मला बाजुला आता तु सावर सार...तिला काय बोलावं सुचत नव्हतं ..शरमेने झुकलेली होती ती पण बोलावं तर लागणार होतच मोठ्या हिम्मतीने तीने बोलायला सुरवात केली..

"आप्पा आई मी खरच खुप चुकली हो ..!.माझ्या माणसांवर अविश्वास दाखवत मी सार माहेरी वाहिल पण देवाने त्याची शिक्षा दिली मला .चोरीचा माल चोरीतच गेला पण मुलांचा विचार करा हो ..पोरांच्याही नजरेतून उणवतरुन जाऊ आम्ही ...ह्यांनाही तुमच्या आधाराची गरज आहे .माझ काहिच ऐकत नाहीत ना .काय करू मी ..नितिनदादा तुम्हिच समजून घ्या ना?..मला नका देवू काही वाट्याला फक्त तुमच्या सावलीत राहु द्या ना?..वाटणी झाली तर समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे उरणार नाहीत हो आम्ही ..एकदा दया करा आमच्यावर.."

जयाची केविलवाणी परिस्थिती बघून मेघा व नितिनला कसतरी होत होत .आप्पा व आई फक्त ऐकत होती.

नितिन म्हणाला ,"सारंग मी सतत तुझ्या सोबत आहे ..झाल गेल विसरुन जा फक्त ती दारू सोड रे बाबा .."

जया एका कोपर्यात ढसाढसा रडत होती .

मेघा जयाच्या जवळ गेली जयाला जवळ घेत म्हणाली,"जया अग तु माझ्या लहान बहिणीसारखी गं...आप्पांनी कोणताही निर्णय घेतला तरी कायम तुझ्या सोबत राहिल बघ ..तुम्हाला ह्या परिस्थितीत कस गं वार्यावर सोडु आम्ही "क्रमःशा


©®वैशाली देवरे

राज्यस्तरिय करंडक कथामालिका

सामाजिक कथा

कथेचे नाव- धागे नात्यांचे भाग-१२

जिहा -नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//