Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

धागे नात्यांचे भाग-३

Read Later
धागे नात्यांचे भाग-३

राज्यस्तरिय करंडक कथामालिका स्पर्धा

टिम -ईरा नाशिक

सारंगचा जयावरचा विश्वास दिवसेंदिवस घट्ट होत होता ..कारण रोज आईच तीच्या बद्दल बोलण त्याला जयावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत होत .तारामती तशा साध्यासुध्या इतके दिवस जपलेल्या ह्या गोकुळात वादविवाद व मोठ्या आवाजात बोलणही नव्हत ,पण आता घरात तुझं माझ होऊ लागल होत ...सकाळचीच गोष्ट होती ..यश व दिप सोबतच शाळेत जात यशला टिफिन भरून हवा होता .मेघा जरा वेगळ्या कामात गुंतली होती व यश सारखा ,

"आई चल ना मला टिफिन दे ..!"

म्हणुन भुनभुन करत होतो ...मेघा त्याला म्हणाली ,
"अरे काय रे यश, इतके दिवस तु अस कधी केल नाहीस ...काकीने दिपचा टिफिन भरला असेल ना ?सोबत तुझाही भरला असेल घे व जा ना ?"

यश जरा चिडलाच ..कारण त्याचा टिफिन काकीने भरलाच नव्हता ...तो जयाकाकीला म्हणाला

"काकी माझा टिफिन गं .."

तर जया चिडून म्हणाली ,"माईला विचार जा मी नाही बघितला तुझा टिफीन ..".

यशला जरा वेगळच वाटलं इतके दिवस कधी अस तुटक वागण नव्हतंच काकीच ..तो आईवर रागवून टिफीन न घेताच गेला ...

मेघाचे काम आवरल ती किचनमध्ये गेली तर यशचा टिफिन तेथेच पडलेला दिसला ...तीला जरा विचित्रच वाटलं ..जयाला तीने सहजच विचारलं .

"अग जया यशचा टिफिन नाही दिलास? "

तर ती मेघावर चिडलीच ..

"तुम्ही बघायच ना माई ..मी माझ्या मुलांच बघायच का ?तुमच्या .."

आज तर हद्दच झाली .माझ तुझ आल म्हणजे नात्यांचे धागे आता विस्कटू लागलीत म्हणायचं...ह्याच चिंतेत तारामती बेचैन झाल्या...कुठे चुकलं व कुठे सावरायचं हे सारच समजण्यापलिकडेच होतं..

म्हणतात ना ?एखाद्या घरची परिस्थिती व तेथिल गुण्यागोविंदाने नांदणार नातं लोकांच्या डोळ्यात खुपत व घरातील वातावरण गडुळ करण्यासाठी मग दुश्मन काय ? आपलेच जवळचे कारणीभुत ठरतात तसच येथेही होत...जयवंतरावांची भाऊकी तशी वरवर दिसता खुपच छान व चांगली होती ..पण जयवंतरावांच्या प्रगतीवर सारेच जळणारे होते ..कधी कोणापुढे न वाकणारा व मुलेही योग्य मार्गाला लागलेली तस कोणाला सहनच होत नव्हतं व त्याचींच फुस जयाला होती, आता तीलाही वेगळा  संसार थाटायचा होता ...

जयाच्या वागण्याने आता मेघाही दुखावली जात होती इतके दिवस लहान लहान म्हणुन दुर्लक्ष करणारी मेघा तीलाही तीचा स्वाभिमान होताच ...म्हणतात ना संबध चांगले असले तर तुरसट बोलणही मनाला लागत नाही व जर जरा नात्यात कटुता आली कि सर्वच गोष्टी चुकिच्या वाटु लागतात तसच दोघी जावांच होऊ लागल...

घरात असणार वातावरण बालमनावर पटकन हवी होत तसच झालं ...आता बाहेर जातांना सारंग व जया यश व दिशाला नेण्याच टाळु लागलीत ...त्यामुळे जयवंतरावांचा  संताप आता वाढलाच होता ..इतके दिवस शांत असणार्या जयवंतरावांनी सारंगला जाब विचारायचा व जयालाही समज द्यायची असा निश्चय केला ...

मेघाही नितिनवर आज नाराजच झाली होती .इतके दिवस परिवाराच सुख शोधणारी मोठी सुन आता मुलांसाठी मलाही बाहेर पडायचं अस म्हणु लागली होती ...दोघा नवराबायकोत खटके उडु लागले होते ...नितिन घरी येताच मेघानेही आबोला धरला होता ...तारामतीच्या डोळ्यासमोर घडणार्या ह्या घटना जशा संकटाची नांदीच होत्या ...दोन सोन्यासारखी मुल , सुना ,नातवंडांनी भरलेल गोकुळ आनंदांची होणारी बरसात ...आता कुठेतरी तो आनंद सुखत चालला होता ..तीने जयवंतरावांना हि खंत बोलूनही दाखवली

,"अहो मला अस वाटत आता आपला परिवार तुटणार ...किती समजदारीने वागत होती हो मुलं ..कुठे कमी पडलोत आपण ...कोणाची दृष्ट लागली ह्या आनंदी घराला ...काय ?वाईट केल हो आपण कुणाच.."

जयवंतराव तारामतीला शांत करत म्हणाले,

"सरकार मी भक्कम आहे हो आजुन तस काही होणार नाही बघा ..सार माझ्या हातात आहे ..कुठेच जात नाहीत बघा मुल हा दोन दिवसाचा दिखावा व माज आहे बस ..सगळे व्यवहार काढुन घेतले ना ?फडफडणारे पंख शांत होतील ...छोट्या सुनबाई त्यांची पायरी विसल्या बस समज दिली कि होईल सार..".

तारामतीला ह्या बोलण्याने धीर आला ...

सारंग सकाळी उठला आज सारंगला जरा समजवायचं जयवंतरावांनी ठरवलं..

"काय? चिरंजीव  जरा वेळ असेल तर आज उशिरा जा कामावर बोलायचं आहे मला तुमच्याशी .."

आप्पांच हे बोलणं जयाने एकलं होत..तीला काय होणार याची चुनचुन आधीच लागली होती तीने सारंगच्या मागे जात त्याला आप्पा काय बोलणार याची कल्पना दिली ..

"अहो मला वाटत आईंनी आप्पांचे कान भरलीत ...आता जाब विचारतील बघा तुम्हाला ..पण तुम्ही ही तुमच्या मतावर ठाम रहा ...अहो घाबरू तर आजिबात नका ...जे होईल ते बघून घेऊ ...फार तर फार काय ?करतील वाटण्याच ना ?..हेच तर हवयं आपल्याला .."

जयाच हे बोलणं ऐकून सारंग जरा चिडलाच ,

"जया किती स्वार्थी आहेस तु ...मला आज तुझे सारे खेळ कळु लागलेत ..अगं मला वाटलं आप्पा मी केलेल्या नविन व्यवहाराबद्दल बोलतील ...हिच कल्पना होती मला ...ह्यासंदर्भात बोलणं असेल तर आप्पा कुठे चुकिचे आहेत गं...तु काहीतरी मोठा घोंधळ घातलेला दिसतो ...तुही ना ?बायकाच नास्तिक असतात बघ ...अगं चांगल्या घराच वाटोळ कशाला करायचं ...छान चाललयं आपलं ...तुला बाहेरच जग दाखवलं हेच चुकलं माझं ...त्यामुळेच तु जास्त डोक्यावर बसायला लागलीस बघ ..".

जया आता जरा बिथरलीच ...तीची बाजु ती सावरू लागली .

"काय? हो तुम्हीही मी घरात रहाते माई व आई माझ्याशी नुसतं तुसड्यासारख्या वागतात ...तुम्हाला काय माहित मी भोगते हे सार ...शेवटी तुमचं काय ना ? तुम्हालाही हवयं बाजुला निघण पण मला बदनाम करून .."

सारंग आता चिडलाच ..

"जया शांत बस सकाळी सकाळी नको तमाशा मलाही कान व डोळे आहेत ...वहिणीचा व आईचाही स्वभाव माहित आहे ..आणि आप्पा काय बोललतील व मी काय बोलायचं हे मी बघून घेईन .."

त्याच्या ह्या बोलण्याने जया तावातावाने बाहेर निघुन गेली .सारंगला आता आप्पांना फेस करायचं होत ...इतके दिवस त्याचही चुकलं होत ,जरा नात्यांपासून तोही दुर जात होताच ...फक्त स्वार्थी वागण आल होत स्वभावात...


क्रमःशा....


राज्यस्तरिय करंडक कथामालिका स्पर्धा

सामाजिक कथा -

धागे नात्यांचे भाग-३

©®वैशाली देवरे

जिल्हा -नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//