जगूनी घे जरा

जगूनी घे जरा


आज छान वाक्य एकल की आयुष्यात मागे काय घडलं हे विसरल्याशिवाय पुढचे पाऊल पुढचं आयुष्य जगता येत नाही. तस पाहिलं तर तेव्हढच खर आहे..
जीवन जगताना आलेले वाईट अनुभव,वाईट माणसे,त्यातून झालेला त्रास आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही कधीचं विसरता येत नाही.पण तेच आठवत राहील तर वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही खराब होतो.जीवनात आनंद वाटत नाही की नवीन काही करायची इच्छा राहत नाही.माणसे तर नकोशी होतात.कोणावर हि विश्वास ठेवता येत नाही.
आयुष्याच्या वेलीवर नवे फुल फुलवायचे असेल तर खरच आयुष्यातील खूपशा घटना विसराव्या लागतात आजच्या भाषेत डिलीट कराव्या लागतात तरच नवीन पालवी फुटून आयुष्य पुन्हा बहरत..वसंत ऋतूतील झाडांसारख......
म्हणूनच आयुष्यातील मागच्या झालेल्या टप्प्यातील सर्व विसरून,आनंदाने,हसत म्हणावेसे वाटते....जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा......विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा....