प्राधान्य

प्राधान्य
भावनिक ( Emotional) हा शब्दच कुठेतरी गायब होत चाललाय की झालाय . जिव्हाळा ,प्रेम कुणाला काहीच फरक पडत नाही कुणाचा .गरजेनुसार वापर होतो प्रत्येकाचा...
ज्या दिवसात एकमेकांशिवाय न राहणारे,एका ताटात जेवणारे,एक फुल चाय अर्धा अर्धा घेणारे ,जे प्रेम ,सुख,मित्राच्या नशिबात नाही ते त्याला भेटाव यासाठी धडपडणारे....मित्राला घरातले बोलताना त्यांच्याशीच वाद घालणारे,त्याच्या आजारपणात त्याची आई होणारे नात अचानक कस बदलत?
कोणीतरी बोललं होत की बदल हा निसर्गाचा नियम आहे..वेळेनुसार जगण्याचे माणसांचे भावनाचें प्राधान्य ठरते.. खरच माणूस हा कसा एव्हढा स्वार्थी होतो??आणि प्रश्न पडतो की तो व्हायलाच हवा का???
एकाच काठावर असणारे दोन मित्र नंतर दोन काठावर का जातात...त्यातील दोघे बदलणारे असतील तर गोष्ट वेगळी..पण जो त्याच विश्वात राहतो त्याची तर हेळसांड होते .कारणं तो अजूनही तिथेच असतो ..मग त्यालाच सर्वजण Emotionalful बोलतात.
माणूस प्रामाणिक(Honest) कधीचं कुणाशीच नाही राहू शकत का ???
आपल्याला पण प्रश्न पडतो की जगताना प्राधान्य कशाला द्यावे??आपण कसे राहावे??