आहेस ना तू बरी??

आहेस ना तू बरी??


तसा नेहमीचाच प्रसंग घडला...जो प्रत्येकाच्या आयुष्यात घडला असेल आणि हे वाक्य घरातल्या मोठ्यांच्या तोंडून तर हमखास एकल असेल की ..दुधापेक्षा साय गोड.... माझ्याही बाबतीत तेच झालं ..त्यादिवशी घरात आई,मावशी आणि आजी भेटलो. घरातल्या नातवंडांना जवळ घेतलं गेलं .त्यांचे लाड झाले..त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला गेला त्यांना जवळ घेतलं गेलं. किती कौतुक त्या नजरेत....
थोडंसं बालिश वाटेल..पण तुलना नाही नी तिरस्कार पण नाही हा कुणाचा.....
पण तरी मला प्रश्न पडलाच कि....
आपल वय वाढलं की आपल्याला काहीच त्रास नसतो का?? स्त्री असो की पुरुष......
लग्न झाली मुल झाली..जगाच्या भाषेत संसाराची गाडी सुरळीत चालली .आयुष्य स्थिरसावर झालं .....की माणसाला गरज नसते का मायेच्या स्पर्शाची,आपुलकीच्या चौकशीची ...कोणीतरी जवळ बसवून विचारायची ..की कस चालू आहे?मजेत आहेस ना?काही अडचण.....
आपल्याला वाटत ना आपल्याला ही कुणीतरी कधीतरी प्रेमाने कुशीत घ्यावं नी विचारावं ...आहेस ना तू बरी??