व्यक्त व्हा

व्यक्त व्हा


कोणाशी बिनसलं! आपली बाजू खरी असून पण कुणाशी वाद झाला!कोणी आपल्यावर विनाकारण चिडल!घर असो की ऑफिस...
तर जमत का हो बोलायला लगेच?मनातली आपली विचारांची बाजू जमते का हो लगेच सांगायला? थांबते का मनाची घुसमट?
नाही ना.....याच बहुतेक वेळा कारण असतं आपला समजूतदारपणा!!!!
एक शब्द तर पाठ असतो.."जावू देत",सोडून दे...नात वाचवायचं असतं .जपायच असतं ना .
एक सांगू...व्यक्त व्हा.,बोला,जे मनात असेल ते बोलून टाका..आपल्या भावना आपले विचार समजू देत ना..त्यासाठी संवाद गरजेचा....
आपले असतील तर समजून घेतील आणि नाहीच घेतलं तर ते आपले नसतील.
एक छान वाक्य वाचण्यात आल आज.. मनातलं वेळेवर बोलून टाकता आल पाहिजे नाहीतर साठलेल्या भावनाच कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत.
आणि वेळ निघून गेल्यावर त्या बोलण्याचा ही काहीच उपयोग होत नाही ....
व्यक्त व्हा आणि मनाचे दडपण(stress) कमी करा .