जलद कथा(गेले ते दिवस पोरी भाग -१)

Those Days Were Gone

गेले ते दिवस पोरी  भाग -१

आई.. ए.. आई अग ही काय सवय तुमची माझ्या खोलीचा लाईट का लाऊन देतात तुम्ही ? आईईईई..इकडे ये बघू..

संतापून अनघा उठली आणि सार घर आईला शोधल पण आई काही केल्या मिळेना आणि इतक्यात समोरच्या टेबलला अनघा जोरात धडकली आणि तिचा हाथ अगदी दणकन आपटला..

आणि हाथाखाली लागलेली चिठ्ठी बघून एकदम तिला जाणवले..

अरे! आई तर बाहेरगावी गेली आणि ४ दिवस काही येणार नाही आता हे पुढचे चार दिवस अनघाला स्वतःला.. घर..लहान बहीण.. आणि वडिलांना सांभाळायचे होते.

चिठ्ठी...

अनघाच्या आईने एक चिठ्ठी लिहिली होती ज्यात सर्व रूटीन व्यवस्थित लिहिला होता कुठे काय आहे ? कसा करायचे? कोणाचे बिल द्याचे? किराणा कुठून आणायचा? आणि मुख्य पैसे कुठे आहेत? 

अनघा चिठ्ठी वाचतच होती की तिच्या फोन वर तिच्या परीक्षेचे वेळापत्रक आले ..

आणि क्षणात अनघाला टेन्शन आले.

पण एवढ्यात सुरू तिथे आली भूक लागली म्हणून तिच्या मागे लागली...

अनघाची ही पहिलीच वेळ होती की पहिल्यांदा तिच्यावर घराचा लोड आला होता सुरू मात्र काही शांत होईना आणि वडिलांना चहाची तलप लागली तशी अनघाला पण लागली होती...पण वेळेचा विलंब न करता तिने पटकन सुरू ..वडिलांना पोहे करून तिने वाढून दिले मात्र तिला स्वतःला काही उरले नाही परंतु जेवढे होते त्यात पोट भरून ती खोलीत बसली थोडा वेळ अभ्यास घेतला आणि दुपारच्या जेवणाची वेळ झाली...आणि तशीच परत अनघा कामाला लागली ...अशीच दिवसभर ती कामात गुंतून गेली अगदी वैतागली होती ती आणि रात्री तर ती चिडून गेली बाबांवर..पण अखेरीस दिवस संपला... रात्री विचार करत असताना अनघाला तिच्या आईची एक डायरी आठवली ज्याच्या विषयी तिची आई काही दिवसांपूर्वी तिला बोलली होती .. की फावला वेळ मिळाला तर नक्की वाच..

अनघाच्या आईची एक डायरी होती ज्यात ती तिच्या वेळेच्या आणि आताच्या वेळेच्या गोष्टी लिहीत असे जणू पुढच्या पिढीसाठी एक आरसा ..

तर अनघाने पाहिले पान उघडले...

नाव - मंदाकिनी (अनघाची आई)

त्याच्या अगदी पुढच्या पानावर पहिला किस्सा होता..

नाव होते - तिचा तोरा ...

आज अनघा पेपर देऊन घरी आली . आणि मी एवढेच विचारले कसा होता पेपर? 

तर मला कसे सूनावते!

तुला काय कळत आई ? तुमच्या वेळी काय पेपर होते का? आणि तुम्ही काय एवढ्या भारी कॉलेज ला होते का? 

आणि तिचे हे बोल ऐकून मला एकदम माझा भूतकाळ आठवला ...अर्थात तिच्या आजोबांचे बोल...

आजही आठवते..आम्ही जेव्हा पेपर देऊन यायचो दरवाजात आमचे वडील अर्थात अनघाचे आजोबा आम्हा चार बहिणींना विचारायचे..

 काय ग किती मार्क पडतील ? आणि आम्ही सांगितले की लगेच कालनिर्णय वर लिहून काढायचे.

आणि बरोबर एक महिन्यानंतर आम्हला बोलवायचे आणि दाखवायचे की एवढे मार्क भेटले तर सांग..

आता त्या काळी आम्हला तेवढेच मार्क मिळाले तर आजोबा इनाम द्याचे पण नाही भेटले तर शिक्षा सुद्धा ..

अर्थात तो धाक वेगळाच होता पण आताच्या मुलांना तर बोलायची सवड तर नाहीच पण धाक तर नाहीच नाही असो!

आणि किस्सा संपला 

ते वाचून का कुणास ठाउक अनघाला अचानक वाईट वाटले पण इथून पुढे आपली वागणूक आपण सुधारावी एवढी जाणीव तिला नक्कीच झाली ...

आता असे खूप किस्से तिच्या आईने लिहिले होते ...

पण काही मोजके होते ज्यांना खून केलेली होती ..आणि त्यातलाच दुसरा किस्सा होता ..

क्रमशः

🎭 Series Post

View all