थोरली आई आहे तुझी भाग 26

Love

काही technical problems मुळे माझ्या लेखांचे भाग पोस्ट होण्यात अडचणी येत असल्याने मी भाग उशिराने पोस्ट करत आहे, माझे प्रिय वाचक तुम्ही आमच्या अडचणी समजून घेत आहात याबद्दल तुमची मी खूप आभारी आहे, ह्या तुमच्या सारख्या सुजाण वाचकांची अनमोल साथ मिळाल्याने मला लेखनाला नवी उभारी येत आहे..

------------*-------*--------*------*------*-------*-----*----*----*----*-

इकडे सगळेच घाबरलेले असतात, घरी आईसाहेब आणि माणिनी थांबलेल्या असतात पण त्याचा जीव घरात लागत नाही ,त्यांना धीर एकवटत नाही..त्यांचे सगळे लक्ष आता रागिणीच्या त्या पडलेल्या दृष्तून हटत नाही..तो तिच्या पडल्याचा आवाज कानात सतत घुमत रहातो आणि मग त्या सगळ्यांच्या ती पडल्यावर घुमणाऱ्या किंचाल्या ऐकू येत असतात त्या दोघींना.. आईसाहेब तर पूर्ण कोलमडलेल्या असतात, माणिनीला काहीच सुचत नाही.. आज हे काय घडून बसले.. आज ही दुःख नको जे कधी माणिनीने अनुभवले होते आणि सगळे खूप निराश झाले होते.. आज तर त्यांना बाळ आणि बाळंतीण ही सुखरूप हवे होते ,त्या सतत तीच प्रार्थना करत होत्या,माणिनी हलक्या काळजाची होती ,त्यात बाळ जाण्याने काय आभाळ कोसळते त्या आईवर हे तिच्यापेक्षा कोण अजून समजून घेऊ शकत होते..तिला रागिणीचे पडणे आठवून आठवण काळीज धस होत जात होते तसे खूप रडू येत होते.. आज सकाळी ती तिच्यासाठी खास तिच्या आवडीचा चहा घेऊन आली होती..आणि किती तरी गप्पा मारल्या होत्या त्या दोघींनी...आज आता संध्याकाळची चहा सोबत घेऊ म्हणून ती ही खाली बोलत बोलत उतरत होती आणि कशी कोण जाणे ती खाली आली आणि पूर्ण बेशुद्ध अवस्थेत ती भाऊजीच्या पाया जवळ पडली होती,रक्त येत होते आणि आम्हाला ही काहीच सुचले नाही,आणि तितक्यात सुहास ने आणि भाऊजी यांनी तिला उचलून गाडीत घेऊन गेले.. वारंवार हेच मनानींनीच्या डोक्यात बसले होते, तिला आता चिंता होती ती फक्त रागिणीची... देवा काही करून दोघे ही वाचवले पाहिजेस तू ,दोघे ही घरात आले पाहिजे ते ही सुखरूप... नाहीतर तुला मी तर माफच करणार नाही... आधीच तू माझ्या बाळाला घेऊन गेला आहेसच पण हे जर झाले तर तुझी मी भक्ती करायचे सोडून देईल पण पुन्हा तू माझ्या मनात ते भक्ती मय स्थान नाही मिळवू शकणार... मानींनी ने डोळे घट्ट मिटले आणि त्या जिन्याकडे बघून धुमसून रडू लागली...

इकेकडे आईसाहेब ही माणिनी ला बघून दुःख व्यक्त करून रडत होत्या,तिला कधी नवत त्यांनी आपल्या जवळ घेतले होते, त्यांना तिचे दुःख आठवत होते, बाळ गेले तरी चालेल पण माझी सून मला हवी हे त्यांनीच डॉक्टर ला सांगितले होते. आता परत एक तसाच प्रसंग नको उभा करू देवा मी आता कोणत्या ही निर्णय घेण्याचा परिस्थिती नाही,मी आता हार मानली आहे माझ्या दैवा पुढे.. म्हणून तू माझी तर परीक्षा बघतच आहेस पण तू माझ्या मुलांच्या सुखाच्या ही आड येत आहेस, माणिनी काय आता तुला माझ्याकडून ही भक्ती मिळणार नाही.. तू हे नीट कर जर माझे जरा ही पुण्य बाकी असेल तर.. त्या पोरीला आणि तिच्या बाळाला घरी सुखरूप आण ,मी तुझ्या पायघड्या घालत येईल..तुझ्या नवसाला मी सोने वाहिण पण आता अभद्र काही ऐकण्याची हिम्मत माझ्यात उरली नाही... मी सहन करण्या पलिकडे गेले आहे... ह्या रणजित च्या सुखावर तुझा आशीर्वाद राहूदे... त्याला त्याची बायको आणि मुल यांचे सुख मिळू दे...

दवाखान्यात इकडे दोघे तिला जखमी अवस्थेत दाखल करतात,पण अशी परिस्थिती बघून तिला डॉक्टर admit करून घेत नाहीत,मग अजूनच चल बिचल होत असते... त्यांना कसे ही करून तिला ऍडमिट करायचे असतेच...रणजित आईला फोन करून सांगतो की आमदार यांना दवाखान्यात फोन करायला सांगा जेने करून ती admit केली जाईल... फोन येताच तिला ऍडमिट केले जाते...तिला वेळीच आणल्यासमुळे तिच्यावर उपचार ही वेळीच सुरू होतात पण फक्त रिस्क नको paitent ची दगावण्याची म्हणून ते तिला घ्यायला नकार ही देत होते.. पण जेव्हा तिच्या मरणाची जबाबदारी रणजित ने घेतली आणि म्हणाला काही ही झाले तरी ती वाचली पाहिजे हे तुम्ही बघा आणि जर काही विपरीत झालेच तर ते मी बघेन ,तुमच्यावर कसला ही दोषारोप ठेवला व केला जाणार नाही ,पण कृपा करा ,मी लिहून देतो हवे तर म्हणत रडकुंडीला आलेला त्या स्थतीतून जाणारा भक्कम रणजित फक्त पाया पडायचा बाकी असतो,सुहास ही आपल्या भावाची अशी अवस्था बघू शकत नसल्याने तो direct आमदाराला फोन लावतो,आपली ओळख सांगतो, आणि ते ही मागे पुढे न बघता डॉक्टर ला फोन लावतात... जर ऍडमिट नाही केले तर मात्र तुमच्यावर दोषारोप केले जातील असे आमदार डॉक्टरला सांगतात.. media ला बोलावून तुमच्या दवाखान्याची सगळीकडे बोंब होईल ,आणि ती आम्ही करू म्हंटल्यावर आणि रणजित च्या विनंतीला आणि रागिणीच्या आवस्थेला बघून ते ऍडमिट करण्याची process नंतर पण आधी तिला operation theater मध्ये घेऊन जातात..

सुहास... दादा तू जरा बस ,तू खूप मानसिक रित्या दमला आहेस रे

रणजित.. मला नाहीच सुचणार नाही जोपर्यंत रागिणी ठीक आहे हे डॉक्टर सांगणार नाहीत

सुहास... आता त्या बिलकुल ठीक वेळेत पोहचल्या आहेत ,त्या नक्कीच ठीक होतील

रणजित... देव हेच आणि असेच करू

सुहास.. अगदी हेच होईल

रणजित.. तू आईला कळव,तिला ही समजेल की काळजी आणि संकट टळले आहे..

सुहास.. मी लगेच फोन करून कळतो आणि माणिनीनीला पैसे घेऊन बोलावतो..

रणजित... असे कर तूच जा आणि त्यांना सगळे ठीक आहे हे सांग आणि तूच पैसे घेऊन ये,ही घे चावी माझ्या लॉकर ची

सुहास... दादा हे काय, अरे माझे तुझे आत्ता नको ह्या कठीण प्रसंगात, आपले घर तू मी,रागिणी,माणिनी आणि आई ह्या मुळेच घर आहे,पैसे आज न उद्या येतील किंवा जातील ही,मग कोणासाठी ही खटाटोप आहे सगळी,जी वहिनी माझ्या बायकोचा विचार करते ,तिला दुःख नको म्हणून तिच्या आनंदा इतकेच तिला ही आनंदाचे क्षण मिळो म्हणून झटते तिच्यासाठी मी पैसे मोजत बसू...मनाला नाही हे कधीच पटणारे..

रणजित.. त्याच्या पाठीवर थाप टाकतो आणि त्याला गच्च मिठी मारतो, म्हणतो तू कधी मोठा झालास रे इतका.. मला किती आधार वाटला तुझा जो एक मोठा भाऊ देत असतो तसा..

सुहास... दादा आता किती दिवस लहान रहायचे,आता मोठं व्हायची सवय करावी लागेल ना,एक छोटा जो माझ्या पेक्षा ही लहान असणार आहे आता त्याचे लाड आपल्याला पुरवावे लागणार आहे हे समजल्यावर मी मोठा होने भाग आहेच ना..

रणजित... देवाची इच्छा, आता त्याच्या हातात सुरक्षित असावा तो आणि ती ही म्हणजे मिळवले मी,

सुहास.. नक्कीच दादा, आपण कोणाचे वाईट नाही केले..

रणजित.. ok, तू जा ,त्यांना घेऊन ये ...

डॉक्टर..operation theater मध्ये जात असतात, तितक्यात ते रणजितला काही गोळ्या,औषध आणायला सांगतात, त्यात भूल देण्याचे injection, ही असते, जे तिला भूल देण्यासाठी मागवतात...

डॉक्टर आता कशी आहे ती ,आणि बाळ त्याला काही झाले नाही ना, होईल ना ठीक सारे.. मला कधी कळेन तिच्या बाबत pls सांगा, ती ठीक आहे ना....रणजित

डॉक्टर... आहो तुम्ही काळजी करू नका, सगळे ठीक होईल, बाळ ही आणि आई ही..तुम्ही आता थोडा वेळ थांबून आम्हाला सहकार्य करा.. विचलित होने सहाजिक आहे,पण आमच्या हातात जे आहे ते सगळे प्रयत्न करत आहोतच आम्ही...

रणजित ...डॉक्टर कडून लिस्ट घेऊन ते सांगितलेले औषध आणायला जातो ,आणि तो बाहेर उभा असतो, त्याला ती पायरी चढता ही येत नाही इतका तो मानसिक गुंगीत ,ग्लाणीत गेलेला असतो...

तो कसा बसा येतो आणि सांगितलेले औषध डॉक्टर कडे सोपवतो... आणि परत एका कोपऱ्यात बसून डॉक्टर ची वाट बघत असतो,की कधी ते म्हणतील ,की आता सगळे ठीक आहे,तुम्ही तुमच्या बाळाला आणि पत्नीला भेटू शकतात.. ते धोक्याच्या बाहेर आहेत..

क्रमशः......