थोर नवरी

Thor Navari
विष्णू  अत्याच्या गावाकडे आत्याला भेटायला आला असे आत्याला म्हणाला खरे पण तो एका ठिकाणी मुलगी बघायला आला होता, आत्याच्या जवळच्या गावातली होती ती.... दिसायला छान होती शिक्षण खूप झाले होते... त्याला शोभेल अशी ती होती ...त्याला तर ती मनापासून आवडली होती.... पण त्याने ठरवलं लगेच आपला निर्णय सगळ्यांना सांगायचा नाही ...जेव्हा तिला वडील स्वतः भेटायला जातील तेव्हाच मी माझी पसंती जाहीर करेल.
मुलगी आरती दिसायला आणि संस्काराला ,चाली रितीला धरून होती, घरातली करती मोठी मुलगी होती, तीच एकटी लग्नाची राहिली होती, कारण तिच्या शिक्षणामुळे तिने लवकर लग्न केले नव्हते आणि आता वय 33 वर गेले होते.दिसायला उंच पुरी,अंग काठी डबल हडाची, सरळ नाक,डोळे बोलके, थोरांचा मान राखून बोलणारी, हे तर विष्णूला खूप भावले, एकटे बोलायला जरा ही लाजली नाही, विचार ही एकदम सरळ,आडकाठी नाही, नौकरी चा शिक्षणाचा विषय जेव्हा विष्णूने काढला तेव्हाच ती बोलली, तिला विचारले की लग्नाला तुमचा विरोध वैगैरे नाही ना,की घरच्यांच्या दबावात करत आहात, कारण तुम्ही इतक्या शिकलेल्या आहात तर तुम्ही तुमच्या पसंतीचा मुलगा बघाल असे वाटते .

आरती लगेच म्हणाली,मी शिक्षणाचा विचार केला तेव्हा मी माझ्या वडिलांना एक वचन दिले होते,की जर ते मला माझ्या मर्जीप्रमाणे शिकू देतील तर मी लग्न त्यांच्या मर्जीत राहूनच करेल, त्यांच्या आवडीच्या कोणत्याही मुलासोबत मी लग्न करेन.हो आणि त्यांनी माझे वचन पाळले सगळ्यांचा विरोध पत्करून तर आता माझी वेळ आहे,आणि तसे ही कोणतेच आई वडील मुलीला तिला साजेसा नवरा बघत असतात,मग माझे वडील मला माझ्या पसंतीचा नवरा बघतील ही खात्री आहे.विष्णूला तिच्या बोलण्यातो एक आत्मविश्वास दिसला, मुलगी सावली नाही पण गोरी नसली तरी चुणचुणीत होती,सगळ्यांच्या मनासारखे करते आणि त्यांना आपल्या मनासारखे करायला ही लावते, घर जोडून ठेवू शकते आणि अजून काय हवं असत एका मुली मध्ये, एक गृहिणी दिसत होती त्याला तिच्या जी त्याचा सगळा डोलारा सांभाळू शकेल अशी.
थोडक्यात काय तर मनातून हो होते.विष्णूला ही त्याच्या बाबांवर खूप भरोसा होता, त्यांना विष्णू चे मन वाचता येत होते, त्याच्या मनात काय आहे ते समजत होते, जशी ती तिच्या बाबांच्या शब्दांच्या पलीकडे नव्हती तसाच हा ही नव्हता हीच एक बाब तिच्यातली त्याला खूप भावली होती.आत्याला तिच्या घरी येण्याचे कारण काहीच सांगितले नव्हते त्याने,खर तर मुद्दामच नाही सांगितले .त्याला माहित होतं की जर असे सांगितले की ती मोडता घालून सगळे विस्कटून टाकेल,म्हणणार ती वयात बसत नाही,खूप थोर वाटते,लग्न का उशिरा करते ते बघ, तिचे काही होते का कुठे ते बघ आणि नंतर म्हणणार तुला तर माझी पूतनी शोभेल ,तीच बघ नात्यात नाते असलेले बरे,12 वी पास आहे,घरचे सगळे काम छान जमते.
तो त्याच्या बाबासोबत बोलला,त्यांना सगळी हकीकत सांगितली ,त्यांनी मुलाच्या पसंतीवर भरोसा ठेवून मुलगी बघण्याचे ठरवले, मुलगी दिसायला छान सेल्स होती पण वयात जे अंतर हवे ते नव्हते ती त्याच्या पेक्षा फक्त दोन महिन्याने मोठी होती. ह्यामुळे त्यांना लगेच होकार द्यावा की नाही हे कळत नव्हते.विष्णूने बाबाला खूप समजवले ,पण तरी त्यांचे मन मानत नव्हते, असे कसे होव शकते ,मुलगी नवर्यापेक्षा मोठी ,कसे कसे हो म्हणू सांग.शेवटी त्यांना मुलीच्या वडिलांचा फोन आला, ते म्हणाले पाहुणे माझी मुलगी जरी दोन महिन्याने मोठी असेल पण ती ज्या घरी जाईल त्या घरच्यांच्या मर्जीत तीच मर्जी असेल अशी आहे, कुठे अति होईल तिथे ती एक पाऊल नवऱ्याच्या सोबतच असेल पण पुढे नसणार, शेवटी तुम्ही ठरवाल ते .

इकडे विष्णू बाबाकडे खूप आशाळ नजरेने होकारासाठी खुणावत होता,आता पर्यंत पाहिलेल्या मुली आणि आरती मध्ये खूप विरोधाभास होता,नुसतीच बायको नको तर गृहलक्ष्मी हवी आहे असे तुम्हीच बोलला होतात ना, मग मी ही तशी एक अपेक्षित करतो आणि आरती तर तशीच आहे.बाबाला वयाचाच थोडा प्रश्न होतातशी आरती त्यांना ही आवडली होती,विष्णूच्या आईला ही हे स्थळ पसंत होतेलगेच मुलीकडच्या मंडळींना होकाराची बातमी पाठवली.जर मुलगी नवऱ्या मुलासपेक्षा मोठी असेल तर बिघडले कुठे, फक्त मने जुळली पाहिजे इतकेच .....काय बरोबर ना