थोडे भांडायला तर हवेच !!

Thode Bhandayla Hvech


काही नाती तोडल्याने तुटत नसतात हे अगदी खरे आहे.

सकाळी सकाळी सुधा आपले काम अर्धवट सोडून परत बेड वर येऊन बसली होती..

मनात बराच घोळ चालू होता ,काही केल्या तो शांत होत नव्हता आणि त्यामुळे तिला काही सुचत नव्हते.

अश्यात पाळी जाण्याची वेळ आली होती म्हणून मूड बदलत होते, टेन्शन तर होते पण नेमके कसले काही कळत नव्हते.

नवरा तिच्या प्रत्येक मानसिक ताणात तणावात अगदी नेटाने साथ देई पण सगळेच दुःख मात्र त्याला सांगता येत नसल्याने तिला तिच्या मनाची एकाग्रता टिकवण्यात यश मिळत नव्हते..सगळ्यांचे नेटाने कर्तव्य करणारी सुधा आज मात्र ह्या बदलत्या भावनिक पातळीवर एकटी झुंज देत होती

मुलीला ही नौकरी मुळे आईकडे यायला वेळ नव्हता, मुलगा त्याच्या प्रोजेक्ट मध्ये इतका रमला होता की त्याचे ध्येय म्हणजे हा प्रोजेक्ट हेच समीकरण झाले होते. त्याला जेवायला ही वेळ मिळत नव्हता मग आई सोबत गप्पा तरी कधी मारणार.

सुधा साठी तिचा हा परिवार म्हणजे तिची अमनोल ठेव होता, एक संजीवनी की ज्यांच्या सोबत काही वेळ घालवायला मिळाला तरी खूप हाय से वाटत आणि त्या जोरावर ती किती तरी दिवस आनंदात घालवत होती.

त्यात तिच्या जीवकी प्राण असलेल्या हल्ली हल्ली खास मैत्रिणी सोबत तिचे नुकतेच वाद झाले होते ,ज्यामुळे तिचे मन कुठेच रमत नव्हते.. ज्या मैत्रिणीला तिने आई पेक्षा ही जास्त जपले होते त्या मैत्रिणीने अशी शंका का घ्यावी ,असे आरोप तरी कसे करावे माझ्यावर ,हा विचार करून करून सुधा मनात कुढत होती, तिने ही एक प्रकारे धोसरा धरला होता.. जोपर्यंत ही कोंडी फोडली जात नाही तोपर्यंत तिला बरे वाटणे शक्य नव्हते.. त्यांच्या बोलण्याचा खरा काय अर्थ होता हे जाणून घेतल्या शिवाय चैन पडणार नव्हती.


हे अवजड दुःख होते ,अवघड जागेचे दुखणे होते ते तिच्या नवऱ्याला ही सांगून मोकळे होता येत नव्हते.

हा आळ का घेतला असेल त्यांनी, त्यांना कोणी माझ्या बद्दल भरवले तर नसणार ना ,की त्यांनी काही गैरसमज करून घेतला असेल माझ्याबद्दल ,मी तर त्यांना काहीच कमी पडू दिले नाही मग त्यांनी हे असे का वागावे ??

सुधा ला आता हे सहन होत नव्हते..तिने सत्य जाणून घेण्यासाठी लगेच त्यांच्या घरी जायचे ठरवले..

सगळी कामे आवरून न घेताच ती मनात तसाच पसारा घेऊन नंदेच्या घरी निघाली, नवऱ्याला कळवले .

हातात पर्स घेऊन बिना जेवण करता ती झप झप समोर आलेली रिक्षा घेऊन तिने कल्याण गाठले.. रिक्षाचे बिल 500 झाले होते ,त्यात घाईत तिने 600 रुपये टेकवले आणि घराची बेल वाजवली....

समोरून सासऱ्यांनी दार उघडले..


त्यांना बघताच तिला ती गडबडून गेली होती..


  "बाबा तुम्ही इथे कसे काय, इतके घाबरलेले का ,काय झाले सांगा ,आई कुठे ?? " सुधाने नवल करत विचारले

"अग तिने मला काल अचानक बोलावून घेतले ,म्हणत होती की तिला बरं वाटत नाही ,तिच्या छातीत डाव्या बाजूला चमक निघाल्या सारखे होत आहे ,आणि त्यात प्रीती तिच्या ऑफिस च्या कामानिमित्त लोणावळ्याला गेली होती ,मग घरी कोणीच नाही त्यात तिला हार्टजवळ जास्त कळ निघत आहे असे सांगितल्यावर मी लगेच कॅब केली आणि आलो. बघतो तर काय तिची आवस्था बघन्यासारखी नव्हती ,तिला श्वास ही घेता येत नव्हता. मग तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.."

सुधा, " मग आता आपण लगेच जाऊ आईकडे, इथे नको थांबायला ,त्यांना आपली खूप गरज आहे ."

बाबा, "अग घाई नको करू,तू ये जरा आत,तिला आता बरं वाटत आहे ,काल जरा अति विचार करत होती माहीत नाही पण तिने कोणते तरी बोलणे मनाला लावून घेतले आहे, त्याचा तिने धोसरा घेतला आहे ,आणि त्यामुळे हायपर acidity चा त्रास झाला तिला, ज्याच्या मुळे छातीत चमक निघत होती.."

सुधा ," बाबा मला माहित आहे त्यांना कसला त्रास होत आहे ,आणि त्याचे कारण मीच आहे ,काल त्यांनी मला फोन केला होता आणि म्हणाल्या की,माझ्या मुळे त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर गेला आहे, मी कारणीभूत आहे की आज त्यांना रवी वेळ देऊ शकत नाही "

बाबा ," अग हेच काही वाही ती मला बेशुद्ध अवस्थेत म्हणत होती ,म्हणत होती की मी सुधाला नसत्या गोष्टी साठी जबाबदार धरले,तिच्या वर आळ घेतला, पण मला काहीच कळत नव्हते की ही असे का बोलत होती ते. "

सुधा, "बाबा आई आता खूप हळव्या झाल्या आहेत ,त्यांना नको ते विचार सतावत असतात ,त्यांना आपण सांभाळून घ्यायला हवे ,त्यांना वेळ द्यायला हवा, जो वेळ त्यांच्या आयुष्यात कधीच मिळाला नाही, त्यांनी इतके सगळे कष्ट केले पण आज जेव्हा त्यांना एकाकी वाटत आहे तेव्हा त्यांना सोबत कोणी तरी हवे असे वाटत असेल, आणि नेमके तेच होत नाही. "

बाबा ," सुधा तू जेव्हा नवीन नवरी म्हणून आली होतीस तेव्हा तूच होतीच तिची खरी काळजी घेणारी ,तिच्या त्या आयुष्याच्या वळणावर तू तिला आणि तिच्या मूड ला सावरत होतीस, तिला गुंतवून ठेवत होतीस ,तिच्यासाठी तुझे parlour ही तू बऱ्याचदा बंद करून येत आणि तिच्या सोबत गप्प मारत होतीस.. कोणी नाही पण तू तिच्या आवडीचे काय हवे नको ते तू खास लक्षपूर्वक बघत होतीस, माझ्या मुलाला तर तेव्हा ही वेळ नव्हता तिच्यासाठी च काय तर तुझ्यासाठी ही नाही ,मग तूच एकदा त्रोटक भांडण करून हट्टाने एक family ट्रिप काढली होतीस ,तूच म्हणत होतीस आईंसाठी तू वेळ काढत जा ,त्यांना तू असल्यावर दहा हत्तीचे बळ येते, माय लेकरांमध्ये वाद झाला की तू त्याची समजूत घालून त्याला माफी मागायला लावत असे ,आणि तरी ही कशी म्हणू शकते की तू त्यांच्या मध्ये दूरावा निर्माण केला ते, मला तिचे हे वागणे अजिबात पटले नाही सुधा ."

सुधा ," बाबा त्यांनी त्यांची कधी काळी असलेली खद खद बोलून दाखवली ,म्हणून त्यांना माझ्या बद्दल प्रेम नाही असे नाही ,आता तर मी म्हणेन त्या आधीपेक्षा जास्त मोकळ्या होतील ,मनातली किलमीशे दूर झाली तरच विचार स्पष्ट होता,आणि त्यासाठी थोडे भांडावे लागले तरी हरकत नाही."

बाबा ,"अग पण तू कशी इथे अचानक ,आणि ते ही तुझे काम सोडून ?"

सुधा ," बाबा मी ही आईसोबत ह्याच बाबत जाब विचारायला आणि भांडायलाच आले होते असे समजा "

दोघे ही आता हसत होते..


©® anuradha andhale palve