थोड ऐकणार का?... भाग 7 अंतिम

प्रत्येक केस मध्ये नेहमी मुलाची चुक असते असं नाही, काही ठिकाणी असतात अशा हट्टी मुली ज्यांच्यामुळे दोघी कुटुंबांना खूप त्रास होतो


थोड ऐकणार का?... भाग 7 अंतिम
मला तुझ्यासोबत रहायच आहे.

©️®️शिल्पा सुतार
........

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, याचा कोणाशी काहीही संबंध नाही, कोणाच मन दुखवायचा प्रश्न नाही, मनोरंजन म्हणुन वाचावी.
.......

कॉफी शॉप मध्ये मनीषा अक्षय सागर येऊन बसले, विकास येत होता, आरतीची बहीण सुषमा ही येणार होती, तिला अक्षयने मदत मागितली होती, ती बस स्टॉप वर आली होती, अक्षय तिला घ्यायला गेला, कॅफे मध्ये आता सागर मनीषा होते, सागर मनीषा कडे बघत होता,... "मनीषा मला बोलायच आहे तुझ्याशी",

मनीषाला कल्पना होती, थोडी घाबरली ती.

"मला आवडते तु, माझ्याशी लग्न करणार का?",.. सागर

मनीषा त्याच्या कडे बघत होती.

"माहिती आहे मला मी अस डायरेक्ट बोलतो आहे ते, पण हेच खर आहे मला तुझ्याशी लग्न करायच आहे मनीषा",.. सागर

" तू खूप चांगला आहेस सागर, मला माहिती आहे माझ लग्न जमत नाही म्हणुन तु अस करतो आहेस ",.. मनीषा

" मुळीच नाही, मला तु पाहिल्या भेटीत आवडली होतीस, तेव्हा मला हे काही माहिती नव्हत तुझ लग्न जमत नाही ते ",... सागर ,

मनीषा गप्प होती, सागर तिच्या जवळ येवून बसला,

" माझा विचार कर मनीषा, मला खरच तुझ्या सोबत रहायचं आहे. मी डॉक्टर आहे घरी आई बाबा आणि मी असतो, स्वतः च घर आहे आमच, मोठ हॉस्पिटल आहे माझ, तु त्यात माझी मदत करू शकते, सुखात राहू आपण",.. सागर.

" मला थोडा वेळ दे सागर",.. मनीषा

अक्षय सुषमा आले, विकास ही आला, मनीषा सागर गप्प बसले,

" काय म्हणणं आहे तुझं अक्षय? ",.. विकास

"माझ्या आणि आरतीच्या घटस्फोटाच्या केसमुळे घरच्यांचा खुप नुकसान होत आहे, मनीषाच लग्न ठरत नाही, तर मी जाऊ का तिकडे राहायला",.. अक्षय

"तुला आरती इकडे आली तर चालेल का? पण त्यासाठी आरतीवर आपल्याला खोटे आरोप लावावे लागतील ",..विकास.

सगळे सुषमा कडे बघत होते.

" माझ्या बहिणीच चांगल होत असेल तर चालेल मला, काय आहे ते पण ",.. सुषमा.

" बाळाला आपल्याकडे मिळवायचं, म्हणजे आरती आपोआपच मागे येईल",.. विकास

" कस काय, आरव लहान आहे खुप, नियमा प्रमाणे तो आई कडे राहील ना ", ... सुषमा

"हो पण आई सक्षम नाही त्याला सांभाळायला तर वडीलांना देता येते अश्या वेळी बाळाची कस्टडी ",.. विकास

" मला नाही पटत आहे हे, आरतीला त्रास होईल ",.. अक्षय

" अरे मग आपल्याकडे दुसरा उपाय नाही, बाळाची कस्टडी तुझ्याकडे आली तर आपोआपच आरती सुद्धा तुझ्याकडे येईल, कारण तशी आरती वाईट नाही, तिची कुणीतरी दिशाभूल करत आहे, ती बाळाला सोडून राहणार नाही, बघ तुला आरव आणि आरती दोघं मिळू शकतात, जर तू होकार दिला तर ",.. विकास

"हो अक्षय राव विचार करा यावर, कारण आरती ही आता कंटाळली आहे तिकडे घरी, पण तरीही ती का माघार घेत नाही काय माहिती, जर तिला चांगलं सांगून समजत नसेल तर हा उपाय चांगला आहे, यात आपण आरतीला त्रास होईल असं काहीही करत नाही, फक्त इमोशनली ब्लॅकमेल करतो आहोत, कुठलीही आई आपल्या बाळापासून दूर राहू शकत नाही, ती येईल लगेच घरी, ऐका ",.. सुषमा.

सागर आणि मनीषा सुद्धा अक्षयला समजावत होते.

" ठीक आहे, करणार काय आहे पण आपण? ",.. अक्षय

" असं सिद्ध करू की आरवला सांभाळायला आरती योग्य नाही, एक तर ती जॉब करत नाही, इन्कम सोर्स नाही, पुढे ती आरवचा खर्च कसा करणार, तु सांग.. मी एवढी पोटगी देणार नाही, मी आरव आणि आरती सोबत रहायला तयार आहे, नंतर आरव शाळेतही जाईल, तेव्हा कसा होईल त्याच्या खर्च, आणि आरतीला तब्येतीचा प्रॉब्लेम आहे , खुप चिडते ती आणि निर्णय क्षमता नाही, बाळा बाबतीत योग्य निर्णय घेणार नाही ती, त्यामुळे आरवला धोका आहे, त्यामुळे बाळाला वडिलांकडे ठेवावं अस सांगु ",.. विकास

" असे पॉईंट्स मांडता येतात का? बापरे.. ",.. अक्षय

" हो मांडता येतात ",.. विकास

अक्षय विचार करत होता काय करावं, तो मनीषाकडे बघत होता,." काय करू मनीषा? ",

" हे बघ दादा जर तुझं आणि वहिनीचं या आयडियाने चांगलं होत असेल तर काही हरकत नाही, तुला वहिनीवर खोटे आरोप करावे लागता आहेत, मला माहिती आहे तुला आवडत नाही हे, पण आता याशिवाय उपाय नाही",... मनीषा

"भांडणं होतील खूप, तिकडचे वकील अजून आयडिया काढतील",.. अक्षय

" हो ते तर होणारच आहे, घटस्फोट होण्यापेक्षा तर ही आयडिया केली तर आरती तुझ्या बाजुने येऊ शकते, राहायचं आहे ना तुला आरती सोबत",.. विकास

" हो राहायचं आहे, ठीक आहे असं करून बघु",.. अक्षय

"सुषमा ताई तुम्हाला जमेल का मदत करायला, तुम्ही आरतीला सांगत रहायच की अक्षयकडे वापस जा अस, आणि कोर्टात विचारल तर सांग यायचा की करते खूप चीड चीड ती",.. विकास

हो ठीक आहे..

विकासने सगळे पेपर तयार केले, डॉक्टर सागर होते मदतीला, कोर्टाच्या डेटला हे सगळे पेपर कोर्टात सबमिट केले, आरती नौकरी करत नाही, ती बाळाला कस सांभाळेल? पुढे शिक्षण त्याच्या खर्च तिच्याकडून होणार नाही, जी स्वतःचीच काळजी घेऊ शकत नाही ती मुलाला काय सांभाळेल, स्वभाव चिडका आहे, एका ठिकाणी कधीच रहात नाही, सासरी सुद्धा सहा महिने राहिली नाही, असे बरेच आरोप त्यांनी आरती वर केले.

आरतीच्या घरचे आणि वकील थक्क होऊन गेले होते हे सगळं बघून, त्यांना वाटल नव्हत अस होईल, इतके दिवस ते वरचढ होते,

तिच्या वकिलांनी अक्षय कडुन बाळाचा खर्च मिळावा असा पॉईंट मांडला.

पण अक्षय तरी एका बाजूने किती खर्च करेल त्यापेक्षा बाळ जर अक्षयकडे असलं तर सांभाळलं जाईल, नाही तरी अक्षयच्या घरचे चांगले आहेत हा मुद्दा त्यांनी बरोबर मांडला होता कोर्टात आणि आरती चिडकी आहे हे समजलं होतं.

केस बरीच पुढे गेली होती, आता लगेचच निकाल लागणार होता, अक्षय आरती तुम्हाला लगेच घटस्फोट मिळेल, आरती तुम्ही तुमच्या आरवला अक्षय कडे द्या, तुम्ही त्याला सांभाळायला योग्य नाही, तुम्ही काही करत नाही, तुमची तब्येत नेहमी बरी असते असाच तुम्ही रिपोर्ट दिला आहे कोर्टात, बाळाची कस्टडी आम्ही अक्षय कडे देत आहोत, कोर्टातून घरी गेल्यानंतर बाळाला वडिलांकडे देऊन टाका.

"बाळ लहान आहे बाळ आईजवळ राहिलं तर बरं राहील ",.. त्या लोकांनी मुद्दा मांडला.

"अगदी एक दिवसाच्या बाळाच सुद्धा कुणा वाचून काही अडत नाही, ते लोक सांभाळतील व्यवस्थित बाळाला, तुम्ही स्वतःचीच काळजी घेऊ शकत नाही तर बाळाची काय काळजी घेणार, बाळाला अक्षय कडे देऊन टाका, अर्ध्या तासाचा वेळ आहे तुमच्याकडे तुम्ही यावर विचार करा आणि मग सांगा",..

आरतीने खूप आक्षेप घेतला, खुप रिक्वेस्ट केली, रडत होती ती, काही फायदा झाला नाही, तिला बघुन अक्षयला त्रास होत होता, पण सगळ्यांनी सांगितल थोड दुर्लक्ष कर तेच योग्य असेल,

आरती नुसतीच एका बाजूला बसलेली होती, सुषमा तिच्या बाजूला बसली होती, आई बाबा बाजूला उभे होते आरव त्यांच्याकडे होता,

"आरती अजूनही वेळ गेली नाही, काय विचार करते आहेस, हे सगळं होतं आहे ते थांबव, आरव तुझ्या हातचा चालला जाईल" ,.. सुषमा

"जाऊदे आरवला त्यांच्याकडे, सांभाळू दे थोडे दिवस, त्यांनाही समजेल लहान मुलाचं किती करावं लागतं",.. प्रमिलाताई

"आई तु जरा थांब, काहीही बोलु नकोस",.. सुषमा.

आरती उठली अक्षय सगळ्यांसोबत उभा होता तिकडे गेली, अक्षय मला बोलायचं आहे तुमच्याशी, अक्षय बोलायला बाजुला आला .. " अक्षय प्लीज तुम्ही असं नका करू, मी आरवशिवाय राहू शकत नाही, आरवला राहू द्या माझ्याजवळ, प्लीज मी रिक्वेस्ट करते, किती लहान आहे तो, मला काही नको तुमचे पैसे वगैरे, मी करेन काहीतरी, सांभाळेल आरवला नीट, मी आई आहे त्याची, तो कसा राहील माझ्याशिवाय",

"पण तु सक्षम नाही ना त्याची काळजी घ्यायला, तुला घरकाम जमत नाही, तुला मोकळ रहायला आवडत, आहे चान्स आता, नाही तरी तुला कुठली जबाबदारी नको आहे ना, आरामात रहा आता एकटी, मलाही आरवची काळजी आहे, राहू दे त्याला माझ्याजवळ आरती, मी सांभाळेल माझ्या आरवला, इतके दिवस होता ना तो तुझ्याजवळ, आता राहू दे माझ्याजवळ",.. अक्षय.

" असं करू नका प्लीज, थोड ऐकुन घ्या, मी देणार नाही आरवला ",... आरती.

अक्षयने लक्ष दिलं नाही आरतीकडे, तसं त्याला विकास सागरने सांगितलं होतं की कितीजरी आरती तुझ्याशी बोलायला आली तरी अजिबात लक्ष द्यायचं नाही, तरच हे सगळं नीट होईल.

अक्षय तिला एकटीला सोडून त्याच्या ग्रुप मध्ये निघून गेला

" काय म्हणत होती आरती ",.. विकास

"रडते आहे ती, मला कसतरी होत आहे आरतीला बघून, जावु का समजवु का तिला, आरव हवा आहे तिला, आई आहे ती त्याची ",.. अक्षय

"नाही रडु दे तिला, थोड ताणुन धर, ऐक जरा",..विकास 

"म्हणत होती की आरव साठी काहीही करेल नीट सांभाळेल त्याला ",.. अक्षय अजुन आरती कडे बघत होता.

" लक्ष देऊ नको, आता जर तू तिच ऐकलं तर ती कायमची जाईल तुझ्या हातातुन",... विकास

मनीषा सागर समजावत होते अक्षयला,

आरती सुषमा जवळ येवुन बसली, ती खूप रडत होती, मी आरव शिवाय राहू शकत नाही, तिने आरवला घेतल प्रमिला ताईं कडुन, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होत,

"मी तुला अजून सांगते आहे आरती स्वतःच्या घरी जा, थांबव हे सगळं, चांगले आहे तुझ्या घरचे, सासू सासरे तुझा नवरा, संसारिक जबाबदारी घे थोडी, सगळ्यांना सांभाळून घे जरा, असाच हट्टीपणा करत राहशील तर संसार ही हातचा जाईल, मुलगा आणि नवरा तर गेलाच आहे, थांबव हे सगळं",.. सुषमा.

बाबा सुद्धा पुढे आले,.." हो बेटा सुषमा बरोबर सांगते आहे, जा तिकडे रहायला, घटस्फोट पेपर वर सही करू नको, सांग तिकडे कोर्टात की मी अक्षय कडे जायला तयार आहे",...

आरती प्रमिला ताईकडे बघत होती, त्या काही म्हटल्या नाही,

" प्रमिला आता तू तिला चुकीचे सल्ले देऊ नको, जाऊ दे तिला सासरी",.. सतीश राव.

आतून बोलवण आल, सगळे आत मध्ये गेले, अक्षय आरती समोर उभे होते,

" मला नाही करायची सही घटस्फोटच्या पेपर वर, मी अक्षय सोबत रहायला तयार आहे, मी आरव शिवाय राहू शकत नाही",.. आरती.

अक्षयला खूप आनंद झाला होता मनातून, पण त्याने तसं लगेच चेहऱ्यावर दाखवलं नाही,

मध्ये ब्रेक होता, आरती त्याच्याशी बोलायला आली,.. "अक्षय प्लीज माझ्याशी बोला ना, मला घरी यायच आहे, आरव हवा मला",

" माझ्या काही अटी आहेत आरती, त्या जर तुला मान्य असतील तरच मी तुला घरी येऊ देईल, नाहीतर मी आरवला घेऊन जाईल",.. अक्षय

"काय आहे त्या?",.. आरती.

" तुला सारखं माहेरी जाता येणार नाही, घराची पूर्ण जबाबदारी तू घ्यायची, माझ्या आईकडुन कामाची अपेक्षा करायची नाही, आरवचं माझं सगळं तूच करायचं, घरात व्यवस्थित वागायचं, अजिबात उलट उत्तर आणि भांडण नको आहेत, घरात आई बाबा म्हणतील तेच होईल, मी सेपरेट घर घेणार नाही ",.. अक्षय.

" ठीक आहे मला मान्य आहे",.. आरती.

जरा वेळाने परत आत मध्ये बोलवलं, आपसिक सामंजस्याने त्यांनी घटस्फोट रद्द केला,

नाही तरी इतक्या दिवसापासुन कोर्ट केसला आरती कंटाळली होती, त्यात अजुन नवनवीन आरोप अक्षय कडून तिच्यावर होत होते, ज्याचा तिने विचारही केला नव्हता, सगळ्यात जास्त म्हणजे तिचा आरव ते लोक तिच्या पासून काढून घेत होते, त्यामुळे तिने माघार घेतली, तसा अक्षय चांगला होता,

लगेचच घरी जाऊन आरतीने तिचं सामान घेतलं, सुषमा खुश होती, ती अक्षय बाहेर बोलत होते, आरव अक्षय कडे होता, दोन मिनिट ही त्याने त्याला सोडल नव्हत, आरती आरव अक्षय सोबत घरी यायला निघाले, रस्त्यात आरती गप्प होती,

मालुताई सुरेशराव मनीषा सागर विकास सगळे हॉलमध्ये बसलेले होते, आरव मालुताईंकडे होता, खूपच आनंदी वातावरण झालं होतं घरात,

आरती त्यांच्या बेडरूम मध्ये बसलेली होती, अक्षय आत मध्ये आला, तो आरतीकडे बघत होता, पुढे जाऊन त्याने आरतीला जवळ घेतलं, दोघं रडत होते.

" माझी चूक झाली अक्षय, मला माफ करणार का?, मला नाही समजले मी का असं केलं, खूप त्रास झाला माझ्यामुळे तुम्हाला",.. आरती.

"माफी मागायची गरज नाही आरती, पण यापुढे असं करू नको, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि आरव शिवाय, या पुढे हा विषय नको आपल्यात, झाल गेल विसरुन जावु",.. अक्षय

अक्षय आरती आरव आता खूप खुश आहेत, आरतीनेही बऱ्यापैकी आता घर स्वतःच्या ताब्यात घेतलं होत , मनीषाच सागरशी लग्न जमलं होत , साखरपुडाही झाला होता, लगेचच दोन महिन्यांनी लग्न होतं, लग्नाची तयारी जोरात सुरू होती, सागर सारखा जावई मिळाल्या मुळे सगळे खुश होते.

रोज प्रमाणे सकाळी सुरेशराव फिरायला निघाले होते, त्यांच्यासोबत आता मालुताई पण फिरायला जात होत्या, बऱ्यापैकी त्यांनी घरात लक्ष देणं कमी केलं होतं, तरच आरती करेल काम असं सगळ्यांनी त्यांना समजुन सांगितलं होतं,

त्यांचा दिवस आरव सोबत सुरू होत होता आणि आरव सोबतच संपत होता, आपलं बाळ नीट सांभाळलं जातं यातच आरती खुश होती, आपलं घर ते आपलं घर असतं हेही तिला समजलं होतं,

प्रत्येक केस मध्ये नेहमी मुलाची चुक असते असं नाही, काही ठिकाणी असतात अशा हट्टी मुली ज्यांच्यामुळे दोघी कुटुंबांना खूप त्रास होतो, स्वतःच म्हणणं खरं करायचं, मी म्हणेल तेच व्हायला हव, तर मी घरी येणार , नाहीतर घटस्फोट द्या अशा प्रकारे सासरच्या लोकांची अडवणूक बऱ्यापैकी अशा मुली करतात, या केस मध्ये घटस्फोट टळला पण बऱ्याच ठिकाणी असं होत नाही, अश्या वागण्याचे दुष्परिणाम खुप होतात, खुप संसार मोडतात,

अशा मुलींची दुसरी तिसरे लग्न झाले तरी तिथेही त्या व्यवस्थित वागत नाही तिथेही घटस्फोट होतात, असे काही उदाहरण बघण्यात आहेत, आणि इतर लोक मुलाच्या फॅमिलीला दोषी समजतात, त्यांच्या कुटुंबाला त्रास होतो.

खुप पिडीत मुलं आहेत असे समाजात, ज्यांना अजुनही न्याय मिळालेला नाही, कोर्ट केस वर्षानुवर्ष चालते, त्यातुन काही साध्य होत नाही, अश्या मुलांना मेन्स राईट नावाची संस्था मदत करते, तुम्हाला जर अशा प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, आनंदी राहायचं हक्क तुम्हाला सुद्धा आहे, तुम्ही तुमचा त्रास कमी करू शकता.

.

🎭 Series Post

View all