थोड ऐकणार का?... भाग 6

अक्षय आपण उद्या विकासला भेटायला जात आहोत, आता आपण ठरवून टाकू पुढे काय करायचं ते, आरती काहीही म्हटली तरी ऐकणार नाही तू


थोड ऐकणार का?... भाग 6
मला तुझ्यासोबत रहायच आहे.

©️®️शिल्पा सुतार
........

विकास आरती कडे आलेला होता, आरती आई बाबा समोर बसलेले होते,

"अक्षय वेगळा रहायला तयार असेल तर आरती तुला चालेल का, की तुला घटस्फोटच हवा आहे",.. विकास

आरतीला काही सुचलं नाही,.. "ठीक आहे ते जर सेपरेट राहत असेल तर मी जायला तयार आहे",

"स्वतःच घर नाही थोडे दिवस भाड्याच्या घरात रहाव लागेल",.. विकास

चालेल

विकास इकडे अक्षय कडे आला तिकडे काय बोलण झाल ते सांगितल,.. "तू थोडे दिवस जरा सेपरेट खोली घेऊन रहा अक्षय, जेव्हा घरच सगळ काम आरतीच्या अंगावर पडेल, सगळंच करावं लागेल बाळापासून तुझ्या पर्यंत , तेव्हा तिला सेपरेट राहणं म्हणजे काय आहे ते समजेल, तुला राहायचं आहे ना तिच्यासोबत?",

" हो मला रहायचं आहे",.. अक्षय

दोघी बाजुच्या घरच्यांची मिळून एक मीटिंग झाली,

" मी सेपरेट राहिला तयार आहे ",.. अक्षय

" मी पण अक्षय सोबत राहायला तयार आहे, घर या एरियातच घ्यायचं, माझी आई रहाते तिथे म्हणजे मला सपोर्ट होईल",.. आरती

" मला चालणार नाही हे, दोघी घरां पासुन लांब रहायचं आणि कुणीही सारखं आमच्या घरी यायचं नाही, मंजूर असेल तर सांग आरती",.. अक्षय

" मला कसं जमेल सगळच बाळाचं आणि घरचं सुद्धा, मला आईच्या सपोर्टची गरज आहे",.. आरती

" मग माझ्या घरात होती ना माझी आई, ती सगळं करतच होती ना तुझं, जेव्हा बाळ नव्हतं तेव्हा सुद्धा, आताही ती करायला तयार आहे तर तुला यायचं नाही तिकडे, तुला कुठल्याच आईंची सपोर्ट घेता येणार नाही इकडचाही नाही तिकडचाही नाही, सेपरेट राहायचं असेल तर एकदमच सेपरेट राहावे लागेल",... अक्षय

आरतीने नकार दिला, यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही, शेवटी ते त्यांच खर करतात,

" अस कस वागणं तुझ आरती जे ठरलं त्या प्रमाणे तू कर, सेपरेट म्हणजे सेपरेट हव, उगीच तु दिवस भर तुझ्या आई कडे राहशील, मला तिकडे बोलवुन घेशील सारख, मला चालणार नाही ",.. अक्षय

ती बैठक फसली. परत घटस्फोटाची केस सुरू झाली,

"तुम्ही काळजी करू नका आरती , बाळ लहान आहे, भरपुर पैसे मिळतील तुम्हाला नवर्‍या कडुन, आपण करू काहीतरी",.. वकील

मी नोकरी करत नाही मी पूर्णतः नवऱ्यावर अवलंबून आहे आणि मला लहान बाळ आहे त्यामुळे मला दर महिन्याला एक ठराविक पोटगी मिळावी आणि बाळाची कस्टडी ही मला मिळावी असे एप्लीकेशन आरतीने केलं

अक्षयने त्यावर मी घटस्फोट द्यायला तयार नाही, आरती माझ्याकडे रहायला आली तर मला चालेल, मला बाळाचा लळा आहे आणि मला त्या दोघांपासून दूर राहील्याने मला खूप त्रास होतो आहे, मी या घटस्फोटाच्या विरोधात आहे असं अक्षयने स्टेटमेंट दिलं.

चालू द्या आता जितके दिवस चालायची ती केस, आता आरतीला शांतता नकोच आहे, तर मी पण माघार घेणार नाही.

रविवारी मनीषाला बघायला पाहुणे येणार होते , घरात सगळी आवरा सावर सुरू होती, मनीषा खुश होती, अक्षय बऱ्याच दिवसांनी उत्साहीत होता,

रविवारी पाहुणे आले, मनीषा सुंदर तयार झाली होती, तिच्या एक दोन मैत्रिणी आल्या होत्या मदतीला, मनीषाला बाहेर बोलवलं, चहापाणी झालं, बोलता बोलता अक्षय आणि आरतीचा विषय निघाला,

घटस्फोटाची केस सुरू आहे मुलीच्या भावाची त्यामुळे ते लोक जरा नाराज होते, वागणं कसं आहे घरच्यांचं याचा त्यांना प्रश्न पडला होता, कारण कुठलीही मुलगी असं स्वतःचं एवढं चांगलं घर सोडून जात नाही असं मुलाच्या आईचं म्हणणं पडलं.

ते लोक गेले पण आता मनीषा नाराज होती, विशेष बोलले नव्हते ते लोक तिच्याशी आणि नवरा मुलगा पण बोलला नव्हता मनीषा सोबत, तो तयार होता पण त्याच्या आईने त्याला बोलू दिल नाही, म्हणजेच या स्थळाकडुन नकार येणार आहे.

तसच झालं ते लोक गेल्यानंतर दोन तासातच तिकडुन नकार आला, अक्षय खुप नाराज होता माझ्यामुळे मनीषाच नुकसान होत आहे आणि ज्या चुका आम्ही केल्यास नाही त्याचं खापरही आरतीच्या घरचे आणि इतर लोक आमच्या माथ्यावर फोडता आहेत, हे आता असंच होणार आहे, आपला दोष असो अगर नसो, सगळेजण बोलणार की तुम्हीच आरतीला काहीतरी त्रास दिला असणार कारण एवढं चांगलं घर सोडून कोण राहणार आहे

बाहेर बागेत मनीषा एकटीच बसलेली होती, ती विचार करत होती काय सुरु आहे हे? , कसं होणार आहे दादा वहिनीच, त्यानंतर माझं पण प्रश्न आहे, माझ लग्न ठरत नाही, आतापर्यंत दोन-तीन स्थळ कॅन्सल झाले, सगळे नकार देतात, काय प्रॉब्लेम आहे हा? आई बाबा दादा किती चांगले आहेत, अस चांगल सासर मिळाल खर तर आरतीला, लकी आहे ती, पण देव देतो कर्म नेत अस आहे वहिनीच, सुख टोचत तिला, मी जावुन भेटु का तिला.

अक्षय तिच्या बाजूने येऊन बसला,.. "मला माफ कर मनीषा माझ्यामुळे तुझं नुकसान होतं आहे, मी असं ठरवलं आहे की मी आता सेपरेट राहायला जातो आहे, जसं आरती म्हणेल तसं करतो, तुझं लग्न व्हायला पाहिजे",

"असं काही करू नको दादा आणि मुळात तु माझी माफी मागायची काही गरज नाही, हे बघ होईल माझं लग्न व्हायचं तसं, ज्या लोकांचे मोठे मन असतील ते स्वीकारतील मला, त्यासाठी तू कॉम्प्रमाईज करू नको, तुला खरच वहिनी सोबत राहायचं असेल तरच जा, नाहीतर मी पण चालली जाईल तू पण चालला जाशील आणि आई बाबा एकटे राहतील",.. मनीषा.

" हो ते पण आहे, आरतीचा भरोसा नाही तिच्या मनाच केल तरी ती नीट राहणार नाही ",... अक्षय

दोघे बोलत होते तेवढ्यात सागर आला भेटायला, तो घरी जात होता, ये सागर,

तो आत मध्ये आला,

" बराच उशीर होतो तुला घरी जायला ",.. अक्षय

" हो आता स्वतः च हॉस्पिटल आहे तर देतो जास्तीचा वेळ मी तिकडे", ... सागर

मनीषा अक्षय दोघेजण गप्प होते.

काय झालं काही प्रॉब्लेम आहे का,.. "काय झालं मनीषा टेन्शन वाटत आहे तुझ्या चेहऱ्यावर",

मनीषा उठून आत चालली गेली.

" काही नाही रे अक्षय",.. सागर काळजीत होता.

" आज मनीषाला बघायला पाहुणे आले होते, पण त्यांना माझं आणि आरतीची घटस्फोटाची केस सुरू आहे ते समजल्यामुळे त्यांनी नकार दिला आहे, त्यामुळे मनीषा नाराज आहे, कसे लोक आहेत या जगात",.. अक्षय

अक्षयचा फोन आला,.. "एक मिनिटात आलो मी सागर",.. मनीषा.. त्याने आवाज दिला,.. "बाहेर येऊन बस सागर सोबत, मी फोनवर बोलतो आहे",

मनीषा बाहेर येऊन सागर जवळ बसली.

"आय ऍम सॉरी मनीषा मला समजलं तुझ्याबद्दल, काळजी करू नकोस ",.. सागर

"कस आहे ना सागर जे खरच दोषी आहे त्यांना सगळेजण पाठीशी घालतात आणि माझ्या घरचे सगळे खरंच चांगले आहेत तर त्यांना नाव ठेवतात, मला नाही सहन होत, माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण आई बाबा आणि अक्षयला कोणी काही बोललं तर मला चालणार नाही",.. मनीषा

" बरोबरच आहे, जर खरच त्यांनी त्रास दिला असता तर आपणच त्यांना बोललो असतो ",.. सागर

" बघितले ना तू सागर किती चांगले आहेत आई बाबा, अगदीच खूप पटतं त्यांचं आणि आई कधीच कोणाला काहीच त्रास देत नाही, अगदी या वयातही खूप काम करत असते",.. मनीषा

" हो मी नेहमी बघतो खरंच चांगले आहेत काका काकू ",.. सागर

" तू मदत कर ना सागर अक्षय दादाला, विकासला सांग ना काही तरी चांगली आयडिया सुचवायला म्हणजे दादाच आणि वहिनीचं नीट होईल, दादा पण आता हल्ली नाराज असतो, मला खुप काळजी वाटते दादाची",.. मनीषा

" ठीक आहे, आपण उद्या भेटूया सगळे आणि ठरवूया तु काळजी करु नकोस मनीषा, देव बघत असतो, एकदम नीट होणार आहे तुझ आणि अक्षयच ही, मी आहे",.. तो मनीषा कडे बघत होता, तिला समजल नाही का बघतो आहे हा असा, एकदम तिने खाली बघितल,

अक्षय बाहेर आला,

" अक्षय आपण उद्या विकासला भेटायला जात आहोत, आता आपण ठरवून टाकू पुढे काय करायचं ते, आरती काहीही म्हटली तरी ऐकणार नाही तू, पुरे झाल टेंशन, आता घाबरून जाऊ नकोस अक्षय, माझ्याकडे आहे एक आयडिया उद्या सांगतो",.. सागर

ठीक आहे

"निघतो मी",.. तो अक्षय मनीषा कडे बघत होता.

जेवण झालं, मनीषा तिच्या रूम मध्ये आली, ती सागरचा विचार करत होती, आज सागर माझ्या कडे बघत होता का? , त्या दिवशी ही तो सारख माझ्या कडे बघत होता, आता हल्ली तो सारख घरी येतो, नक्की काय म्हणण आहे त्याच? , अक्षय दादाला खुप मदत करतो तो, चांगला आहे एवढा मोठा डॉक्टर आहे, स्वतः च हॉस्पिटल आहे, त्याला माझ्याशी ओळख वाढवायची असेल का? की माझ कुठे लग्न जुळत नाही म्हणून तो माझ्याशी लग्न करेल, मला सहानुभूती अजिबात नको आहे, एकदा बोलाव लागेल सागर सोबत.

दुसऱ्या दिवशी अक्षय सागरला भेटायला जात होता, तो मनीषाला आग्रह करत होता,.. "चल मनीषा तू",.

"दादा तु जा मला अभ्यास आहे",.. तिला जायच नव्हत, कसतरी वाटत होत सागर समोर.

"चल ना येवु एका तासात",.. अक्षय

तेवढ्यात बाहेर सागर गाडी घेवुन आला, मनीषा सोबत येते बघून तो खुष होता, गाडीत मनीषा मागे बसली होती, अक्षय खुप बोलत होता सागर सोबत, मनीषा गप्प होती, ते कॅफेत आले.

🎭 Series Post

View all