Login

थोड ऐकणार का?... भाग 5

बालपण इतक्या चांगल्या संस्कारात गेलं, कधीच कोणाला उलटुन बोलण्याची बिशाद नव्हती, घरच्यांनी तसं शिकवलंच नव्हतं,

थोड ऐकणार का?... भाग 5

मला तुझ्यासोबत रहायच आहे. 


©️®️शिल्पा सुतार

........


आरती कधीची अक्षयची वाट बघत होती, ते येत का नाही इकडे, जास्त करते का मी? .. 

"आई बघितल का माझी तर जावू दे यांना आरवची आठवण येत नाही, जवळजवळ महिना होईल ते आले तरी का आरवला भेटायला? ",


"अग असे असतात लोक, जो तो आपल आपल बघतो" ,.. प्रमिला ताई 


"ताई तू का गप्प आहेस?, काय झालं ",.. आरती 


" हे तू ठीक नाही करत आहेस आरती, अक्षय राव भेटायला येत होते तुला , तू भेटू दिल का आरवला त्यांना आणि आता तू असं का म्हणते आहेस, एवढ वाटत तर तु फोन करून बघ त्यांना, मला असं वाटतं की तु तुझ्या घरी जावं, एवढं ताणू नको आरती नाहीतर तुटेल, तुला तुझ चांगल वाईट समजत नाही का? ",.. सुषमा 


" मला तुटायलाच हवा आहे हे, मला नाही जायचं तिकडे, ते माझ काही ऐकत नाहीत ",.. आरती 


 "काहीही सांगू नको ग सुषमा तू तिला, आता जर तीने या लोकांचा ऐकलं तर कायमच तिला ऐकत बसावं लागेल ",.. प्रमिला ताई 


" ऐकू दे ना मग कायमचं, काय हरकत आहे, तिच्याच घरचे आहेत ते लोक आणि तिचाच नवरा आहे आणि ह्या तुमच्या दोघींच्या ज्या मागण्या आहेत त्या एकदम चुकीच्या आहेत, आई तु तीला समजुन सांगायचा सोडुन अजुन काय भांडायचे सल्ले देतेस, आरती शेवटी आपल घर ते आपल असत, जा अक्षय कडे वापस ऐक जरा ",.. सुषमा. 


पण कोणी सुषमाच ऐकल नाही. आरती प्रमिला ताई कमालीच्या हट्टी होत्या 


एक महिन्यापासून अक्षय आला नाही हा राग आरतीने डोक्यात घालून घेतला,.." यांना राहायच नाही माझ्या सोबत, आई बाबा मला घटस्फोट हवा आहे, 


"काय करणार पण मग तु आरती एकटी? , आरवचा तरी विचार कर, बोलुन बघ अक्षय सोबत, अस दुसर टोक नको गाठु, थोड अॅडजेस्ट करायच असत संसारात",.. सतीश राव 


" एकटी कश्याला राहील ती, आपण आहोत की सोबत तिच्या आणि ते लोक कसे वागतात ते दिसत नाही का तुम्हाला" ,.. प्रमिला ताई 


" मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही, अक्षय चांगले आहेत, तु म्हणत असशील आरती तर मी बोलु का अक्षय रावांशी",.. सतीश राव 


" नाही बाबा मी ऐकणार नाही",.. आरती 


" ठीक आहे वेळ घे थोडा विचार कर परत एकदा",.. सतीश राव 


माझ ठरलं बाबा,.. आरतीने अक्षयला घटस्फोटाची नोटीस पाठवली. तिची आई होती घरी भर टाकायला, तु घाबरू नकोस आरती चांगली पुरून उर त्यांना. 


नोटीस बघून अक्षय घाबरला लगेच तो संध्याकाळी घरी आला, थोड शांततेन घेतल होत त्याने, आल्या आल्या त्याने आरवला घेतल, त्याच्या डोळ्यात पाणी होत,.. "आरती काय अस करतेस ही नोटिस कसली पाठवली मला?" , 


"तुम्ही वाचली नाही का? एक महिना झाला तुम्ही इकडे आले नाही की फोन नाही, आरवला ही तुम्ही भेटायला आले नाही, तुम्हाला नाही रहायच आमच्या सोबत तर ठीक आहे, मी सुटका करून देते तुमची",.. आरती 


"अग तूच माझ्याशी बोलत नव्हतीस ना , मी आलो तरी आरवला माझ्या कडे देत नव्हतीस, मी किती वेळा तुला घ्यायला आलो तु काही ऐकत नाही म्हणुन मी विचार केला की तुला वेळ हवा असेल, मला तु हवी आहेस, अस करु नकोस, बॅग भर आपण लगेच जातो आहोत घरी, आता मी काहीही ऐकुन घेणार नाही" ,.. अक्षय 


" नाही मी येणार नाही अक्षय",.. आरती 


"चुकल माझ आरती मी माफी मागतो, पाया पडू का तुझ्या, मी फोन करायला हवा होता तुला, प्लीज एकदा ऐक माझ, चल घरी",... अक्षय 


"सेपरेट स्वतः च घर ते ही आपल्या दोघांच असेल फक्त तरच येईन मी, बाकीच्या घरच्यांनी मधे मधे करायच नाही ",.. आरती 


" ते शक्य नाही आरती, अग आरव लहान आहे, आईची गरज लागेल तुला ",.. अक्षय 


" नाही लागणार मला त्यांची गरज, तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही आता अक्षय, तुम्हाला ऐकायच नाही माझ काही, तुम्ही मला घटस्फोट द्या",.. आरती 


अक्षय चिडला होता , आरती जवळ येवुन बसला,.. "आरती ऐक ना माझ, आई बाबा आहेत ते माझे अस नको करूस, घरी चल मी तुला शब्द देतो मी तुझी पूर्ण काळजी घेईन, काही काम कराव लागणार नाही , तुला आणि आरवला नीट सांभाळेल मी, मला ही तू हवी आहेस आरती, किती दिवस झाले आपण अस दूर दूर आहोत, चल आता पुरे झाल, सगळ सोड माझ्या कडून कधी काही त्रास झाला का तुला? अस नको करू घरी चल, आपल प्रेम आहे एकमेकांवर, माझ्या बाळाची आई आहेस तु, अस करु नकोस, माझा विचार कर, मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय, माझ काही चुकलं असेल तर माफ कर मला ",... अक्षय 


 पण आरती समोर त्याचं काही चाललं नाही, ती तिच्या मुद्यावर ठाम होती, अक्षय खूप बोलला तिला, तिने त्याला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायची धमकी दिली, आई बाबा मनीषा तुम्हाला पोलिसात देईन मी, माझा छळ केला अस सांगेन सही करा गुपचुप, 


आरतीने अक्षय कडून पेपर वर सही करून घेतली, अक्षय शांतपणे घरी आला, काय करू मी, सगळे नियम कायदे बऱ्यापैकी मुलींच्या बाजूने आहे त्यामुळे आरतीने त्याचा गैरफायदा घेतला घटस्फोटाची केस सुरू झाली होती, खूप दुःखी होता अक्षय. 


सुरेश राव मालु ताई सारख सांगत होते तु जा आरती सोबत रहायला, पण अक्षय ऐकत नव्हता. 


एक महिना झाला एक दोनदा ते कोर्टात जावुन आले, मुर्खपणा सुरू होता, अक्षयने आता विचार करण बंद केल होत, 


अक्षय आता बर्‍या पैकी सावरला होता, सवय झाली होती त्यालाही तिच्या नसण्याची, आधी सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षणात आरतीची आठवण येत असे, पण आता तिची आठवण येण्यापेक्षा तिच्या वागण्याचा त्रास होत होता त्याला, नकोच वाटत होत बोलायला तिच्याशी, सदोदित भांडायला तयार असायची ती. 


जे झालेले नाही त्या घटनांच्या आरोप ती अक्षय वर लावत असायची , एका बाजूने तरी प्रेम किती दिवस करणार ना, आरतीसाठी तो आधी खूप त्रास करून घ्यायचा, तिच्या सोबत घालवलेले दिवस आठवत रहायचा, तिचं ते रूप खूपच छान होतं, तिला तेव्हा ही काहीच वाटत नव्हत का माझ्या बद्दल, मी एका बाजूने नात टिकवत होतो, आता तर तिच्यासोबत कसं वाटतं आहे हे सुद्धा त्याला आठवत नव्हतं. 


का माझ्या बाबतीत असं झालं? माझं तर जाऊद्या यात आरवचा काय दोष, एवढ्याशा बाळाला आई बाबा दोघंच प्रेम मिळायला हव, 


आई बाबा किती साधे आहेत त्यांना का इतका त्रास आमचा, माझी अशी घटस्फोटाची केस सुरू आहे त्यामुळे आता मनीषाला ही स्थळ येण बंद झाला आहे, मुळात आमच्या तिघांचा काहीच दोष नाही, 


दोष आहे तो आरतीचा आहे तिच्या वागण्याचा आहे तिला अजिबात तारतम्य नाही कुठल्या गोष्टीचं, मूर्खासारखी करते, पदरात मूल आहे त्याचा सुद्धा विचार करत नाही. 


बालपण इतक्या चांगल्या संस्कारात गेलं, कधीच कोणाला उलटुन बोलण्याची बिशाद नव्हती, घरच्यांनी तसं शिकवलंच नव्हतं, त्याच्यामुळे तो आरतीला ही कधीच काही बोलत नव्हता, पण तिनेही याचा गैरफायदा घेऊ नये ना, हे तिला समजलं नाही, 


आता नाही पण मी बदला घेणार, आरतीला तिची जागा दाखवून देणार, ती कशी कोर्टात मोठ्या मोठ्याने भांडते, तस मी पण करणार तिला, 


एक दिवस तो ऑफिसमधुन घरी येत होता त्याला त्याचा बालपणीचा मित्र सागर भेटला, तो पेशाने डॉक्टर होता, दोघ चहा घ्यायला हॉटेल मध्ये गेले,.. "कस सुरू आहे तुझ अक्षय?", 


अक्षय त्याला सगळ सांगत होता, आरती बद्दल आरव बद्दल, 


"कठिण आहे हे माझा एक मित्र विकास मेंन्स राईट संघटनेचा अध्यक्ष आहे त्याची मदत घेवु शकतो आपण",.. सागर 


सागरने विकासला फोन लावला, तो अक्षयची चौकशी करत होता, अक्षयने त्याला त्याच्या बाबतीत काय काय झालं ते सांगितलं. 


खूप दुर्दैवी आहे हे, बऱ्याच घटना घडत आहे सध्या अशा, टाळी एका हाताने वाजत नाही हे माहिती आहे पण अशा काही केसेस मध्ये बऱ्यापैकी मुलींचा दोष असतो, मुली खूपच कायद्याचा फायदा घेत आहेत. 


" असंच झालं आहे माझ्या बाबतीत, माझे आई वडील खरच खूप साधे आणि चांगले आहे काहीही त्रास नव्हता आरतीला त्यांचा, मुळात तिने इथे किती राहून पाहिला आहे, इन मीन सहा महिने सुद्धा राहिली नाही नीट ती, जेव्हा बघावं तेव्हा माहेरी जाणार, बाहेरच्यांच ऐकणं, घरी येऊन आम्हाला त्रास देण, घरात काहीही काम न करणं आणि आता तर बाळंतपणापासून ती माहेरीच आहे तिला यायचं नाही सगळ्यांनी समजवुन पाहिलं आहे",... अक्षय 


" बरेच उपाय आहेत माझ्याकडे या अशा गोष्टीं साठी तू काळजी करू नको अक्षय ",.. आता अक्षयच्या घटस्फोटाची केस विकास कडे गेली होती, विकास सगळ्या गोष्टीचा स्टडी करत होता, एकदा दोनदा तो आरतीकडे जावुन आला, तिला भेटून आला, समजवुन सांगून पाहिलं त्या लोकांना, तशी अक्षयचीच इच्छा होती. 


पण आरतीच्या घरच्यांनी खूप अग्रेसिव्ह ऍप्रोच घेतल्यामुळे ही गोष्ट करता आली नाही. 


" ठीक आहे तुम्हाला शांतपणे ऐकायचं नाही तर आपण आता ही केस लढू, तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा" ,. विकास 


आरतीने तिच्या मागण्या सांगितल्या, सेपरेट रहायच, स्वतः च घर, त्यांच्या घरचे यायला नको घरी, जर घटस्फोट दिला तर दर महिन्याला मला अक्षय कडून पैसे हवे, माझ्या जवळ लहान बाळ आहे, मी निराधार आहे, नौकरी नाही, मला बर नसत डॉक्टरचा खर्च होतो खूप, बरेच महत्वाचे पॉईंट्स आरतीने पेपर वर लिहून दिले. 


"तुमची सही करा या खाली आरती",.. विकास 


आरतीने सही केली. 


विकासने तो पेपर कोर्टात सबमिट केला. 



🎭 Series Post

View all