थोड ऐकणार का?... भाग 4

"मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आहे दवाखान्यात की मला सेपरेट राहायचं आहे, तसं जर तुम्हाला चालत असेल तर मी येते, नाही तर मला यायचं नाही


थोड ऐकणार का?... भाग 4
मला तुझ्यासोबत रहायच आहे.

©️®️शिल्पा सुतार
........

अक्षय खूपच खुश होता, घरचे अक्षयही आरतीची खूप काळजी घेत होते.

आधीपासुन काहीच काम न करणारी आरती आता अगदीच असहकार दाखवत होती, आता कोणी काही बोलत नव्हते तिला, घरून आरामात डबा मिळत होता, दिवसातून चार पाच वेळा मालुताई वेगवेगळे पदार्थ करुन देत होत्या,

कॉलेजला गेल्यानंतर आरतीने सुषमाला फोन केला,.. " हॅलो ताई" ,

"बोल आरती कसं वाटत आहे आता? , काय खावसं वाटत तुला? " ,. सुषमा.

"ठीक आहे मी ताई" ,. आरती हसत होती.

"जेवली का तु? ",.. सुषमा.

"हो आईनी भेंडीची भाजी दिली होती डब्यात, छान होती",.. आरती

"लकी ग तु तुझ्या घरचे किती लाड करतात तुझे, नाही तर आम्हाला प्रेग्नंट असतांना किती काम होते, सगळा त्रास सहन करून घरच किती काम करावे लागत होते",...सुषमा.

"त्यात काय ग ताई त्यांच्या घरच्या बाळाला वाढवते आहे ना मी ",.. आरती.

" तरी सुद्धा नाही करत कोणी इतक, तु तुझ्या घरी नीट सगळ्यांना सांभाळुन रहा, चांगल आहे तुझ सासर",.. सुषमा.

" ताई पण डेलीवरी नंतर काय मी करणार आहे ते माहिती नाही, बाळ राहील का घरी? कॉलेजला कस जाणार मी? ",.. आरती

" आहेत ना तुझ्या सासूबाई मग कशाला काळजी करतेस",..सुषमा

"माहिती नाही त्या कशा सांभाळतील बाळाला",.. आरती

"किती चांगल्या आहेत त्या, असा विचार करू नकोस, मोकळ रहात जा घरी, त्या खुप करतात तुझ ",.. सुषमा

त्यात प्रमिलाताई आरतीला रोज फोन करून आराम करायचा सल्ला द्यायच्या, त्यांच्या पाठींब्या मुळे आरती सासरी नीट रहात नव्हती.

एकदा दोनदा मालुताईं सोबत आरती डॉक्टर कडे जाऊन आली होती, डॉक्टरांनी स्वतः तिला हलके काम करायचं सल्ला दिला होता, थोडा वॉक गरजेचा आहे, नुसत बसुन राहु नका तुम्ही आरती.

" माझ्याच्याने होतच नाही काही , खुप त्रास होतो",.. आरती

"काय त्रास होतो नीट सांगा ",.. डॉक्टर

आरती गप्प होती, काही करत नव्हती, नंतर कोणी काही म्हटले नाही तिला, उगाच काही त्रास झाला तर नको म्हणून मालुताई गप्प होत्या, अक्षयने ही एकदा दोनदा तिला सांगण्याचा प्रयत्न केला,.." आरती अग घरकाम नको करू पण वॉक वगैरे घेत जा, नुसत झोपुन राहु नको ",

तरी आरतीने ऐकलं नाही,

"होत असेल त्रास जावु दे अक्षय",.. मालुताई

"आई अगं जाऊ दे जाऊ दे करून जास्त करते आहे आरती ",.. अक्षय

"काय करायचं मग ती गरोदर आहे, तिला ओरडायचं का? थोडे दिवसांनी येईल समज, आई होईल ती",.. मालुताई
....

एक दिवस दुपारी कॉलेजला आरती चक्कर येऊन पडली, तिने तिकडं तिच्या घरच्यांना बोलवून घेतलं, घरच्यांनी तिला दवाखान्यात ऍडमिट केलं, संध्याकाळी अक्षय मालुताई सुरेशराव मनीषा दवाखान्यात पोहोचले, तेव्हा किती बोलल्या प्रमिला ताई त्यांना,.." तुम्ही आमच्या मुलीकडे लक्ष देत नाही, ती गरोदर आहे तरी तिला घरातली काम करायला लागतात, शिवाय कॉलेज ही आहे, हे वागणं बरोबर आहे का तुमचं?",

" तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, असं काही आमच्या घरचं वातावरण नाही, आरामात आहे आरती ",.. घरचे किती समजून सांगत होते, तरी त्या ऐकत नव्हता, अक्षय राव तुम्ही तरी लक्ष द्यायच आरती कडे

" खरच आरामात आहे आरती आमच्याकडे, आई मनीषा काही काम देत नाही तिला ",.. अक्षय आरती कडे बघत होता.

" सगळ्यांना असंच वाटतं की आपल्या आई वडील खूप चांगले आहेत, पण समोरच्याला माहिती असत किती त्रास आहे ते",.. प्रमिला ताई.

आरतीला माहिती होत खर काय आहे ते, तरी ती याप्रसंगी काहीही बोलली नाही, तिने तिच्या आईचीच बाजू घेतली, आराम होत नाही म्हणुन तिथुन माहेरी निघुन गेली.

सातव्या महिन्यात डोहाळे जेवण कार्यक्रम साठी आरती आली होती, तेव्हा तिला काही काम सांगु नका मालुताईंनी आधीच सांगुन ठेवल, खूप छान कार्यक्रम केला मालुताईंनी, आरतीच्या घरचे वेळेवर आले लगेच नंतर आरतीला घेऊन माहेरी गेले, त्यानंतर आरती सासरी आलीच नाही,

आरतीला हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केल तेव्हा अक्षय तिकडे होता, तिला होणारा त्रास त्याला बघवत नव्हता, मुलगा झाला, अक्षय घरी आला, खुप आनंदात होता तो, मी आरती बाळाला खुप जपणार आहे. घरी मन लागत नव्हत त्याच, सारख बाळा जवळ थांबव अस वाटत होत,

अक्षय मालुताई मनीषा दवाखान्यात जायची तेव्हा आरती असहकार दाखवत होती, अजिबात कोणाशी नीट बोलत नव्हती, बाळाला बघुन सगळे गप्प होते,

थोड्या वेळाने मालुताई मनीषा घरी गेल्या, अक्षय आरती जवळच बसला होता, ती बोलतच नव्हती त्याच्याशी,

"काय झालं आहे आरती काही प्रॉब्लेम आहे का? तु मूड असा काय केला आहे? हे आपल्या बाळासाठी चांगलं आहे का? एवढा छान बाळ आपला, तुझ्या जवळ असतो तो जरा आनंदी राहत जा, काही हव का",... अक्षय

"का आनंदी राहू मी काय झाला आहे असं मोठं",.. आरती

"कशासाठी चिडलीस तू",.. अक्षय

" मला माझ्या बाळाला त्या घरी घेऊन यायचं नाही ",.. आरती

" म्हणजे? ",.. अक्षय खुप चिडला होता, या पुढे अस बोलली तर बघ आरती, काय अस? मी तिथेच रहातो, माझं घर आहे ते, आपल्याला तिथे रहायचा आहे, तुला बाळाला तिथेच घेऊन यावं लागेल ना.

" तेच मला नको आहे अक्षय आपण नविन घर घेवू ना, तुम्ही घर घ्या बाळासाठी, तुम्हाला शक्य आहे ते ",.. आरती

" कसं शक्य आहे ते आरती, परिस्थिती समजून घे. मी पण तुझ्याच एवढा आहे ग वयाने, एक दोन वर्ष इकडे तिकडे, नवीन नोकरी आहे माझी, घरांच्या किमती किती आकाशाला भिडल्या आहेत, घेऊ आपण घर मी नाही म्हणत नाही थांब थोडं आणि आपलं स्वतःचं घर आहे की",.. अक्षय

" ते तुमच्या वडिलांचं घर आहे",.. आरती.

" ठीक आहे आपणही घेऊ घर अजून लोन मिळणार नाही निदान थ्री बीएचके तरी लागेल आपल्याला",.. अक्षय

" एवढं मोठं घर कशासाठी? आपल्याला वन बीएचके पण चालेल, नाही तरी तुम्ही मी आणि बाळ आपण तिथेच राहणार ना ",.. आरती.

"कोणी सांगितलं तुला असं आई-बाबा आणि मनीषा कुठे जाणार मग, एक मिनिट आरती तुला असं वाटत आहे का आपण दोघांनी सेपरेट राहायचं, असं अजिबात चालणार नाही, महिना सव्वा महिना काय राहायचं ते माहेरी रहा आणि गुपचूप बाळाला घेऊन घरी ये, हे असले विचार तुझ्या डोक्यात कोण टाकतं मला अजिबात चालणार नाही",.. अक्षय

" का नाही चालणार? लग्न झालं आहे ना आपलं, मी माझ्या नवऱ्याकडून अपेक्षा नाही ठेवणार तर कोणाकडून ठेवणार",.. आरती.

" अरे पण आमच्या घरच्यांचा काही प्रॉब्लेमच नाही, उलट आई मदतच करते तुला, आपल्या लग्न झाल्यापासून तीच करते आहे तुझं सगळं, तू काय केलं तिचं",.. अक्षय.

" ते तुमच्या दृष्टीने झालं, माझ्या दृष्टीने बघून एकदा बघा त्यांच्याकडे ",.. आरती.

" काय झालं तुला त्रास दिला का तिने? , टोमणे मारले का? काम दिलं का काही?, आज सांग तू मला सगळ, काहीच तर झालं नाही असं, काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे आता आपण नको बोलायला, तू बाळंतीण आहेस, तू घरी गेली की मग आपण बोलू आपण, हा विचार डोक्यातून काढून टाक मला चालणार नाही हे ",.. अक्षय घरी निघून आला, त्याला टेन्शनच आलं होतं तिच्या वागण्याचं, त्यात आता बाळही आहे, काय विचार करते आहे ही मुश्किलच आहे सगळं.

आरती दवाखान्यातुन माहेरी गेली, अक्षय कडचे पाहुणे जेव्हा तिकडे जायचे तेव्हा तिच्या घरचे नीट वागायचे नाही, बारशाच सुद्धा ते लोक नाव काढत नव्हते, एकदा बारसं झालं की आरतीला इकडे घेऊन येता येईल, दोन-तीनदा मालू ताईंनी अक्षयला विचारलं होतं,

"मी विचारतो आई त्यांना कधी आहे बारस",.. अक्षय

"नसेल असेल करायचं त्यांना बारस तर घेऊन ये, आरतीला आपण इकडे करू आपल्या बाळाचे बारसं",.. मालुताई

अक्षयने आरतीला फोन केला, तिने इकडे यायला स्पष्ट नकार दिला

"काय झालं आहे आता",.. अक्षय.

"मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आहे दवाखान्यात की मला सेपरेट राहायचं आहे, तसं जर तुम्हाला चालत असेल तर मी येते, नाही तर मला यायचं नाही ",.. आरती.

" तू काय बोलते आहे सारख अस तुला तरी समजतं ना",.. अक्षय तिला खुप समजावत होता पण आरतीने काहीही ऐकलं नाही.

घरचे सगळे येवून समजवून गेले, तरी काही फरक पडला नाही आरतीत, उलट तिने दोन शब्द ऐकवले अक्षयच्या घरच्यांना.

" आई बाबा मनीषा आता अजिबात कोणी जायच नाही आरती कडे राहू दे तिला तिकडे",... अक्षय.

बरेच दिवस झाले अक्षय आरतीशी बोलाल नव्हता, त्याला त्यांच्या बाळाची खुप आठवण येत होती, नंतर त्याला समजलं की बाळाचं नाव आरव ठेवलं आहे, आरतीने साधा फोन करून त्याला सांगितलं सुद्धा नाही, त्याला खूप वाईट वाटलं, बाळाच भविष्य काय आता?, बाळाचा काय दोष आहे, बाळाची फरपट होते आहे यामध्ये, आई एकीकडे वडील एकीकडे, आरतीच्या घरच्यांना समजायला पाहिजे होत, तिला समजावून वगैरे इकडे पाठवून द्यायचं तर अजून तिची आई तिला सपोर्ट करते आहे, एकदम चुकीच आहे हे.
.......

🎭 Series Post

View all