थोड ऐकणार का?... भाग 3
मला तुझ्यासोबत रहायच आहे.
©️®️शिल्पा सुतार
........
........
जरा वेळाने आरती जेवायला बाहेर आली, आरव झोपलेला होता, सुषमा तिच्याकडे बघत होती,.. "ये आरती इकडे येवून बस" ,
जिजाजी सुषमा ताईला घ्यायला आले होते, ते आरतीची चौकशी करत होते, आई बाबा सुषमा ताई सगळे छान बोलत बसले होते, खुश होते ते, मी इथे एकटी आहे याच कोणाला काही घेण नाही.
सुषमा ताई ही नवर्याच्या मागे मागे होती, आरती बघत होती त्यांच छान एकत्र रहाण, प्रेमाने एकमेकांशी बोलण , बघवत नव्हत तिला, कंटाळली होती ती एकट राहून, खूप राग येत होता , सारखा अक्षय आठवत होता ,
आरती उठली तिथून, ती रूम मध्ये येवून बसली, खूप रडू येत होती तिला, खर तर तिला आज अक्षयला बघून सारख त्याच्या सोबत रहावस वाटत होत, एक अनामिक ओढ लागली होती त्याची, पण तरी ती माघार घ्यायला तयार नव्हती,
ति मोबाईल मध्ये तिचे आणि अक्षयचे फोटो बघत होती, या फोटोत छान तब्येत होती अक्षयची, आता आज बारीक वाटत होते ते, हा आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हाचा फोटो, किती प्रेम होत अक्षयच्या डोळ्यात आणि कौतुक करत होते अक्षय माझ,
अगदी दर वेळी ती जे म्हणायची ते ऐकायचे अक्षय, याचा गैरफायदा घेतला तिने,
"खूप चांगल वाटत होत अक्षय सोबत रहातांना, खुश होती मी तेव्हा, त्यांचा सहवास प्रेम किती छान होत, खूप सुंदर दिवस होते ते, आता का ऐकत नाही अक्षय माझ? आधी माझ्या मना प्रमाणे नेहमी अक्षय वागत होते, पण ते ही या वेळी हट्टाला पेटले होते",.. आरती विचार करत होती
कारण आरती चुकीची होती, थोड समजत होत तिला पण कमी पणा नको घ्यायला, आता ऐकल की कायम ऐकाव लागेल अस वाटत होत तिला,
आरती परत चिडली, नको बघायला या अक्षयचे फोटो, खूप त्रास होतो मला अस, पुढच्या कोर्टाच्या तारखेला मी अक्षयशी बोलणार नाही, आता तिला बर वाटल होत.
सुषमा निघत होती, ती आत आली आरतीला भेटली,.. "ताई रहा ना थोडे दिवस माझ्या सोबत",
"कस शक्य आहे ते आरती, ह्यांची गैरसोय होते, तु चलते का माझ्या घरी थोडे दिवस? ",.. सुषमा.
नको ताई..
"परत एकदा विचार कर आरती, मला वाटत तु अक्षय कडे जा रहायला, तू अशी वागते तरी ते अजूनही खूप प्रेम करतात तुझ्या वर, ऐक माझ.. तुझ्या बाळाचे वडील आहेत ते, आईच नको ऐकु",... सुषमाने तिला मिठी मारली,
आरती शांत होती, सुषमा गेली, किती छान दिसते ताई, खुश आहे ती तिच्या घरी, मला पण जायच अक्षय कडे, किती तरी दिवसानी मला अस कोणी तरी मिठी मारली,
प्रमिला ताई आत आल्या , आरव रडत होता,.." आरती कुठे लक्ष आहे तुझ? बाळ रडत आहे",
आरतीने त्याला घेतल.
कित्येक रात्री अश्या एकट्या आरवला घेवून काढल्या होत्या तिने, इकडे आरवला कोणी सांभाळत नव्हत, आरतीची जबाबदारी होती ती, आई बाबा, ताई जिजाजी खुश आहेत त्यांच्या आयुष्यात, मी अक्षय का नाही राहू शकत अस, तो माझ ऐकत नाही, मागे मी घटस्फोट मागितला तेव्हा किती चिडला होता तो, त्या पेक्षा सरळ वेगळ घर घेतल असत त्याने, पण अस झाल नाही, जर तो माझ्या वर प्रेम करत असता तर केल असत माझ्या मनाप्रमाणे, जावू दे ती आरवला गप्प करत होती, आता इगो पॉईंट झाला होता त्यांच्या हा. आरती माघार घेणार नव्हती.
.......
.......
"अक्षय जेवायला चल",.. मालुताई
"नको मला भुक नाही",.. अक्षय अजुनही आत रूम मधे बसुन होता,
मालुताई आत गेल्या, लाइट लावला,.. "हे अस जेवण सोडून काय होणार आहे अक्षय सांग बर, चल लवकर, सगळे वाट बघत आहेत",
कसतरी अक्षयने थोड खाल्ल, तो परत रूम मध्ये येवून बसला, आरती आरवचा चेहरा डोळ्यासमोर होता,
जुन्या गोष्टी अक्षयला आठवत होत्या,
जुन्या गोष्टी अक्षयला आठवत होत्या,
अक्षय मालुताई मनीषा आणि सुरेश राव आज आरतीकडे तिला बघायला जाणार होते, ओळखीच्या काकांनी हे स्थळ सुचवल होत, खूपच खुश होते सगळे, आरतीचा फोटो पहिल्यापासून खूपच आवडली होती ती अक्षयला, साधी सुंदर आरती, केस लांब सडक, कधी तिकडे जावु अस झाल होत त्याला, मनीषाच्या मदतीने आज विशेष तयार झाला होता अक्षय.
छान मोठा बंगला होता आरतीच्या घरच्यांचा, त्या लोकांनीही खूप तयारी केली होती, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली आरती छान तयार झाली होती, आता परीक्षा झाली की लगेच लग्न होणार होत, पुढे काय शिकायचं ते आता तुझ्या घरी जाऊन शिक, आई बाबा अस बोलताच आरती लाजली होती, तिची बहीण सुषमा जिजाजी प्रमिलाताई सतीश राव सगळेच खूप उत्साही होते, दोघी बाजुनी लगेच पसंती झाली,
आरती अक्षय खूप खुश होते, लग्ना आधी बर्याच वेळा दोघ भेटले होते, मोबाईल फोन ड्रेस साड्या बरेच गिफ्ट अक्षयने घेतले होते आरती साठी, तिला कुठे ठेवू कुठे नको अस झाल होत त्याला, आरती पण अगदी स्वतःला खूप लकी समजत होती, अक्षयच्या घरचे चांगले होते, दोघ एक एक तास फोन वर बोलत होते, दोघी बाजुच्या घरचे खुश होते.
आरतीची परीक्षा झाल्यानंतर त्यांच वाजत गाजत लग्न झालं, मुळातच शांत स्वभावाच्या मालुताईंनी लगेच आरतीला सांभाळून घेतलं, पूजा देवदर्शन झाल्यानंतर अक्षय आणि आरती दोघ फिरायला गेले,खूप खुश होते दोघ, आरती अल्लड होती जरा, प्रत्येक गोष्ट स्वतः च्या मनाप्रमाणे व्हायला हवी हा तिचा अट्टहास होता, अगदी अक्षयने ऑर्डर केलेल भाजी ती बदलून घेत होती, पण ती वेळ अशी होती नुकतच लग्न झालेल, अक्षय काहीही बोलत नसे तिला, खुप सांभाळुन घेत होता तो.
तिथेच अक्षयला समजत होतो की आरती जरा हट्टी आहे स्वतःच्या मनाप्रमाणे नाही झालं तर ती अजिबात समजून घेत नाही दुसऱ्याचा विचार करत नाही, आदळ आपट तर तीच शस्त्र आहे, त्याला वाटलं होईल ठीक नंतर.
दोघ फिरून घरी आले, अक्षयची सुट्टी संपली तो ऑफिसला जायला लागला, आरती घरी असायची, अजून पुढच अॅडमिशन घेतल नव्हत तिने, अक्षयची अपेक्षा होती की तिने त्याच सकाळी सगळ आवरून द्यायला हव, निदान चहा पाणी तरी विचारवं, पण आरती नुसती रुममध्ये बसुन असायची, कित्येक वेळा तिला सांगितला अक्षय ने चहा झाला का? पोहे कर, तेवढ्या पुरत करायची ती, परत दुसर्या दिवशी जैसे थे, स्वतः च्या मनाने, स्वतःच समजुन ती वागत नव्हती,
बर्याच वेळा ती माहेरी निघून जायची, अक्षयला तिकडे घ्यायला बोलवुन घ्यायची, आता अक्षय कंटाळला होता दिवस भर ऑफिस मधे थकत होता तो,
"आरती अग तु सारख मला तिकडे आई बाबांकडे नको बोलवुन घेत जावु, कधी तरी ठीक आहे मी सारख येणार नाही तिकडे",.. अक्षय
"मी तुमच्या कडे रोज रहाते तुम्ही माझ्या कडे एखाद्या वेळी यायला लगेच नाही म्हणताय, काय अस?",.. आरती
"आता हे तुझ घर आहे ना त्यात काय अस आरती, सारख दुसर्याकडे जाण्याने मान कमी होतो, तू ही जरा रोज तिकडे जाण बंद कर ",.. अक्षय
आरतीने या मुद्यावरून खुप भांडण केल समजून घेत नव्हती ती, माझ्या आई बाबांना भेटायला मला तुमच्या परवानगीची गरज नाही, मुळात हट्टी आरती अजून चिडकी बनली होती, सारख हे घर ते घर अस ये जा करत होती ती,
" आई अग आरती माझ ऐकत नाही तु तरी समजुन सांग तिला",.. अक्षय
"अजुन संसाराचा अनुभव नाही तिला , काळजी करू नकोस, होईल ठीक, मी कस काय बोलणार तिला",.. मालुताई
इतके दिवस लहान होती ती म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी पण दिवसेंदिवस आरती नेहमी ती चिडलेली असायची, इकडे सासरी लक्ष देण तिने बंद केल होत,
मालुताई मनीषाला अतिशय विचित्र अनुभव आला होता आरतीचा, त्या अक्षयला काही सांगायच्या नाही घरातही आरतीच वागणं जरा विचित्र होतं, स्वयंपाक कर तर नाही, ज्याने त्याने त्याचे त्याचे कपडे धुवून घ्या, ते ही ती करायची नाही, अक्षय कडे लक्ष नाही, इतर काही काम नव्हत घरात, बाकी कामाला बाई होती.
"आधी तुम्हीच करत होते ना सगळ काम, मग आता तुम्हीच करा, मी एकटी इथे आल्याने काय फरक पडतो",.. आरती
"ठीक आहे आई आपण ही आरतीचा स्वयंपाक करायचा नाही ",.. मनीषा चिडली होती जशास तसे हव ग.
पण मालू ताई ऐकत नव्हत्या,.. "नको ग बाई आपण काही बोलत नाही तरी इतकी आहे ही, अस केल तर सगळीकडे सांगत फिरेल आणि नको ती अक्षयची बायको आहे, त्याच्या कडे बघून तरी मला तीच कराव लागेल ",
" इथे उलटा कारभार आहे तिने तुझ करायच तर तू तीच करते, तिला घाबरते, म्हणुन फावत तिला ",.. मनीषा
"असु दे अक्षयला नको बोलू काही, आजकाल चिडलेला असतो तो तिच्यावर",.. मालुताई
"कोणीही चिडणार इतक विचित्र वागल तर",.. मनीषा
अक्षय सकाळी नऊला जायचा ऑफिसला तर तोपर्यंत सुद्धा आरतीच आवरलं नसायचं, आधी सारखच मालू ताई आणि मनीषा त्याचा डबा चहा नाश्त्याचं बघायच्या, आता सगळ्यांना सवय झाली होती,
" तू तुझ्या हातात सगळं कारभार घे आरती आता, आईला आराम करू दे",.. अक्षय
" मला इतक्या सकाळी काम सुचत नाही",.. आरती
"रात्रीचा स्वयंपाक ही सुचत नाही तुला आरती काय अस",.. अक्षय
"कोणी कान भरले तुमचे? ",.. आरती
"मला समजत आईच्या हातची चव, तुला काही येत की नाही, थोडी मदत करत जा घरात",.. अक्षय
आरतीने दुर्लक्ष केल.
थोड्या दिवसांनी आरतीचा रिजल्ट लागला, चांगल्या मार्कांनी पास झाली ती , आता तिने पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतल होत, सकाळी पूर्ण वेळ कॉलेजमध्ये असायची ती, स्वयंपाक करायला लागेल म्हणुन डबाही नेत नसे ती, आल्यानंतरही अभ्यास संध्याकाळचं थोडं आवरायची ती.
सहा महिन्यांनी कॉलेज मधे आरती चक्कर येऊन पडली, तिकडुन ती तिच्या आईकडे गेली, दोघी डॉक्टर कडे जावुन आल्या, त्यांनी तिकडे अक्षयला बोलवुन घेतल होत, आरती प्रेग्नंट होती, आरती, अक्षय घरी आले सगळ्यांना खूप आनंद झाला, अक्षय येतांना मिठाई घेवून आला होता,
रात्री अक्षयने आरतीला जवळ घेतल,.. "खूप छान बातमी दिली तू आरती, काय हव तुला, आता काळजी घ्यायची, मी खूप खुश आहे",
"अक्षय मला हे बाळ आता नको आहे, मी अजून शिकते आहे कॉलेज करून कस काय बघणार आहे मी बाळाकडे, आपण थोड्या दिवसांनी प्रयत्न करू ना परत",.. आरती
"तू काय बोलतेस तुला तरी समजत का आरती? , अग एवढ छान सुरु आहे आपल, आहेत घरचे, होवु दे बाळ सांभाळतील घरचे आणि तु येते की लवकर घरी, अर्धा दिवसाचा प्रश्न आहे",. अक्षय
आरतीला तेच वाटत होत अडकुन जावु आपण, नको जबाबदारी, तिला मुक्त जगायच होत,
" काय विचार सुरू आहे आरती?, अस करु नकोस, हे बाळ मला हव आहे ",..अक्षय
सगळे म्हणत होते की आम्ही आहोत काळजी करू नको, तुला जाता येईल कॉलेजला, आता राहिले आहे दिवस तर असं करू नको, पहिले दोन-तीन महिने काय करावे यातच गेले, कोणीही आरतीच ऐकलं नाही, त्यामुळे तिचा नाईलाज झाला,घरचे अक्षयही खुप जपत होते तिला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा