थोड ऐकणार का?... भाग 2

जर तुला खरच तिच्या सोबत रहायचं असेल तर आमची काही हरकत नाही, तुम्ही दोघ खुश तर आम्ही खुश



थोड ऐकणार का?... भाग 2
मला तुझ्यासोबत रहायच आहे.

©️®️शिल्पा सुतार
........

अक्षय मनीषा कोर्टाच्या आवारात पोहोचले, अगदीच नको नको वाटत होतो त्याला हे सगळं , आरती समोर उभी होती, तिच्या वकिलांशी बोलत होती, आरतीला बघून उगीच अक्षय हळवा झाला, बारीक झाली आरती, चेहर्‍यावरच तेज गेल तिच्या, त्याला वाटल अस जाव तिला जवळ घ्याव, सांगाव पुरे झाल आता, घरी रहायला ये, माझ बाळ आरव आरती यांच्या सोबत छान राहीन मी, पण हे मला वाटत, समोर आरती तावातावाने बोलत होती, तिचे मुद्दे वकिलांना सांगत होती.

तिच्यासोबत तिची बहीण सुषमा होती, तीच एक समजुतदार वाटत होती त्या घरात, तिचे बाबा सतीश राव आलेले होते, अक्षय लांबून त्या तिघांकडे बघत होता.

"आता का बघता आहेत हे लांबून आपल्या कडे, बाबा तुम्ही अजिबात बोलू नका त्यांच्याशी",.. आरती.

अक्षय बोलायला पुढे आला, सतीश राव ही पुढे गेले, ते दोघ बोलत होते, अक्षय सारख आरती कडे बघत होता,... "बाबा तुम्ही बोलले का आरतीशी? सांगा ना तिला की मला हे सगळं नको आहे, मी तयार आहे आरती सोबत रहायला",

" तिच्या काही अटी आहेत अक्षयराव, हे माहिती आहे ना तुम्हाला? त्याआधी पूर्ण करा तुम्ही, त्रास आहे तिला तुमच्याकडे, तिच्याकडे लक्ष देण तुमच काम आहे, मला ही हे जे होत ते आवडत नाही, आरतीशी तुमच काय झाल आहे नक्की ते मला माहिती नाही, मी तीला एकट सोडू शकत नाही म्हणून आज आलो आहे इथे, शक्य असेल तर विचार करा आरतीचा ",.. सतिश राव

"बाबा अहो कसला त्रास, अस काही नव्हत आमच्या कडे",.. अक्षय

" हे तुम्हाला वाटू शकतं अक्षय राव, शेवटी तुमच्या घरचे आहेत ते लोक, खरच तुम्हाला आरती सोबत रहायच असेल तर तुम्ही तिची बाजु समजुन घ्या एकदा ",.. सतिश राव

" मदत करा ना बाबा प्लिज, आरतीच्या मागण्या किती आहेत, सहज शक्य आहे का लगेच घर घेण, अजून माझी नोकरी जेमतेम आहे, लगेच होत का सगळ प्रॉपर्टी इस्टेट वगैरे ",.. अक्षय

"मी मदत करायला तयार आहे ना तुम्हाला",.. सतिश राव

"मला काही गरज नाही त्याची, आमचा मोठा बंगला आहे आणि आरती म्हणते तस आई-बाबांना सोडून राहणं शक्य नाही मला, तुम्ही कस तुमच्या मुलीला एकट सोडत नाही तस मी पण आई बाबांना एकट सोडू शकत नाही ",.. अक्षय

आरती बाजूला उभ राहून ऐकत होती सगळ,.. " मग मला आणि आरवला सोडून राहणं शक्य आहे का तुम्हाला अक्षय ? हे असं आहे यांचं बाबा, मी तुम्हाला म्हटली होती ना यांच्याशी बोलू नका, यांना माझ्या आणि आरव विषयी काही प्रेम नाही, सदोदीत आपल आई बाबा आई बाबा असं सुरू असतं, घरीही आले की त्यांच्या जवळच बसून राहतात, ना काही हौस ना मौज, मला नको आहे आता यांच्या सोबत रहाण, नका सांगु त्यांना बाबा काही ",

आरती रडत होती, सुषमा तिला समजावत होती, मनीषा पुढे झाली, तस आरतीने तोंड फिरवल,

" आरती जरा शांततेत घे, एवढ काहीही झाल नाही आपल्यात, घरी चल, केस मागे घे ",.. अक्षय.

" तुम्ही बोलू नका माझ्याशी, या माणसाला बघितलं की माझं डोकं फिरत ",.. आरती खूप चीड चीड करत होती.

"आरती जरा शांत रहा",.. सुषमा समजावत होती.

" तू बघ बघते आहे ना ताई कसं बोलत आहेत हे, एवढं झालं तरी सुद्धा त्यांना मी म्हणते ते मान्य नाही ",.. आरती.

"अग पण बरोबर बोलता आहेत अक्षय, तु आईच ऐकु नको एक चान्स दे त्यांना, मी सांगते ते ऐक, जा घरी तुझ्या, बाबा तुम्ही सांगा ना आरतीला",...सुषमा.

सतिश राव आरती जवळ येत होते,

"बाबा ताई तुम्ही मला काही सांगू नका, तिकडे मला काय सहन कराव लागत माझ मलाच माहिती, मी ऐकणार नाही ",.. आरती

अक्षय बाजूला जाऊन बसला, मनीषा त्याला समजावत होती, त्या दोघांना बोलतांना बघून परत आरती चिडली होती,.." बघितल यांची बहीण भडकवते यांना नेहमी, घरी हे सगळे एका बाजूला असतात, मला एकट पडतात नेहमी, माझ्याशी नीट वागत नाहीत ते लोक ",
.....

" काय करू मी मनीषा? आता हीच्या आई-बाबांना जास्त सांगता येत नाही, आरतीला खरच काही त्रास आहे का आपल्याकडे , आई बाबा किती साधे आहेत आपले , एक दिवस तरी या आरतीने त्यांच काही काम केल का, उलट आई आणि तू किती करत होती तीच, नीट वागायला बोलायला नाही पाहिजे होत या आरती सोबत, सक्तीने घरी न्यायला हव होत मी हिला, तेव्हा समजल असत",.... अक्षय

थोड्यावेळाने त्यांचा नंबर आला, सगळे आत बसले होते, आधी आरतीच्या वकीलांनी सुरुवात केली, दोन चार पॉईंट्स पुढे मांडले, जे कधी झाल नव्हत ते ही वकील सांगत होते, अक्षय मनीषा अवाक होऊन ऐकत होते,

" हे कधी झाल घरी मनीषा?, काहीही बोलता आहेत हे लोक ",.. अक्षय

"जावू दे ना दादा, त्रास नको करून घेवू, कोर्टात अस होत, सावकाश बोल नंतर वहिनीशी, अस करु नको म्हणा ",.. मनीषा

अक्षयचा नंबर आला त्याने सांगितल मी आरती सोबत रहायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही,

पुढची तारीख मिळाली, सगळे बाहेर आले, आजही व्यवस्थित काम झालं नाही,

" आरती मला बोलायचं आहे तुझ्याशी",.. अक्षय

" पण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही अक्षय",.. आरती

"मी घरी येऊ का जरा वेळ मला आरवला भेटायचं आहे",.. अक्षय

"नाही त्याला तुम्हाला भेटता येणार नाही, तो वाढतो आहे तुमच्याशिवाय, उगाच तुमची सवय नको",.. आरती

"आरती तो माझा ही मुलगा आहे, काय अस? का ताटातूट करते आमची",.. अक्षय

" हो का मग घ्या घर सेपरेट, येवून घेवून जा मला आणि आरवला",.. आरती

अक्षय सतीश रावां जवळ आला,.. "बाबा खरच मनापासून सांगतो तुम्ही एकदा बोलून बघा ना आरतीशी, मला राहायचं आहे तिच्यासोबत, असे एका रात्रीत सगळ्या गोष्टी होतात का, जरा शांततेने घ्यायला पाहिजे ना आरतीने",

" ठीक आहे बघतो मी पण अंतिम निर्णय तिचा असेल",.. सतीश राव.

"सुषमा ताई प्लीज मदत करा, समजून सांगा आरतीला, मी येवू का घरी थोडा वेळ ",.. अक्षय.

" हो चला घरी ",.. सुषमा.

सगळे आरतीच्या माहेरी आले, आरती आत निघून गेली, तिचे बाबा आरवला घेवून आले, छान मोठा झाला होता तो, अक्षय मनीषा कडे रहात नव्हता आरव, त्यांना बघून रडायला लागला तो, सवय नाही त्याला वडलांची, चहा झाला, थोड्या वेळ थांबून अक्षय मनीषा निघाले, आरती बाहेर आली नाही,

आरतीने खिडकीतुन अक्षयला जातांना बघीतल, बर्‍याच वेळ रूम मध्ये एकटी बसलेली होती, काय करू मी अक्षय माझ ऐकतील, रडत होती ती, तिला तिची चूक समजत नव्हती, की समजुन मुद्दामुन माघार घेत नव्हती ती.

अक्षय मनीषा घरी आले,

मालू ताई विचारत होत्या,.. "काय झालं तिकडे?",

अक्षय आत निघून गेला, मनीषा त्यांच्याजवळ बसली होती,.. "काय होणार आहे आई, नेहमीप्रमाणे वहिनीने काही ऐकून घेतलं नाही, दादा नाराज आहे, आरवला भेटायला गेलो होतो आम्ही, खूप गोड दिसतो तो, पण त्याने आम्हाला ओळखल नाही रडायला लागला, हा बघ फोटो" ,... मनीषा मोबाईल मधले फोटो मालू ताईंना दाखवत होती, फोटो बघुन त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, माझा नातू पण एकदाही नीट बघितला नाही त्याला, काय म्हणण आहे तीच? का अशी करते ती आरती? ,

" मालु अग कशाला रडतेस तू? काय उपयोग आहे का? ",.. सुरेश राव समजूत काढत होते.

"अहो जरा बघा ना अक्षय कडे, तो आत निघुन गेला",.. मालु ताई.

"हो जातो आत, पण तू आधी तब्येत सांभाळ",.. सुरेश राव.

सुरेख राव आत आले, अक्षय नुसता बसला होता,.. "अक्षय आरती काय म्हटली? , तिच्या बाबांशी बोलला का तू? ",

" हो बाबा झाल बोलण, ते ऐकत नाहीत, वेगळ रहायच तिला ते ही स्वतःच्या घरात",.. अक्षय

मालुताई आत आल्या,.." जर तुला खरच तिच्या सोबत रहायचं असेल तर आमची काही हरकत नाही, तुम्ही दोघ खुश तर आम्ही खुश " ,

हो.. सुरेश राव म्हटले.. "तुला घ्यायच का घर? डाऊन पेमेंटचे पैसे घेवुन जा ",

" नाही आई बाबा, ठीक आहे आता जे होईल ते होईल, तुम्ही लोक खरच त्रास देत असते आरतीला तर मी केला असता विचार, पण काय हे अस? उगीच हट्टी पणा, आज ही एक गोष्ट आहे उद्या दुसरी मागेल ती, त्या वरुन रुसून माहेरी जावून बसेल, काय अस उगीच फालतू पणा, याला बढावा नको द्यायला ",.. अक्षय.

" अरे पण याने तुमचा संसार मोडकळीस आला आहे",.. मालुताई.

" हो ना आई जावू दे आरती ला काही फरक पडत नाही ती आजही भांडत होती माझ्याशी खूप ",.. अक्षय.

" आरतीला वाटतो आमचा त्रास, त्या मुळे तिने अस ठरवल असेल, तू निर्णय घेवू शकतो आम्हाला काही हरकत नाही, तुम्ही दोघ सोबत रहाण महत्वाच आहे ",.. मालुताई.

सुरेश राव मालुताई बाहेर येवुन बसले, खुप चिंता करत होते ते.
......


🎭 Series Post

View all