मला तुझ्यासोबत रहायच आहे.
©️®️शिल्पा सुतार
........
........
सकाळी लवकर उठून सुरेशराव दूध घेवून आले, मालूताई अजूनही लोळुन होत्या, काय चाललय यांच आता हल्ली काय माहिती? सांगितल नका धावपळ करू तरी ऐकणार थोडी आहेत हे ,.. "अहो कश्याला दमतात तुम्ही रोज? तो दुकानदार बोलला ना टाकतो दूध पिशवी घरी",
"असू दे त्या निम्मित्ताने फिरून येतो मी सकाळी, तू ही येत जा सोबत , छान फ्रेश वाटत",.. सुरेशराव.
"नको दिवसभर काम पुरत मला" ,. मालूताई.
"काम कमी कर जरा आता, ज्याला त्याला त्याच त्याच काम करू देत जा",.. सुरेशराव.
" आपले मुल आहेत, अजून कोण आहे का बाहेरच आणि आता हल्ली मुल मला जास्त जपतात ",.. मालूताई
" हो ते झालच ग",.. सुरेशराव
" कडक वागण जमल असत तर ही वेळ आली नसती आपल्यावर, जरा सासू असल्यासारखं वागायला हव होत मी, ठीक आहे, आता गेली वेळ हातची, काय होत पुढे काय माहिती, काय नशिबात लिहिल पोराच्या काय माहिती? ",.. मालूताई.
रोजच टेंशन होत हे, त्यांना अक्षयची खूप काळजी वाटत होती, मालु ताई उठल्या,.." चहा ठेवू का? , खूप काम आहेत, चहा घेवुन करते सुरुवात",
" असु दे मालू कर जरा वेळ आराम, तू बस मी करतो चहा, तेवढाच तुला आराम होईल ",.. सुरेशराव.
अतिशय भोळसट मालूताई पूर्वी पासून बुजर्या स्वभावाच्या होत्या, जिथे जाणार तिथे लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे, कधीच आरामात रहायला जमल नव्हत त्यांना, खूप काम अंगावर घेवून घ्यायच्या त्या, बाकीचे कसे असे बिनधास्त रहातात, आरामात बसतात याच आश्चर्य वाटायच त्यांना,
दोन मुले अक्षय, मनीषा, अतिशय हुशार आणि चांगले वागायला , सुखाने काटकसरीने संसार केला त्यांनी, अक्षयच शिक्षण छान झाल होत, इंजिनिअर असलेला अक्षय मोठ्या कंपनीत होता, तीन वर्षापुर्वी जॉईन झाला होता, कसलीही कमी नव्हती घरात, पूर्वी पासून सुरेश राव व्यवस्थित लक्ष देवून होते.
मनीषा अक्षय पेक्षा आठ वर्षानी लहान त्यामुळे अक्षयच आधी लग्न झाल, आरती घरी आली, सूनबाई आल्यावर खूप काही गोष्टी मालू ताईंच्या मनात होत्या, हे करू ते करू अगदी मैत्रिणी प्रमाणे राहू, पण कसल काय, पहिल्या बाळंतपणाला जो आरती माहेरी गेली ती आली नव्हती परत, अक्षयकडे बघून त्यांना खूप वाईट वाटायच.
सुरुवातीला जेव्हा आरती वापस येत नव्हती तेव्हा काय झाल किती तरी वेळा मालुताई अक्षयला विचारायच्या,
तो ही विशेष सांगत नव्हता, गप्प गप्प होता तो, छोट्याशा नातुत जीव अडकला होता त्यांचा, ..
"अक्षय अरे आमच काही चुकल का? काय प्रॉब्लेम आहे? , काय अस? , आम्हाला सांगण्या सारख आहे का? , आम्ही माफी मागतो वाटल तर आरतीची, पण तू आणि आरती नीट रहा, अस करु नका रे, संसारात एकमेकांना सांभाळून घ्यायचा असत एकाने राग राग केला की दुसर्याने नमतं घ्यायच असत" ,.. मालुताई.
"आई तेच सुरू आहे मी कायम नमत घेतो आहे, आई आपला काही प्रॉब्लेम नाही, आरती आहे हट्टी आणि हेकेखोर आहे माहिती आहे ना तुला , तू कशी एवढी चांगली",.. अक्षय.
" नको रे ताणु, जावु दे सांभाळून घेवु आपण तिला, घेवून ये तिला ",.. मालुताई
" मी ताणतो का आई? , किती वेळा घ्यायला गेलो मी तिला, यायच नाही तिला इकडे, काय अस करते ती काय माहिती",... अक्षय
बर्याच वेळा हाच संवाद व्हायचा त्यांच्यात, सुरेशराव मालुताई अतिशय प्रेमळ जोडप, त्या दोघांची भांडण असे बघितल नाही कधी मुलांनी, त्यामुळे अक्षयच्या बायकोच आरतीच हे वागण अगदी सहन होत नव्हत कोणाला,
चला अक्षयला उठवावा लागेल, काय होत आज काय माहिती, देवा तुलाच काळजी आता,
"अक्षय आटोप तयार हो उठ लवकर",.. मालुताई आवाज देत होत्या,
मुळात उठायला अक्षय झोपलाच कुठे होता, रात्रभर तळमळ तळमळ सुरू होती त्याची, काय करते आहे ही आरती? आज तरी बोलेल का ती माझ्याशी? कुठल्या शब्दात मी तिची समजूत काढू, अगदीच असह्य झाल आहे सगळं, माझा नाही निदान आरवचा तरी विचार करावा तिने, एवढासा तो अजून एका वर्षाचाही नाही, त्याला आई वडलांच सुख मिळायला हव, समजून का घेत नाही ती?, आपला हट्ट एवढा मोठा आहे का? ,
कोणाचं ऐकते आहे ही, कोण कान भरत तिचे, की आरती महामूर्ख आहे, एवढा छान संसार सोडुन अस वागते, तिचे स्वतःचेच विचार आहेत हे , कारण तिच्या घरचे, तिचे वडील चांगले समजूतदार आहे, तिची आई कान भरवत असेल का तिचे ?, का करतील त्या अस? , त्या जरी लाख सांगतील तरी आरतीला अक्कल नाही का, पूर्वी पण बोलायच्या तिच्या आई इकडे येवून आम्हाला, आरती अति आहारी गेली आहे त्यांच्या, तिला समजत नाही का किती ऐकायच दुसर्याच, तिच्या आई बाबांना वाटत नाही की त्यांची मुलगी सुखी रहावी, काही समजायला मार्ग नाही, आरती हट्टी आहे, तिला वेगळ रहायच आहे,
आई बाबा किती काळजीत आहेत, काय काय करणार मी? एकीकडे आई-बाबा, एकीकडे आरती मला सगळेच हवे आहेत, का हे असे दुःख माझ्या वाट्याला आलं, तो उठून तयार झाला. मालुताईंनी त्याला पोहे दिले, कसे तरी थोडे खाल्ले त्याने, बाबा पेपर वाचत होते, मालुताई अक्षय कडे काळजीने बघत होत्या.
" मनीषा तू येते आहेस ना माझ्यासोबत तिकडे कोर्टात ",.. अक्षय.
"हो दादा",. मनीषा.
आज अक्षय आणि आरती यांची कोर्टात डेट होती, घटस्फोटाची केस सुरू होती, शहाण्याने कोर्टाची पहिली चढू नये असं सांगतात तेच बरोबर आहे, यातून दोघांना त्रास होत होता, पैसे खूप जातात, बदनामी होते, मूर्खपणा सुरू आहे नुसता, पण हे आरतीला समजत नाही का कसला हट्ट आहे हा तिचा, मला नको घटस्फोट.
लग्नाला अवघे तीन वर्ष झाले होते, डिलिव्हरी साठी जी आरती माहेरी गेली ती अजून आलीच नव्हती परत , आता वर्ष झालं, आरवही आता नऊ महिन्याचा झाला, अक्षयचा जीव तुटायचा आरव साठी, पण आरती त्याला भेटू द्यायची नाही, मुद्दाम त्याला शस्त्र म्हणून वापरायची ती ,
तिला वेगळं राहायचं होतं, स्वतःचं घर हवं होतं, अजूनही बऱ्याच मागण्या होत्या तिच्या, तरी बरं अक्षय हुंडा घेण्याच्या विरोधात होता, लग्नात त्यांनी आरतीसाठी दागिने केलं होतं, आता परत एवढा सगळा खर्च शक्य नव्हता आणि आता घराच्या किमती केवढ्या गगनाला भिडल्या होत्या , लगेच घर कस घेणार.
एवढ्यात तर लागलो मी नोकरीला, आरतीपेक्षा दोन वर्षांनी तर मोठा होता अक्षय, लगेच एवढा पैसा कुठून येणार , आरती स्वतः काही करत नव्हती आणि अक्षय कडून सगळ्या अपेक्षा होत्या तिच्या , हे ठीक आहे का? आणि हे वेगळं राहायचं तर मला अजिबातच पटत नव्हतं, आई बाबा मनीषा अगदी साधे होते, ते कधी काही बोलत नव्हते आणि जरी बोलले तरी हक्काने बोलतात ना, पण मुळात अस काही झाल नव्हत इकडे, सगळे अगदी आरतीला जपत होते, तिला सुख टोचल.
आरतीच्या बहिणीच्या सुषमाच्या लग्नाला दहा वर्षे झाले होते, त्यानंतर त्यांनी स्वतःचं घर घेतलं, सेपरेट रहायला गेली ती, तिच्याकडे बघून आरतीने सुद्धा मला घर हवा असा हट्ट धरला होता.
जेव्हा आरतीने पहिल्यांदा घटस्फोटाच्या अर्ज केला तेव्हा अक्षय प्रचंड चिडला होता, तो लगेच आरतीला भेटायला गेला, खूप भांडण झालं दोघांचं,.. "तू एवढ्या टोकाला जाशील मला वाटलं नव्हतं आरती, मूर्खासारखा विचार करू नकोस" .
आरती तिचा हट्ट सोडत नव्हती,.. "पेपरवर सही करा नाही तर मी पोलीस केस करेल, तुम्हाला आई बाबांना मनीषाला पोलिसात देईन, जिवाच काही बर वाईट करेल" .
"अगं पण पोलीस केस करण्यासारखं काही झालं नाही, मी माझ्या घरच्यांनी काही त्रास दिला का तुला? फक्त तुझ्या काही मागण्या मान्य होत नाही म्हणून तू घटस्फोट देते आहेस हे कितपत योग्य आहे? ",.. अक्षय
आई-बाबा आणि मनीषाचा काहीच माहिती नव्हत काय सुरु आहे ते , मनीषा घरचं सगळं काम करून घेत होती, मग ती कॉलेजला जात होती, आई-बाबा शांतच होते, उगाच परत या सगळ्या घरच्यांच्या मागे पोलीस केस नको लागायला, एक तर बरेच कायदे स्त्रियांच्या बाजुने आहेत, आई बाबा साधे आहेत म्हणून अक्षयने पेपरवर सह्या केल्या, होऊन जाऊदे हिच्या मनासारखं,
घरी आल्यानंतर दोन दिवस अक्षय जेवला नव्हता, रडून रडून थकला होता, आरतीला काहीच वाटत नाही का माझ्या बद्दल?, माझ्यासोबत राहण्यापेक्षा इतर भौतिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत का तिला?, घर प्रॉपर्टी होईल ना, अजून वय झाल का माझ? आणि आई बाबांचा आहे एवढा मोठा बंगला, तिचं तिलाच माहिती त्याने मनाची समजूत केली, आता संपल सगळं, काढू पुढे तिची समजूत असं वाटल होत त्याला, पण जावू दे तिला ऐकायच नाही तर काय करणार.
एका मुलाची आई होती आता आरती, स्वतःचा विचार सोडून आता मुलाचा विचार करायला पाहिजे होता तिने, आरवला आई-वडिलांचे दोघांच प्रेम मिळायला पाहिजे, त्यासोबत आजी आजोबा सुद्धा आहेत, त्यांचा काय दोष आहे यात आणि काही धीर धरता येतो की नाही? होतील आपल्याही वस्तू, आपलंही घर होईल हळूहळू मिळतं सगळं संसारात.
बहुतेक हे मला माझ्या बाजूने वाटत असेल, आरतीचे तिचे काही कारण असतील, ते पण विचारून झाल तिला, अगं सांग काय आहे तुझ्या मनात, पण ती बोलायला तयार नाही, फक्त मला वेगळं राहायचं आहे, घर घ्या नाही तर घटस्फोट द्या एवढंच सुरू आहे तिचं, आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट साठी सुद्धा तिला भेटायला गेलो ती ऐकायला तयार नाही.
आज तरी ती आरवला घेऊन येईल का? नाहीच घेऊन येणार, मुद्दाम माझी आणि आरवची भेट होऊ नये हीच इच्छा आहे तिची वाटतं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा