थोडं तिचंही कौतुक करा... भाग 2

Katha tichya jivnachi

थोडं तिचंही कौतुक करा...भाग 2


मीनल किचन मध्ये गेली, स्वयंपाकाला काय करायचं हा विचार करत असतानाच तिथे तिची जाऊ आली.


“मीनल आज अळूवडी करायची आहे ह, जमेल ना तुला?”
मीनलने कधीच अळूवडी केलेली नव्हती, ती थोड्या दबक्या आवाजात बोलली,
“ताई मी कधीच केलेली नाहीये, तुम्ही शिकवाल का मला?”

 हो शिकवेल ना, नक्की शिकवेल. अग माझं कामच आहे ते. तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा मला तुला शिकवावं लागेल, हो ना? बरं तू बाकीचा स्वयंपाक कर मी तुला नंतर अळुवळी सांगते.”
मीनलने सगळा स्वयंपाक केला, त्यानंतर तिच्या जाऊ बाईने तिला अळूवडी शिकवली. मीनलने तेही छान मन लावून केलं. जेवणाच्या वेळेवर मीनलने सगळ्यांना हाक दिली आणि सगळ्यांना जेवण वाढलं. पहिला घास तोंडात जात नाही तर सासूबाई किंचाळल्या.
“अरे कोणी केला आता स्वयंपाक?”
मीनल दबक्या आवाजात बोलली

आई मी केलंय.”
“अग काय हा स्वयंपाक केलास? असा कोणी स्वयंपाक करतात का? भाजीला अजिबात चव नाही, पोळ्याही कडक आहेत आणि अळुवळी पण तूच केलीस का?”

“हो ताईनी शिकवल्या मला.”

“बघू, काय ग तुझ्या हाताला ना काही चवच नाही आहे मीनल.” असं म्हणून तिची सासूबाई जेवली खरी पण तोंडाचा पट्टा तो सुरूच्या सुरूच होता. 

समीरला माहित होतं आता बोलून काही उपयोग नाही म्हणून तोही गप्प होता.

दिवस जात होते, मीनल आणि समीरने ऑफिस जॉईन केलं. दोघे ऑफिसला जायला लागले.

मीनल सकाळी उठून घरचं सगळं करून ऑफिसला जायची. पुन्हा संध्याकाळी येऊन सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे कामे तिच्या मागे असायचीच. कधी कधी ती लवकर जायची, कधी तिला यायला उशीर व्हायचा.

एकदा मीनल ऑफिस मधून आली, तिला खूप थकल्यासारखं झालं होतं. आल्यानंतर ती फ्रेश झाली, पाचचं मिनिटं लेटते आणि मग जाऊन चहा करते या विचाराने ती पलंगावर लेटली आणि चक्क तिचा डोळा लागला, तिला झोप लागली.

काही वेळाने हॉल मधून जोरात आवाज यायला लागला.

“काय ग बाई आमची नवीन सून दिवा लावणीच्या वेळेस रूम मध्ये जाऊन झोपते, संध्याकाळी चहा नाश्ता द्यायचा असतो हे तिला माहित असून सुद्धा रूमच्या बाहेर निघाली नाही. बघ ना काय जमाना आला. ऑफिसमध्ये जाणाऱ्या बाया घरचे काम करतच नाहीत का? पण ह्या मॅडम बघा मस्त ऑफिस मधून येऊन आराम करत आहेत आणि आम्ही... आम्ही घरी राहून फक्त राबायचं आणि यांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करून येऊन घरी छान झोपायचं. काय जमाना आलाय.” आवाज ऐकून मीनल तशीचं उठून बाहेर गेली.

“माफ करा आई मला बरं वाटत नव्हतं ना म्हणून मी थोडी पाच मिनिट..” ती बोलता बोलता थांबली.

“पाच मिनिटं.. अर्धा तास झाला तु रूममध्ये होतीस.”

“माफ करा यानंतर असं नाही होणार.”

बघता बघता समीर आणि मीनलच्या लग्नाला सहा महिने उलटून गेले, आता तिच्या सासूबाईला घरात पाळणा हालायला हवा होता. पण समीर आणि मीनल त्यासाठी तयार नव्हते. 


क्रमश:

🎭 Series Post

View all