Login

तहान 3 अंतिम

Marathi Story
एके दिवशी सुमनताई नुकत्याच गावातल्या दुकानात गेलेल्या. दुकान बंद होतं आणि त्या लगबगीने घरी आल्या. घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मोहनचा एक मित्र घरी आलेला.

मोहनच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. सुमनताईनी हॉलमध्ये पाहिलं, हॉलमध्ये कुणीही नव्हतं.. त्यांनी आतली खोली बघितली आणि त्यांना धक्काच बसला..सुनबाई आणि मोहनचा मित्र आतल्या खोलीत बंद होते.

सुमनताईंना समजेना काय करावं, जे काही पाहिलं त्यावर विश्वास ठेवणं त्यांना कठीण जात होतं.

त्या बाहेर पडल्या आणि दोन तीन चक्कर मारून पुन्हा घरात आल्या, येताना पावलांचा जोरात आवाज करत होत्या. ते बघून सूनबाईने पटकन दार उघडलं..केस नीट केले,

मोहनचा मित्र हॉलमध्ये बसला होता. सुनबाई त्याला पाणी द्यायचं निमित्त करत होती आणि सुमनताइना म्हणाली,

"हे मोहनचे मित्र...आत्ताच आले.."

बोलताना सुनेच्या चेहऱ्यावरची भीती, मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव सूनमनताईंनी बरोबर ओळखले होते. जणू काही घडलंच नाही असं सुमनताई वागल्या तेव्हा सुनेच्या जीवात जीव आला.

सुमनताईने विचार केला, सुनेने तरी काय करावं अश्यावेळी? कसं रोखावं तिने तिच्या भावनांना? त्याला वाट करून दिली नाही तर एक दिवस भावनांचा आगडोंब उसळेल.

त्यानंतर बरेच दिवस गेले, मोहनचा मित्र पुन्हा एकदा घरी आला..सुमनताईंनी ते पाहिलं आणि सुनेला म्हणाले,

"मी जरा देवळात जाऊन येते..मला तास दीड तास तरी लागेल परत यायला.."

सुनबाई खुश दिसू लागली.

हे वरचेवर होऊ लागलं, मोहनचा मित्र आला की सुमनताई हमखास देवळात जात. त्या दोघांना एकांत मिळावा याची पुरेपूर काळजी घेत.

एके दिवशी मोहनचा मित्र आलेला असताना सुमनताई देवळात जायला निघाल्या आणि वाटेतच मुसळधार पाऊस सुरू झाला, सुमनताई वाटेतुनच परतल्या, घरी येताच हॉलमध्ये बसून राहिल्या. बऱ्याच वेळाने मोहनचा मित्र आणि सुनबाई कपडे सावरत खोलीतून बाहेर आले. सासूबाईंना समोर बघून दोघेही प्रचंड घाबरले, सूनबाईला रडू आलं..खूप अपराधी वाटू लागलं.

मोहनचा मित्र चेहरा वर करून न बघता तसाच बाहेर निघून गेला. सुनबाई मान खाली घालुन सासुबाईंसमोर येऊन उभी राहिली..

आता आपल्याला काय बोल बसतील याची तिने धास्ती घेतली, पण काही वेळानेच तिला जाणवलं की कुणीतरी डोक्यावरून हात फिरवत आहे..तिने वर पाहिलं.. सुमनताई हळुवारपणे बोलत होत्या..

"आयुष्य एकदाच मिळतं... जगुन घे..."