विचार बदला जीवनाची दिशाही बदलेल

Useful Story

       एक खूप श्रीमंत माणूस होता.. पण त्याचाकडे असलेल्या संपत्ती एवढे त्याचे मन मोठे नव्हते.. एखाद्याला पैसे दिले तर स्वतः चे मोठेपण तो १० लोकांना जाऊन सांगायचा .. एके दिवशी शहरात थोर विचारवंत आले असल्याचे त्याला कळले.. तो त्वरीत त्याना भेटायला गेला.. त्या श्रीमंत माणसाने आदरातिथ्य केल्यावर त्या थोर विचारवंताने त्याला भेटायला येण्याचे कारण विचारले.. मात्र आपले येण्याचे कारण न सांगता तो स्वतः च्या संपत्तीचे आणि दानशुरतेचे गोडवे गाऊ लागला.. त्याच्या दानशूरपणाच्या गोष्टी सांगून झाल्यावर त्या श्रीमंत माणसाने पैशाचे पाकीट काढून थोर विचारवंताला देऊ केले... आणि म्हणाला तुम्हाला पैशाची गरज आहे असे मला वाटले म्हणून मी हे आणले आहे.. हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात अहंकार दिसत होता.. 


       त्या थोर विचारवंत पैशाचे पाकीट बाजूला करत म्हणाले.. मला या पैशांची नव्हे तर तुझी गरज आहे.. हे ऐकून तो श्रीमंत माणूस दुखावला गेला.. मी दिलेले पैसे यांनी नाकारण्याचा हिंमत कशी केली..?? आता पर्यत मी दिलेले पैसे कोणीही नाकारण्याची धाडस केले नाही असे तो मनातल्या मनात म्हणाला... तेवढ्यात थोर विचारवंत म्हणाले.. तुला माझ्या वागण्याचे वाइट वाटले असेल ना तो श्रीमंत माणूस म्हणाला.. 

वाईट तर वाटणारचं, मी देऊ केलेली मदत तुम्ही नाकारलीत जणू काही मी हे पैसे नाही तर माती दिली आहे.. हे ऐकून ते विचारवंत म्हणाले, हे पहा महाशय, दात्याने केवळ पैसे दिले आणि स्वतः ला अर्पण केले नाही तर त्याचे मोल मातीसमान असते... कोणत्याही असलेल्या गोष्टीचे समान भाग करुन अर्धी गोष्ट दुसऱ्याला देणे हे पैसे जे तु मला दिलेस ते काही सगळेच तुझे नाहीत हे पैसे तु दान करतोस यात अभिमान काय बाळगायचा..?? हे तर तु केलेल्या चोरीचे प्रायश्चित्त केयासारखे  आहे.. हे ऐकून त्या धनिकाचा अहंकार तुटला आणि त्याचे विचार बदलले...


???