कथा - ठिगळ

परागच्या बाबांनी राजूच्या फाटत चाललेल्या आयुष्याला "ठिगळ" लावलं होतं जे रेडिमेड आयुष्यापेक्ष

ठिगळ    

        रस्त्याची दुतर्फा लावलेली झाडे स्वागताला उभी होती, गाडीने वेग घेतला.

 बाबा,  आज की मला ऑफिसमधून येताना  स्टोबेरी आईसक्रीम आणा हा .? 
परागने बाबाकड़े गेममधून डोकंवर काढून विचारणा केली 

 हो नक्की आणेल ...!

प्रॉमिस...?
हो प्रॉमिस रे..!

बाबांचं प्रॉमिस  घेऊन परागने पुन्हा गेममधे डोके खुपसले. 

      परागची शाळा तशी फार लांब नव्हतीच  तीन किलोमीटरचा रस्ता असा बोलता बोलता संपला होता .

हे राजूssss   
परागने गाडीतूनच आवाज दिला.

 राजूची नजर त्या आलीशान गाडीतून हात करणाऱ्या आपल्या त्या दोस्ताकड़े गेली . राजूचा हात ही आपोआप ढगाच्या दिशेने गेला .  गाड़ी गेटच्या आत निघाली होती, बाबा गाड़ी थांबवा ....?
सुरर्रर्रर्रर...
गाडीचे ब्रेक जाग्यावर लावण्यात आले.

बाबा , तो राजू , माझा बेस्टफ्रेंड ..!

      राजू  ,  अंगाने तसा सडपातळच,  सावळा , अंगावर तो शाळेचा दोन गुंड्या असलेला शर्ट आणि चड्डीची चैन उसवलेला आणि चड्डीलाच करदुऱ्याचा बेल्ट बनवणारा राजू त्यांच्या नजरेला नजर देत उभा होता. अत्यंत चाणक्ष , बुद्धिमत्ता उतू जाते की काय असा विचारात पाडणारा राजू गरीबीच्या जाळ्यात अडकला होता .

        दोघे ही गाडीतून उतरले तो पर्यन्त राजू गाड़ीपर्यन्त पोहचला होता .

राजू ,  हे माझे बाबा..

बाबा हा राजू... 
पराग आनंदाने दोघांच्या ओळखी करुन देत होता.

नमस्कार करतो काका ..! 

अरे राहु दे..!

तुझे बाबा नाही आले? परागच्या बाबांनी राजूला प्रश्न केला.

मला आई बाबा नाहीत मी माझ्या दादा सोबत राहतो (बाबा विचारात पडले...पण लगेच  स्वतःला सावरून)

 अरे तुझा दादा नाही आला का मग ? 

 तो कामावर गेला पण कशासाठी काका ? राजू ने प्रतिप्रश्न केला

अरे Parents Meeting आहे ना त्यासाठी ....!


 पराग मधेच बोलला ,  बाबा त्याने शाळा सोडली.  फी नाही भरू शकत मी तुम्हाला म्हणालो होतो ना मागच्या वर्षी पहिला नंबर आलेला हाच तर तो राजू.!   
विचार एकदम गिरक्या घेत होते काहीतरी निर्णय घेतला होता बाबांनी . 

राजू,  तू काय करतो आता ? बाबा राजूला विचारु लागले

काका,  ते समोर दिसतय ना ?  ते गोळ्या बिस्किटाच "आपलचं" दुकान . 

 आपलेपणाचा तो गुण काकांना फार आवडला . 

चल पराग मीटिंग सुरु होईल आता

ओके राजू  , येतो आम्ही  .
भेटु पुन्हा...!

बाय राजू. परागही राजूच्या दंडावर चापट मारत बाबा सोबत चालायला लागला. राजू मात्र बापलेकाची  पाठमोरी आकृती  दिसेनासी होईपर्यंत पाहत राहिला . 
          
  दोन तास उलटून गेल्यानंतर  दोघे ही बाहेर आली आज परागने सुट्टी घेतली होती. 

बापलेकाच्या चेहऱ्यावर हास्याने संचार केला होता 

     काय घडलं असेल आत ?

" आत एक सुंदर आयुष्य उमलण्यासाठी पराग आणि बाबा त्या सुकलेल्या राजूच्या आयुष्याला पाणी घालून आले होते." 

      " चल राजू आज कुठे बाहेर फिरायला जाऊया ....? " 
पराग तर आनंदाने नाचत होता .

राजू भांबावला. 
पण कुठे? 
का? 
कशासाठी? 
आणि दुकान?
विचारांनी  पार हैदोस घातला होता.

अरे, बाबांनी तुझं अडमिशन केलयं
 उद्यापासून तू शाळेत यायचस मग मजाच .!

 "परागच्या चेहऱ्यावरचा आनंद राजूच्या गोंधळात पडलेल्या मनाच्या पूर्ण विरुद्ध होता." 

राजूच्या चेहऱ्यावरच्या हास्यापेक्षा त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू भावनिकतेची पावती देत होते .

 राजूने शटर बंद करत आपल्या स्लीपरला पायात अडकवलं आणि तिघांनी गाडीकड़े धुम ठोकली...!

        आज परागच्या बाबांनी राजूच्या फाटत चाललेल्या आयुष्याला "ठिगळ" लावलं होतं जे रेडिमेड आयुष्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होतं...!

 सुशांत भालेराव ©