Feb 23, 2024
सामाजिक

दोष कुणाचा अंतीम भाग

Read Later
दोष कुणाचा अंतीम भाग


शिरप्या नं जबरदस्तीने रमाला पुरतं लुटलं ! तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर बळजबरी केली !! शिरप्याला वाटलं असं केल्याने आता रमा आयुष्यभरासाठी त्याचीच झाली.........
पण रमा ? या सगळ्या घाणेरड्या प्रकाराने रमा पूर्ती हादरून गेली होती ! तिला शारीरिक इजा तर झालीच होती !! पण जबर मानसिक धक्का ही बसला होता !!!
तालुक्याच्या गावाहून परत आल्यावर दुसर्‍या दिवशी राम जेव्हा रामाच्या घरी गेला तेव्हा रमा पुरती चुरगळली होती !! तीची अवस्था बघून तोही एक क्षणभर हादरला !!! रमा इतकी घाबरली होती की, राम ला बघून ती बेशुद्धच पडली !!! राम लगेच तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात घेऊन गेला......

दवाखान्यात नेल्यानंतर तपासणीअंती \"रमावर बलात्कार झाला आहे\" ! हे डॉक्टरांनी रामला सांगितलं..... आठ दिवस आई. सी. यु. त आणि नंतर महिनाभर रमा वर उपचार सुरु होते....... रमाचे प्राण वाचले , रामची प्रेमळ आणि काळजीयुक्त साथ.... सोबतच मानसोपचार तज्ञांचे समुपदेशन त्यामूळे रमा जरा सावरली पण तरीही रमाला मानसिक धक्क्यातून बाहेर निघण्यासाठी जवळपास दोन महिने लागले.......

रमा आता बऱ्यापैकी सावरली होती पण तिची शरीर प्रकृती अजूनही नाजूक असल्याने गर्भपात करणे शक्यच नव्हते !!

झाला प्रकार लक्षात घेऊन सखा पाटलांनी आपली पगडी रमाच्या पायावर ठेवली आणि तिला श्रीपाद म्हणजेच शिरप्यासह विवाहाची गळ घातली. रमाचाही नाईलाज होता......... यथावकाश श्रीपाद आणि रमा चं लग्न झालं , पण लग्नानंतर रमाने श्रीपादला कधीही स्वतःला स्पर्श करू दिला नाही !! पण एवढ्यावरच निभावेल ते रमाचं सुदैव कुठलं......?लग्नाच्या केवळ दोन महिन्यानंतर दारूच्या नशेत तर्र होऊन तालुक्याहून परतत असताना ,श्रीपाद चा अपघात होतो आणि त्यातच तो मरण पावला.

झाल्या प्रकाराने रमा खूप सैरभैर झाली.... "केवळ नियती शरणता हेच आपलं प्रारब्ध आहे का?" असा तिला प्रश्‍न पडला ! पण रामची प्रेमळ पण खंबीर साथ,ग्रामस्थ , सखा पाटील व रमाच्या वडीलांनी त्या दोघांच्या लग्नाला दिलेला दुजोरा , यामुळे रमा आणि राम चा विवाह संपन्न झाला.......

रमा च्या बाळाला रामने स्वतःचं नाव दिले हे वेगळं सांगायलाच नको.


©® राखी भावसार भांडेकर.
वाचकहो तुमच्या प्रतिक्रिया आणि मतांमुळे लेखकांना लिहिण्याची स्फूर्ती मिळत असते त्यामुळे आपली मतं आणि अभिप्राय नक्की नोंदवा......

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//