दि टर्निंग पॉईंट भाग - ८

In this part, malhar celebrated her birthday surprisingly and also it is told that how ambar celebrated their welcome..

दि टर्निंग पॉईंट भाग -

आता पुढे ....

बळजबरीने तोही उठला. मग ते आवरून लोणावळ्याला प्रेक्षणीय स्थळे पाहायला गेले. नुकताच मस्त पाऊस पडून गेलेला होता.... सगळीकडे छान हिरवंगार, आल्हाददायक वातावरण होतं....  हवेत हवाहवासा गारवा होता... खूप रोमँटिक वातावरण होतं.... वातावरणाचा आस्वाद घेत ते भुशी डॅमला गेले. डॅमचे ते सौंदर्य पाहून संजीवनी हरखून गेली. थोडा वेळ तिथे थांबून मग ते इमॅजिका पार्कला गेले. तेथे गेल्यावर तिथल्या बऱ्याच राइड्स केल्यात. त्यांनी खूप एन्जॉय केलं. त्यांना असं वाटत होतं की आपले कॉलेजचे ते दिवस परत आलेत. अगदी बॅचलरप्रमाणे त्यांनी मजा केली. या सगळ्यामुळे ते बरेच जवळ आले होते. 

सगळं फिरत फिरत ते आज थकून गेले होते. रात्री बाहेरच जेवण करून मग हॉटेलवर जाऊ, असं त्यांनी ठरवलं. मग जवळ जवळ १० वाजता ते जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले. जेवण करत करत ११ वाजले.

संजीवनीः मल्हार, चल लवकर... आज खूप थकले रे! आता हॉटेलला जाऊ आणि झोपू. मला खूप झोप येतेय.

मल्हारः संजू, प्लीज, थोडा वेळ अजुन थांबूया का इथे बाहेरच रोडवर? छान वाटतंय.. आपण येथेच थोडं फिरून मग जाऊ. जाऊन झोपायचंच आहे.

संजीवनीः ओके. फिरूया.. पण थोडा वेळच...

मल्हारः अगं अंबरचा फोन नाही आला अजून? तू करतेस का त्याला कॉल? मी तोपर्यंत एक ऑफिसचा कॉल करून घेतो. 

संजीवनीः हो रे... थांब मीच करते त्याला कॉल... तू आटप तुझं. 

संजीवनी अंबरला कॉल करते. पण एंगेज लागतो. ती परत करते. परत  एंगेज. मग वाट पाहून अजुन एकदा करते. तर लागतो. 

संजीवनीः (अंबरला चिडवत)अरे अंबर, मी केव्हाची तुला कॉल करते आहे. तुझा फोन एंगेज लागतोय. कोणाशी बोलत होतास इतका वेळ? आणि इतक्या रात्री?

अंबरः आई, काहीही काय तुझं! मित्राचा कॉल होता. आता मी तुम्हाला कॉल करणारच होतो. 

संजीवनीः हो का? असु दे. असु दे.. कॅरि ऑन... 

दोघं बराच वेळ बोलतात. इकडे मल्हार ते ज्या हॉटेलला थांबले होते, तिथे फोन करतो आणि सरप्राईजची सगळी तयारी करायला सांगतो. दोघांचेही फोन संपतात. मग थोडा वेळ फिरून, ते जायला निघतात. बरोबर ११.५० ला ते हॉटेलवर येतात. 

मल्हारः एक मिनिट संजू, थांब. 

संजीवनी थबकते. तिला आश्चर्य वाटतं, काय झालं असेल याला? मला याने का थांबायला सांगितलं?

मल्हारः संजीवनी, थांब. (तो तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो) हा, चल आता. माझा हात पकड. 

ती त्याच्या हात घट्ट पकडुन चालू लागते. ते दोघंही त्यांच्या रूम जवळ येतात. तसं तो तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढतो. संजीवनी डोळे उघडते आणि आवासून पाहतच राहते. ते त्यांच्या रूम मध्ये असतात. रूम खूप छान सजवलेली असते. बेडवर सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या असतात. त्यात हार्ट शेपमध्ये "Happy Birthday Sanju" असं लिहिलेलं असतं. जागोजागी सुवासित पणत्या लावलेल्या होत्या.. छताला लाल पांढरे फुगे चिकटलेले असतात. बेडवर पण हार्ट शेपचे फुगे... खाली पण फुगेच फुगे असतात... मंद लाईट लावलेले असतात.... एक मस्त फुलांनी सजवलेली ट्रॉली असते... त्या ट्रॉलीवर हार्ट शेपचाच, तिचा आवडता फ्रूट केक असतो. त्यावर "संजीवनी" लिहिलेलं असतं.  मल्हार मोजू लागतो. १०, ९, ८, ७, ६, ५, ४, ३, २, १...... हॅपी बर्थ डे टू यू.... हॅपी बर्थ डे टू यू.....  हॅपी बर्थ डे टू यू संजीवनी..... हॅपी बर्थ डे टू यू.... तसं संजीवनी भानावर येते. मग दोघं मिळून केक कट करतात. तो तिला केक भरवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो.... मग ती त्याला भरवते आणि त्याच्या गालावर किस करते.... तिच्या डोळ्यात पाणी येतं. 

मल्हारः अगं संजीवनी, आता काय झालं? 

संजीवनीः मल्हार,आज माझा वाढदिवस आहे, हे सुद्धा माझ्या लक्षात नव्हतं. आजपर्यंत माझा वाढदिवस कधीच साजरा झाला नाही... आज पहिल्यांदा साजरा झाला आहे... आणि तोही इतक्या छान पद्धतीने.... मला खूप आवडलं... खरंच.... आय लव्ह यू मल्हार... 

मल्हारः अग हो हो हो..... आभार मानायचेच तर त्या देवाचे मान. त्यानेच आपल्याला एकत्र मिळवले आहे. थँक्स टू गाॕड... मला तुला खूप खूप आनंदात पाहायचे आहे. अशीच नेहमी आनंदात रहा... 

संजीवनीः थँक्यू मल्हार... थँक्स फॉर मेकिंग माय बर्थ डे नाईट सो ब्युटीफुल.... 

असं म्हणून ती त्याच्या मिठीत जाते आणि ओठावर ओठ टेकवून लॉंग किस करते. बराच वेळ ते एकमेकांना किस करत असतात. दोघेही खूप खुश असतात. परत ते एकमेकांच्या कुशीत झोपून जातात. 

सकाळी लवकर उठून ते मुंबईला परत जातात. जाताना दोघेही खूप गप्पा मारतात. गेल्या वर्षातल्या सुखदुःखांची उजळणी करतात. घरी पोहोचतात तर अंबर घरी नसतो,  ऑफिसला गेलेला असतो. दोघं जेवण करून थोडावेळ आराम करतात. साधारण ४ वाजता मल्हार संजीवनीला उठवतो. 

संजीवनीः काय झालं रे, मल्हार? काही होतंय का तुला? तू ठीक आहेस ना? 

मल्हारः हो हो ... जरा दम घेशील का? मी काय म्हणतोय, आत्ताच एका मित्राचा फोन आला होता. त्यांनी बर्थ डे साठी आपल्याला बोलावले आहे. आपण जाऊन येऊ. 

संजीवनीः ओके चालेल. मी तयार होते. पण काय घालू? 

मल्हारः थांब ...  मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. (तो कपाटातून एक बॅग काढंत ) हे घे.. हे घाल... 

संजीवनी बॅग उघडून बघते, तर त्यात खूप सुंदर डाळिंबी रंगाची नऊवारी असते. तिच्याच मापाचं ब्लाऊज पण असतं. तिला खूप आवडतं.. 

संजीवनीः अरे ही नऊवारी खूप सुंदर आहे... मी हीच नेसते. पण तिथे तुझा ऑफिस स्टाफ असेल नं. मी आॕड मॕन आऊट, असं नको व्हायला (ती हसतच)...  

मल्हारः नाही ग, नाही होणार असं. मी पण मस्त ट्रॅडिशनल ड्रेस घालतो, धोती-कुर्ता वगैरे... मग तुला पण काही वेगळं नाही वाटणार. 

संजीवनी ते घेऊन तयार व्हायला जाते. मस्त पारंपरिक नऊवारी... त्यावर केसांचा अंबाडा...केसांच्या दोन बटा काढलेल्या...  अंबाड्यावर मोगरा आणि अबोलीचा गजरा....नाकात नथ... हातात  बांगड्या.... चेहऱ्यावर हलकासा मेकअप....  संजीवनी तर इतकी सुंदर दिसतं असते की जणू स्वर्गातील अप्सराच... मल्हारने पण मस्त पारंपरिक धोती - कुर्ता घातला होता. डोक्यावर मस्त फेटा बांधला होता. दोघांनीही पूर्णपणे महाराष्ट्रीयन पेहराव केलेला असतो. दोघांची जोडी म्हणजे जणू लक्ष्मी - नारायणाचा जोडाच! दोघंही तयार होऊन जायला निघतात. 

तो तिला घेऊन लॉनवर येतो...  प्रवेशद्वारालाच दोघांचे फोटो लावलेले असतात. त्यातच वेलकमचं खूप सुंदर पोस्टर असतं. ती मल्हार कडे बघते, तर तो डोळ्यांनीच तिला पुढे चल म्हणतो. ते पुढे येतात तसे बाजुला असलेल्या छोट्याश्या तलावामध्ये लावलेले रंगीबेरंगी दिवे पेटु लागतात आणि गाणं सुरु होतं...

असे कसे बोलायचे न बोलता आता
तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा...

दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव कॅमेरात बंद होत असतात. दोघं स्टेजवर जातात, तसे आकाशात आतशबाजी सुरु होते. आणि तयार होते "Welcome Aai Baba".... दोघेही तल्लीन होऊन सगळं बघत असतात.तसेच पार्टीसाठी जमलेले पण हे सगळं बघुन थक्क होतात. तेवढ्यात अंंबर स्टेजवर येतो...

अंबरः वेलकम लेडीज अँड जेंटलमेन! आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की हे काय सुरू आहे. काय आई बाबा, कसं वाटलं सरप्राईज? (दोघे डोळ्यांनीच, मान हलवून हातानेच खूप छान म्हणतात) आई बाबा तुम्हाला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा ... तर मित्रांनो तीन दिवसांपूर्वीच माझ्या या आई - बाबांचे लग्न झाले. पण लग्न कोर्टात झाल्यामुळे जास्त कोणाला कळवले नाही. पण आजचा दिवस खुप खास आहे. आज माझ्या या आईचा वाढदिवस आहे... हा वाढदिवस थोडा आणखी स्पेशल करण्यासाठी आजची ही पार्टी आयोजित करण्यात आली आहे. तर मग कसं वाटलं तुम्हा सगळ्यांना हे सरप्राईज? (सगळे इशारानेच खुप सुंदर म्हणतात)सॉरी, सॉरी, सॉरी...  मी कोणालाच या पार्टीचा प्रयोजन काय आहे, हे सांगितलं नव्हतं. खरंच  मला माफ करा... पण काय करणार, सरप्राईज होतं न हे.... (आई कडे पाहत) आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...  असेच पुढे सगळं आयुष्य आमच्या सोबत राहा...  (संजीवनीला भरून येतं, तिचे डोळे पाणावतात. हे आनंदाश्रू असतात. ते बाहेर येण्याआधीच) आई, आई, अजून एक सरप्राइज तुझ्यासाठी... (संजीवनी खुणेनेच विचारते, अजून काय म्हणून. तोही तिला डोळ्यांनीच थांब सांगतो) आई तयार आहेस? 

ती हो म्हणते, तसं लाईट्स बंद होतात. एक लाईट संजीवनी आणि मल्हार वर... एक अंबरवर आणि एक लाईट ओळखा पाहु कोणावर असेल? अहो, असं कसं? आपले तन्मय - अन्वी आणि आभा राहिले ना... तर तो एक लाईट अन्वी, तन्मय आणि आभा वर पडतो. ते पाहून संजीवनी आणि मल्हार खूप खुश होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. 

अन्वी, तन्मय आणि आभा स्टेजवर येतात आणि त्यांचे अभिनंदन करतात. तसेच संजीवनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असतो. त्यानंतर दोघांच्या हातून केक कापतात आणि सगळ्यांना खाऊ घालतात. तेवढयात सगळे लाईट्स बंद होतात आणि एक स्पाॕटलाईट नीला आणि अंबरवर पडतो आणि ते गाण्यावर नाचु लागतात.

हृदयात वाजे something
सारे जग वाटे happening
असतो सदा मी आता dreaming

हो..
असतो उगाच smiling
बघतो तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling
धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवर येई तुझेच गाणे

खिडकीतुनी डोकावुनी दिसतेस का
पाहतो तुला क्षणोक्षणी
कळता तुला मी संपतो
रोखू कशी तगमग आता हि रोजची
नजरेतूनीच माझ्या सांगतो मी तुला सारे
समजेल का तुला काही
पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरतो का मलाच मी
हृदयात वाजे something…

वाटेवरी मी रोजच्या असतो उभा
दिसशील का कधी तरी
दिसलीस कि झंकारते
उठते मनी किणकिण हि गोड गोडशी
रोखुनी मला तू बघशी
गोड तू जराशी हसशी
येशी अन तशीच तू जशी
शब्द ना सुचे मग काही
बोलणे हि जमतच नाही
गोंधळून वेडे मन जाई
हृदयात वाजे something…

दोघंही अगदी एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालुन नाचत असतात. दोघंही खुप छान नाच करतात. सगळे टाळ्या वाजवतात तसे ते भानावर येतात. मग अंबर जेवणासाठी सगळ्यांना आग्रह करतो. जेवणामध्ये पण खूप  वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. 

सगळे येऊन नवीन जोडप्याचे अभिनंदन करतात. या लोकांमध्ये ऑफिसचे लोक असतात, काही नातेवाईक  असतात, सगळ्यांना फक्त पार्टी आहे हेच माहीत असतं. कशाबद्दल आहे, हे सरप्राईज असतं. सगळेच ह्या सरप्राईज मुळे सुखावून जातात. यातच नीला आणि तिची फॅमिली पण असते. अंबर त्यांची ओळख करुन देतो.

अंबरः   आई-बाबा, ही नीला, माझी बेस्ट फ्रेंड कम लाइफ पार्टनर. (थोडा लाजतच)  

संजीवनी: अरे बापरे, हो का?  छानच आहे.. मला तर आवडली माझी सुन.... काय सुनबाई, ही सासु चालेल न? 

तशी ती पण लाजते.  

अंबरः आई बाबा,  आजची रात्र हिला आपण आपल्या घरी नेऊया का?  मस्त गप्पा मारू  सगळे. 

संजीवनी मल्हारः हो चालेल की...  तिच्या घरी सांगितले आहेस ना?  नाहीतर घरी तिचे आई बाबा काळजी करतील. 

अंबरः हो हो सांगितले आहे.  

मल्हारः ओके. चला तर मग घरी.

कार्यक्रमाला आलेले सगळे समाधानाने आपापल्या घरी जातात. इकडे हे सगळे पण घरी येतात. अर्थातच आजची रात्र जागरण असतं. संजीवनी, मल्हार, तन्मय, अन्वी, आभा, अंबर, नीला असे सगळे मस्त गॅलरीत येऊन बसतात. रात्रभर ते सगळे जुन्या आठवणींना उजाळा देतात. कोणी कोणी काय काय कारनामे केले ते सांगतात. इकडे अंबर आणि नीलाची संजीवनीशी,  अन्वी आणि तन्मयची मल्हारशी आणि या आभाची या सगळ्यांशी नव्याने ओळख होत असते. 

गप्पा करता करता सकाळ कधी उजाडते, कुणालाच समजत नाही. मग सगळे थोडा आराम करतात. आराम करून थोडं मुंबई फिरतात. रात्री आभा आणि अन्वीचे फ्लाइट असते. मग ते जाण्याची तयारी करतात. संजीवनीला ते निघतात तसे परत भरून येतं. 

संजीवनीः (सगळ्यांना) एवढं छान सरप्राइज दिलंत मला! मी आयुष्यात कधीच विसरणार नाही हा दिवस! सगळ्यांचे खूप खूप आभार... विशेषतः अंबरचे.. त्याने हे सगळं घडवून आणलं. (स्वतःला सावरत) आता तुम्हाला जाऊ देतेय.. पण लवकर परत या आणि कमीत कमी दहा दिवसांसाठी तरी या.... मग आपण टुर अरेंज करू... खुप मज्जा करू... (डोळे पुसतंच) बरं, चला निघा लवकर. नाहीतर फ्लाईट मिस होईल. 

तसं सगळ्यांनी आपले अश्रू पुसले आणि बाय करुन निघाले. अंबर त्यांना सोडायला स्वतः गेला. या सरप्राईजमुळे दोघेही खूप खुश होते. आता दोघांनीही मनात ठरवलं होतं, एकमेकांना जपायचं... एकमेकांना खूप आनंद द्यायचा.... एकमेकांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या.... एकमेकांची काळजी घ्यायची... एका नव्या उमेदीने ते वाटचाल करू लागले....


(आता संजीवनी आणि मल्हार अजुन काय काय करतात ते पुढच्या भागात पाहु...)


क्रमशः 

🎭 Series Post

View all