दि टर्निंग पॉईंट भाग- ७
मागील भागावरून....
हे सगळं ऐकून संजीवनी मल्हार कडे अपराधीपणाने बघत असते. कारण सगळ्यांनी जरी हे नातं स्वीकारलं असलं तरी अजून संजीवनीने मल्हारशी असलेलं बायकोचं नातं अजून स्वीकारलेलं नसतं.. तीच्या मनात अजूनही खंत असते. पण मल्हार तिच्याकडे पाहून तिला आश्वासित करतो. डोळ्यांनीच इशारे करत, तू तुझा पूर्ण वेळ घे, असं म्हणत असतो. त्यामुळे संजीवनीच्या मनात मल्हार बद्दलचा आदर अजूनच वाढलेला असतो.
आता पुढे.....
आजही तिघे वेगवेगळ्या रूम मध्ये झोपायला गेले. आई बाबांना एकत्र बघुन तर, अंबर खूप खुश होता. त्यामुळे त्याला पडल्या पडल्या समाधानाने झोप आली. इकडे मल्हार पण बऱ्यापैकी खुश होता. त्याला फक्त संजीवनीची काळजी वाटत होती, त्याला भीती होती कि आपण संजीवनीवर हे नातं लादुन बळजबरी तर केली नाही ना? तर तिकडे संजीवनी मोठ्या पेचात सापडली होती. ती अजूनही अनुरागची जागा मल्हारला देऊ शकत नव्हती. तिने अनुराग तिच्या आयुष्यात आल्यापासून त्याला सोडून कधीच कोणाचा विचार केला नव्हता. तिला मल्हारला स्वीकारायचं होतं.आजपर्यंत तिने मोठमोठया संकटांचा सामना केला होता, पण का कोण जाणे, तिला हे खूप अवघड वाटत होतं. या विचारातच तिला केव्हा झोप लागली कळलंच नाही.
सकाळी अंबर नेहमीप्रमाणे उठला. त्याचे आवरून जिमला गेला. तिकडे मल्हार पण उठला आणि संजीवनी उठली का ते पाहायला तिच्या रूममध्ये गेला. दरवाजा हलकाच उघडा होता. तो दार लोटून आत आला, तर संजीवनी गाढ झोपली होती. तिच्या केसांची बट तिच्या चेहऱ्यावर आली होती. वार्याच्या मंद झुळकेबरोबर ती तिला त्रास देत होती. तिचं ते निरागस रूप पाहून मल्हार तिच्याकडे बघतच राहिला.ती बट दुर करण्याचा त्याला मोह झाला. त्याने ती बट दूर करण्याकरिता हात पुढे केला की तो भानावर आला आणि हात मागे घेतला.
तेवढ्यात संजीवनीला जाग आली आणि त्याला पाहून तिच्या चेहर्यावर आश्चर्य, आनंद, संभ्रम असे अनेक भाव उमटले. पण तिने स्वतःला सावरले आणि पुढाकार घेऊन मल्हारला,
संजीवनीः गुड मॉर्निंग, मल्हार!
तसा मल्हार पण भानावर आला.
मल्हारः गुड मॉर्निंग, संजीवनी! झोप लागली की नाही? नाही, नवीन ठिकाण आहे ना, म्हणून विचारलं.
संजीवनीः (काय उत्तर द्यावं या विचारात) हो, बऱ्याच उशिराने झोप लागली. म्हणून उशिरा जाग आली. सॉरी, अरे ते...
मल्हारः अगं, रिलॅक्स! तू उशीरा उठली म्हणून नाही म्हटलं मी. तुला नवीन जागी झोप येत नाही, माहित आहे मला. म्हणून विचारलं गं.
संजीवनीः हो रे, पण होईल सवय हळूहळू.
मल्हारः बरं, ऐक ना! ते परवा जे डील झालं नं, तर त्या लोकांनी लोणावळ्याला त्यांच्या एका ब्रांच ऑफिसला थोडी चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे. मी लवकर जाऊन येतो, चालेल ना तुला. नाही म्हणजे तू दिवसभर घरी एकटीच राहणार, तुला करमेन ना? नाही म्हणजे तू म्हणत असशील, तर मी कॅन्सल करतो...
संजीवनीः अरे अरे हो हो... कॅन्सल नको करूस. खरंच जा. इट्स ओके रे... आय विल मॅनेज...
संजीवनी विचारात पडली की जावं का याच्यासोबत लोणावळ्याला? याचं काम होईपर्यंत मी लोणावळ्याच्या मनःशक्ती केंद्रात जाऊन येते. मग पुढचं पुढे बघू, तेवढंच अजून मल्हार सोबत वेळ घालवायला मिळेल. उद्या लोणावळा फिरू, असा विचार करून
संजीवनीः मल्हार, तुझी हरकत नसेल तर मी पण येऊ का तुझ्यासोबत? नाही म्हणजे तुला काही अडचण होणार नसेल तरंच.... तुझं काम करून घे, तोपर्यंत मी मनःशक्ती केंद्रात जाऊन येते. मग एक-दोन दिवस राहू तिकडेच. बघ म्हणजे... नाहीतर मी थांबते घरीच..
मल्हारः (एकदम खुश होत) खरंच, येतेस तू माझ्यासोबत? अरे तू माझ्या सोबत आलीस तर मला आनंदच आहे. सो नाईस ऑफ यू... मी म्हणणारच होतो तुला, पण म्हटलं तुला आवडेल की नाही, म्हणून काही बोललो नाही. बरं चल मग. तयार हो...
संजीवनीः हो लगेच तयार होते. तू पण फ्रेश हो.
दोघं तयार होऊनच खाली येतात. संजीवनीने आकाशी रंगाचा चुडीदार घातला होता. हातात ब्रासलेट, कानात नाजुकसे टॉप्स, गुलाबी लिप्सस्टिक, भांगात सिंदुर, डोळ्यांत काजळ आणि हलकासा मेकअप केला होता. आजही खुप सुंदर दिसत होती ती!त्याने पण पांढरा टी शर्ट आणि ब्लु जिन्स घातली होती. तेवढ्यात अंबर पण येतो. त्यांना पाहून...
अंबरः ओहो! Love birds! सकाळी सकाळी एवढे तयार होऊन कुठे निघालात?
त्याच्या या वाक्याने दोघेही लाजतात.
मल्हारः अरे ते मि. सावंत आहेत ना, त्यांनी लोणावळ्याला त्यांच्या ऑफिसला काही चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. तर म्हटलं दोघेही जाऊन येतो... तेवढंच लोणावळा फिरणं पण होईल. १-२ दिवसात येऊ... चालेल ना तुला?
अंबरः अरे बाबा, मी तर मजा करत होतो. जाऊन या तेवढाच दोघांना वेळ मिळेल. माझी काळजी करू नका. मावशी आहेत ना.. त्या जेवणाचं बघतील. तुम्ही एन्जॉय करा.ऑफिसच पण मी बघतो.
मल्हारः थँक्यू बेटा!
अंबर: काय बाबा? यात काय थँक्यू? इतक्या वर्षांमध्ये मी कधीच तुम्हाला कुठे फिरायला गेल्याचं आठवत नाही. जा मस्त मज्जा करा.
संजीवनीः हो रे माझ्या सोन्या... काळजी घे आणि कॉल कर झोपण्याआधी. आम्ही वाट पाहू.
अंबरः हो गं आई... या तुम्ही. तुम्हाला उशीर होईल.
तसं दोघेही नाश्ता करून निघतात. मुंबई लोणावळा अंतर तसं काही जास्त नसतं. जुन्या आठवणींना उजाळा देत दोघेही लोणावळ्याला पोहोचतात. मल्हार हॉटेल बुक करतो. दोघे सामान ठेवून फ्रेश होतात. मल्हार कपडे बदलतो आणि फॉर्मल ड्रेस अप करुन बाहेर येतो.
मल्हारः संजू, मी तुला मनःशक्ती केंद्रात सोडतो. मग मी पुढे जातो. तुझं काम झालं की मला कॉल कर. माझं लवकर आटोपलं तर मी तुला घ्यायला येईल.
संजीवनीः अरे मल्हार, तू मला सोड. मी माझं झालं की परत येते. तू डायरेक्ट हॉटेललाच ये. फक्त लवकर आलास तर कॉल कर.
मल्हारः बरं चल मग.
मल्हार तिला सोडून पुढे ऑफिसला जातो. इकडे संजीवनीला मनःशक्ती केंद्रात सगळीकडे फिरून खूप शांत वाटत असतं. तिचा बराच वेळ तिकडे जातो. शेवटी पाच वाजता ती मल्हारला कॉल करते.
संजीवनीः हॅलो मल्हार, तुला किती वेळ आहे?
मल्हारः हॅलो संजू, सॉरी गंं. मला कॉल करायला जमलंच नाही. बस अजून एखादा तास लागेल.
संजीवनीः ठीक आहे मग. मी हॉटेलला जाते. तुझं आटोपलं की डायरेक्ट तिकडेच ये. मग आपण जेवण करू.
मल्हारः बरं ठीक आहे. पण जाशील ना नीट? सॉरी यार, मी नाही येऊ शकलो.
संजीवनीः ठीक आहे रे! तू कर तुझं काम.
मल्हारः ओके चल बाय... काळजी घे आणि पोहोचली की कॉल कर.
संजीवनीः हो ये लवकर.. मी वाट पाहते...
ती असं बोलली आणि स्वतःच लाजायला लागली. तिचे 'वाट पाहते' हे शब्द ऐकून मल्हारला पण खूप आनंद झाला. त्याच्या मनात गुदगुल्या झाल्या. दोघांनी बाय करून फोन ठेवला.
इकडे संजीवनी हॉटेल वर पोहोचली. आज तिने तिचं मन शांत केलं होतं. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली होती. तिच्या मनाने कौल दिला होता. आता कधी एकदा मल्हारला भेटते, असं झालं होतं तिला. आज ती सर्वार्थाने मल्हारला स्वीकारणार होती. तिने पोहोचल्याचा फोन केला, तसा तोही निघतच होता.
संजीवनी खूप खुश झाली होती. तिला तर काय करु आणि काय नको, असं झालं होतं. ती फ्रेश झाली आणि तिने पिंक रंगाची साडी नेसली. त्यावर स्लीवलेस आणि मागून मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घातले. त्यावर मॅचींग कानातले टॉप्स घातले. पिंक रंगाची लिपस्टिक, डोळ्यात काजळ, आयलायनर असा हलकासा मेकअप केला. गळ्यात मल्हारने घातलेलं डायमंडच मंगळसूत्र घातलं. हातात किणकिणणाऱ्या बांगड्या... पायात पैंजण... केस मोकळे सोडलेले... कपाळावर टिकली.... भांगात सिंदूर.... खूप खूप सुंदर दिसत होती ती! स्वतःला आरशात पाहून स्वतःच लाजत होती. त्या लाजण्याने अजूनच चेहऱ्यावर लाली आली होती.
ती तयार होऊन त्याची वाट पाहू लागली. ती चार-चार वेळा स्वतःला आरशात पाहत होती आणि सारखं सारखं मोबाईल मध्ये पाहत होती. सात वाजले, आठ वाजले... तरी मल्हार आला नव्हता. शेवटी तिने त्याला कॉल केला. पण त्याला कॉल लागला नाही. ती वारंवार त्याला कॉल करत होती. पण फोन नॉट रिचेबल लागत होता. तिला आता भीती वाटू लागली.. आता काय करावे तिला सुचत नव्हते. नऊ वाजले, दहा वाजले... पण अजूनही मल्हारचा पत्ता नव्हता. शेवटी तीने अकरा वाजेपर्यंत वाट पाहून अंबरला कॉल करायचा विचार केला. आतापर्यंत तिने अंबरला सांगितलं नव्हतं. कारण त्याला कॉल केला असता तर त्याला उगाच टेन्शन आलं असतं.
१०.१५ झाले.. १०.३० झाले... १०.४५ झाले.... १०.५५ झाले..... आता तिची मनःस्थिती खराब होऊ लागली. तिने धावत जाऊन फोन हातात घेतला आणि अंबरला कॉल लावणार, तेवढ्यात दरवाजावर थाप पडली. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला, तर समोर मल्हार उभा होता...
समोर मल्हारला बघून तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो आत आला आणि तिच्याकडे पहातच राहिला.. त्याला एक क्षण काहीच समजलं नाही. जसा तो आत आला, तसं संजीवनीने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. ती खूप घाबरली होती. भीतीने थरथरत होती. मल्हारला पण तिची मनःस्थिती समजली. तो तिला थोपटून शांत करत होता. थोड्यावेळाने संजीवनी शांत झाली.
मल्हारः संजू, काय झालं?
संजीवनीः (तिचे ओठ अजुनही भीतीने थरथरत होते ) मल्हार काहीच बोलू नकोस.. असाच शांत राहा. मला तू असाच माझ्याजवळ हवा आहेस, कायमचा...
हे ऐकून तर मल्हारला एवढा आनंद झाला की आनंदाने तो पण अश्रू ढाळु लागला. आता तो पण तिच्या डोळ्यांत बघू लागला.
मल्हारः संजीवनी, मी नेहमी तुझ्या जवळ असणार आहे. आता मला तुला गमवायचं नाही. परत आयुष्यात मला ती चूक नाही करायची. खूप भोगले आहे गं मी! पण आता नाही ...
संजीवनीः (त्याच्या मिठीतून बाहेर येते आणि त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवत) आता मागचं काहीच आठवायचं नाही. फक्त आजचा आणि उद्याचा विचार करायचा. मी पण तुला सोडून कुठेच जाणार नाही. तु फ्रेश होऊन ये... मग बोलू. तोपर्यंत मी जेवण ऑर्डर करते.
मल्हारः हो आलोच.
संजीवनीने जेवण ऑर्डर केलं. थोड्याच वेळात जेवण आलं. आणि मल्हारपण फ्रेश होऊन आला. दोघेही गप्पच होते.. पण दोघांच्याही मनात लाडू फुटत होते. संजीवनी जेवण वाढत असते. वाढतांना बांगड्यांच्या होणाऱ्या किणकिण आवाजाने मल्हारचे मन हरखून जाते.
आज त्याचं जेवणात लक्षच नसतं. तो तिलाच बघत असतो. आज ती खास त्याच्यासाठीच तयार झालेली असते... त्याला ते सगळं कळतं होतं. तो आपल्या कडे बघतोय हे पाहून ती सुखावते आणि अजूनच लाजेने लाल होत असते.
मल्हारः अगं, मी वेळेतच निघालो. पुढे आलो तर घाटात एक्सीडेंट झाला होता. ट्रॅफिक जाम झाले होते. त्यातच अडकलो, ब-याच वेळाने रस्ता मोकळा झाला. तुला कॉल करतो म्हटलं तर रेंज नव्हती. जसा हॉटेलच्या जवळ आलो तशी रेंज मिळाली. म्हटलं आता एकदम रुमवरच जावं. म्हणून कॉल नाही केला. (तो गालातल्या गालात हसून म्हणाला, उशीर झाला तेही एका अर्थी बरंच झालं म्हणा.. नाहीतर अशी मिठी आमच्या नशीबात कुठे!)
संजीवनीः खूप घाबरले होते रे मी! तुला फोन लागत नव्हता आणि अंबर घाबरेल म्हणून त्याला सांगितलं नाही. ११ वाजता त्याला कॉल करणार होते मी. एवढया वेळात माझ्या डोक्यात काय काय विचार येऊन गेले. मला तर आठवलं तरी भीती वाटते. मन चिंती ते वैरी न चिंती, असं झालं होतं. आयुष्यात अनुरागला हरवून बसले, आता तुला नाही हरवायचे.
बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. तसं त्याने उठून तिचे अश्रू पुसले. तिच्या ओठांवर बोट ठेवून
मल्हारः शु.... आता बिलकुल रडायचं नाही. फक्त खुश राहायचं. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. नेहमी तुझ्या सोबत राहील. आय लव्ह यू संजीवनी!
तशी संजीवनी पुन्हा त्याला बिलगली. आता त्याने तिला मिठीत घेतलं.
संजीवनीः आय लव्ह यु टू मल्हार! आता काहीच बोलू नकोस.
तसं मल्हारने मिठी अजुनच घट्ट केली.ती अजुनही त्याच्या छातीवर डोकं ठेवून होती. तिला त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. त्यालाही तिच्या हृदयाची धडधड जाणवत होती. दोनांचीही धडधड वाढली. त्याने तिची मान आपल्याकडे करुन तिच्या कपाळावर किस केलं. तसं त्याच्या डोळ्यात बघत आपली संमती दर्शवत डोळे मिटले. तसं त्याने तिच्या डोळ्यांवर किस केलं.. मग गालांवर केलं, तशी ती शहारली... त्याने हळुच तिच्या कानात
मल्हारः संजीवनी, आज खूप छान दिसत आहे!
असं बोलून त्याने तिच्या कानाला किस केलं.. अजूनही संजीवनीचे डोळे बंद होते. मग त्याने हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. तसा तिनेही प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. बराच वेळ ते एकमेकांमध्ये गुंतले होते. तिचा श्वास जड होऊ लागला, तसं त्याने तीला थोडं दुर केलं, त्याने तिचे मोकळे लांब केस बाजूला केले आणि तिच्या मानेवर, उघड्या पाठीवर किस करू लागला. किस करता करता त्याचे हात तिच्या हातात गुंफले होते. मग त्याने तिच्या कोमल हातांवर पण किस केलं. तिलाही हे सगळं हवहवसं वाटत होतं. तिचा हात पण आता त्याच्या दाट केसांतुन फिरू लागला. केसातुन पाठीवर... दोघांनाही एकमेकांची साथ हवी होती.
त्याने तिला उचलून बेडवर झोपवले आणि तिच्या बाजूला बसून तिच्या सर्वांगावर हात फिरवु लागला, किस करू लागला. दोघं एकमेकांना प्रतिसाद देत होते. हळूहळू कपड्यांचा अडसर पण दूर झाला आणि आज सर्वार्थाने ते एकमेकांचे झाले. आज सर्वार्थाने संजीवनीने मल्हारशी असलेलं नवरा - बायकोचं नातं स्वीकारलं होतं. तिने आज त्याला पूर्णपणे समर्पण दिलं होतं. इतक्या वर्षांपासून दोघेही अशा प्रेमाला पारखे झाले होते. जणू आज दोघेही नव्याने त्या प्रेमाचा अनुभव घेत होते.
दोघांचेही जोडीदार सोडून गेल्यानंतर आज पहिल्यांदा ते मनाची आणि त्याबरोबर शरीराची पण तहानभुक भागवत होते. परमोच्च क्षणी दोघे एकमेकांचे झाले आणि एकमेकांच्या ओठांवर किस करून दोघेही समाधानाने विलग झाले. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान झळकत होते. कदाचित असे समाधान यापूर्वी त्यांनी अनुभवले नव्हते.
संजीवनीः आय लव्ह यु सो मच मल्हार! असे बोलून तिने त्याच्या कपाळावर किस केले.
मल्हारः (त्याच आवेगाने)आय लव्ह यू टु संजीवनी!
असं म्हणून तिला मिठीत घेतले. रात्रभर असेच एकमेकांच्या मिठीत ते झोपून गेले. सकाळी अर्थातच उशिरा जाग आली. अंगावर ब्लॅंकेट गुंडाळून संजीवनी लाजतच उठुन बसली आणि मल्हारच्या दाट केसांतुन हात फिरवत त्याला उठवू लागली. तसा मल्हारने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर किस केले. तशी ती पुन्हा लाजली. बळजबरीने त्याच्या मिठीतून बाहेर येत
संजीवनीः चल मल्हार, आवरून घे. मग फिरायला जाऊ.
मल्हारः संजू आता कुठे जायचं? इथे तुझ्या मिठीतच तर स्वर्ग आहे.
तशी ती पण लाजली. मग परत एकदा त्यांच्या गुड मॉर्निंग चा टी रंगला...
संजीवनीः मल्हार, चल उठ लवकर.. बघ किती वाजलेत? मी आंघोळ करून येते तोपर्यंत तु आवर लवकर.
मल्हार अजूनही तिच्याकडेच पाहत होता. गुड मॉर्निंग टी ची वेगळीच तरतरी तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. तोही आज खूप समाधानी होता. जणू आज पहिल्यांदा तो ते सुख अनुभवत होता. या वयातही असे निःस्वार्थी प्रेम करता येते, याची त्यांना जाणीव झाली.आता त्यांना मागचं सगळं विसरून नवीन आयुष्य सुरू करायचं होतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा