दि टर्निंग पॉईंट भाग-४
आता पुढे.....
ते नाव वाचून मल्हार पुरता गोंधळून गेला, पण संजीवनीच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते... तिने डोळ्यानेच फोन घे म्हटले. तसे मल्हार ने फोन सुरू केला आणि स्पीकर वर टाकला...
आभाः हॅलो मल्हार, (रागातच)
मल्हारः हॅलो आभा, अगं तू यावेळी कॉल केलास? सगळं ठीक आहे ना? काय झालंय?
आभाः तु मला धोका दिलास. माझ्या प्रेमाचा अपमान केलास.. लाज नाही वाटत तुला विचारायला, काय झालं म्हणून?
मल्हारः-----
आभाः अरे, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. माझ्या हातात होतं तोपर्यंत मी किती प्रयत्न केले, तुला समजावण्याचे... पण नाही, तुला ते दिसलंच नाही... आणि आता... आता तू तिच्याशी लग्न केलस, जिला मी तुला सांभाळायला सांगितलं होतं... शी... शी, लाज वाटते रे मला तुम्हाला माझे मित्र म्हणून घ्यायची... मल्हार, तुला माहित नाही की तू मला किती दुखावलं आहेस ते... या आयुष्यातच काय, पण पुढचे सात जन्मसुद्धा मी तुला माफ करू शकणार नाही....
मल्हारः अगं आभा, ऐकून तर घे, मी काय म्हणतो ते...
आभाः चूप.. एकदम चूप... मला आता काहीही ऐकायचं नाही. झालं न तुमच्या मनासारखं... तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला.... बाय, गुड नाईट...
मल्हारः आभा, ऐक ना!
तेवढ्यात फोन कट झाला आणि दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. दोघंही एकमेकांकडे आश्चर्याने आणि भीतीने पहात होते. ते पश्चातापात होरपळून निघत होते आणि तेवढयात परत फोन वाजला... परत तेच Aabha calling.... दोघं एकमेकांकडे पाहायला लागले. तसं त्याने स्वतःला सावरत...
मल्हारः हॅलो आभा, अगं ऐकून तर घे माझं. फक्त एकदाच ऐक...
आभाः (गालातल्या गालात हसत) हॅलो, हॅलो, हॅलो मल्हार, आधी फोन स्पीकरवर टाक.
मल्हारः (फोन स्पीकर वर टाकत) हा बोल आता.
आभाः हाँ, तो कैसे लगा मेरा मजाक! आजकालची मुलं काय म्हणतात ते chill guys ...
आणि आभा हसायला लागली. दोघांनाही एक क्षण काहीच समजलं नाही. मल्हारला तर घाम फुटला होता तो घाम पुसतच..
आभाः हॅलो, हॅलो मल्हार आणि संजीवनी, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा... तुमचं पुढील आयुष्य खूप भरभराटीचं आणि आनंदाचं जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
मल्हारः अगं, पण तुला हे कधी समजलं आणि फोन केल्या केल्या जे तू बोललीस, ते काय होतं?
आभाः अरे मल्हार, शांत हो... घाम पूस आधी... थांब मी व्हिडिओ कॉल करते...
ती व्हिडिओ कॉल करते.
आभाः मल्हार, संजीवनी कडे कर नं स्क्रीन... हॅलो संजीवनी, मल्हार, दोघं जवळ या नं... मला तुम्हाला एकत्र पाहायचं आहे.
दोघांना एकत्र बघून आभाचे डोळे भरून आले.
संजीवनीः आभा, आम्हाला माफ कर गं... आम्ही तुला विचारायला हवं होतं... चुकलंच आमचं... पण असं एकत्र येण्याचा कोणताच विचार आमच्या डोक्यात नव्हता... पण सगळं असं अचानक झालं की, आम्हाला विचार करायला पण वेळ नाही मिळाला... पोरांनी हे सगळं घडवून आणलं गं... We are really sorry.. खरंच माफ कर आम्हाला..
आभाः हॅलो अगं ए संजीवनी, रडू नकोस... मला सगळं माहित आहे... खरतर मुलांचा आणि माझाच हा प्लान होता...
आता दोघेही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहायला लागले. त्यांना आपण काय ऐकतो आहे, यावर विश्वासच बसत नव्हता.
आभाः हो, हो, हे खरं आहे... अन्वी आणि अंबरने मला विचारूनच हे सगळं घडवून आणलं होतं. खरंच, गुणी खूप गुणी मुलं आहेत तुमची! माझी काहीच हरकत नाही गं... माझ्या संसारात मी सुखी आहे.. जे झालं ते मी आधीच स्वीकारलेलं आहे. त्यामुळे मला काहीच खंत नाही. प्रेम करणारा नवरा आहे, जीव लावणारी मुलं आहेत, सुन आहे, जावई आहे... मी खूप खुश आहे. पण मल्हार तुझी बायको गेली आणि संजू तुझा नवरा गेला, ते ऐकून खूप वाईट वाटतं होतं... दोघांनी असं एक एकट्याने जगण्यापेक्षा एकत्र आनंदाने जगले तर मला आनंदच आहे... अन्वीला बाबा मिळाला आणि अंबरला आई मिळाली.... आता तुमचं कुटुंब पूर्ण झालं... बस, आता तुम्ही दोघं खूप खुश रहा, हीच देवाजवळ प्रार्थना... चला काळजी घ्या... खूप रात्र झाली आहे. तुम्ही पण झोपा. आता आयुष्य आहे बोलायला... खूप एन्जॉय करा...
मल्हारः आभा, खरंच खूप खूप धन्यवाद! खरंच एक क्षण वाटलं की आम्ही चुकलो... पण, ..... जाऊ दे... तु खरंच आनंदी आहेस, हे पाहून आम्हाला पण आनंद झाला.
संजीवनीः हो खरंच गं... ये ना आता आमच्याकडे... चांगले ८-१० दिवस काढुन ये.... आपण खूप धमाल करू... मस्त मुंबई फिरू.... परत एकदा मुंबई जगू.....
आभाः हो, नक्की येते. मला पण खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची... सगळं मॅनेज झालं की फोन करते... ए मल्हार, पण तू मला घ्यायला ये हा....
मल्हारः हो गं, तू ये तर खरं... बरं चल ठेवतो फोन... (दोघंही तिला गुड नाईट करतात)
आभाः हो, चल बाय, गुड नाईट, मजा करा..
फोन ठेवतो... तसं दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. डोक्यावरचं खूप मोठं ओझं रिकामं झाल्यासारखं वाटलं दोघांना. शेवटी संजीवनी ने जे सांगितलं होतं, ते खरं ठरलं होतं.
संजीवनीः बघितलं मी माझ्या मैत्रिणीला खूप चांगलं ओळखते. अजूनही तशीच आहे.
मल्हारः हो ना, खरंच मी चुकलो तिला ओळखायला...
कदाचित मल्हार आंधळ्या प्रेमापोटी हा सगळा विचार करू शकला नाही. त्याच्या आयुष्यात हा टर्निंग पॉईंट आला होता, पण तो निर्णय घेऊ न शकल्यामुळे त्याला त्याची बरीच मोठी किंमत चुकवावी लागली होती.
संजीवनीः आता असू दे रे... यामुळे आता तरी आपल्याला कळलं ना, खरं काय ते... जाऊ दे, सोड सगळं... आता आपण सगळं विसरून नव्याने आयुष्य सुरू करू.
मल्हारः हो खरंच! आता खूप मोकळं वाटतंय... संजीवनी, I Love You....
संजीवनीने हे ऐकल्याबरोबर एकदम त्याच्याकडे पाहिलं आणि लाजतच रूममध्ये पळाली... तोही पळतच तिच्यामागे बेडरुममध्ये आला.... तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती.... असं वाटंत होतं की ते छोटस हृदय उडी मारून बाहेर येतंय की काय... तिने डोळे बंद करून छातीवर हात ठेवून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या धडधड थांबत नव्हती... तिने डोळे उघडले आणि एकदम तो तिला तिच्या समोर, तिला पाहत असताना दिसला... तिला तर काय करावे सुचत नव्हते... ती तशीच बसून राहिली... मल्हार तिच्याकडे बघून फक्त गालातल्या गालात हसत होता... थोड्यावेळाने
मल्हारः संजीवनी, शांत हो मी तुला वचन दिलंय ना, तू हो म्हटल्याशिवाय मी तुला काहीही करणार नाही... विश्वास ठेव माझ्यावर.
तरीही संजीवनी गप्पच.. हे पाहून
मल्हारः बरं, ठीक आहे. तू या बेडरूममध्ये झोप, मी दुसऱ्या बेडरुममध्ये झोपतो.. तुला कम्फर्टेबल वाटेल. चल झोप, आता रात्र खूप झाली आहे, उद्या बोलु. आता मी दहा दिवस सुट्टी घेतली आहे. No office, No work... अंबर बघून घेईल सगळं.. असंही तो उद्या येतोच आहे...
संजीवनीः ठीक आहे, तू पण जा झोपायला. आपण उद्या बोलु. I am sorry and Good Night...
ती तोंडावर पांघरून घेऊन झोपून गेली. तसं त्याने लाईट बंद केला आणि दार बंद करून दुसऱ्या रूममध्ये झोपायला गेला. त्याला पण आज खूप शांत वाटत होतं. मन मोकळं केल्यामुळे आणि आभाच्या समंजसपणामुळे त्याला पण लगेच शांत झोप लागली.
खिडकीतून येणारी कोवळी सूर्यकिरणे संजीवनीच्या चेहर्यावर पडू लागली, तशी तिला एकदम जाग आली. एक क्षण तिला कळंलच नाही, आपण कुठे आहोत ते.. मग तीचंच तिला हसू आलं... ती फ्रेश होऊनच बाहेर आली. तिने मल्हारच्या रूममध्ये हळुच डोकावुन पाहीलं, तर तो रूममध्ये नव्हता. मग ती खाली हॉलमध्ये आली. हॉलमध्येसुद्धा मल्हार नव्हता. तेवढ्यात तो किचनमधून दोन कॉफीचे मग घेऊन येताना दिसला. तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं... असं तिने कधीच अनुभवलं नव्हतं... त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं...
मल्हारः अगं संजीवनी, काय झालं? तुला आवडलं नाही का मी कॉफी करून आणली ते?
संजीवनीः तसं नाही रे... पण या सगळ्याची सवयच नाही मला आणि अचानक हे असं पाहून मन भरून आलं.
मल्हारः अरे बापरे हे असं आहे तर... ये आपण गॅलरीत बसून मस्त कॉफी पिऊ, मग नाश्ता करू. ये इकडे.
दोघं परत गॅलरीत बसून कोवळ्या उन्हात कॉफीचा आनंद घेत बसतात.
संजीवनीः थँक्यू मल्हार...
मल्हारः कशासाठी?
संजीवनीः तू माझ्या आयुष्यात आलास त्यासाठी आणि कॉफीसाठी... (ती गालातल्या गालात हसत म्हणाली).
मल्हारः ओहो Its my pleasure dear... तू म्हणशील तर मी रोज तुझ्यासाठी हे करायला तयार आहे....
दोघेही खळखळुन हसले..
संजीवनीः खरंच रे... मला कधी असा अनुभव नाही रे... रोज आपलं सकाळी लवकर उठायचं, दिवसभर सगळं आवरत बसायचं, सगळ्यांना आयतं हातात द्यायचं...
आणि बोलता बोलता ती परत हरवली...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा