दि टर्निंग पॉईंट????️
भाग १
कालच त्यांचे लग्न झाले????❤️????????.... अगदी साध्या पद्धतीने, कोर्ट मॅरेज.... पण आज त्याला त्याच्या आयुष्यातल्या एका खूप मोठ्या प्रोजेक्टच्या मीटिंगसाठी जावं लागलं????..... तो प्रोजेक्ट म्हणजे त्याचं स्वप्न होतं... जे आज पूर्ण होणार होतं... आयुष्यात त्याने खूप स्वप्ने पाहिली होती, पण त्यातली अगदी नगण्य स्वप्ने पूर्ण झाली होती... आणि अचानक, कालपासून, जणू लॉटरी लागल्यासारखीच त्याची स्वप्ने पूर्ण होऊ लागली... त्याने जी काही अपेक्षा केली होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगली... इकडे आॕफीसमध्ये मीटिंग सुरू झाली. प्रेझेंटेशन झाले... खूप छान पद्धतीने त्याने एक्सप्लेन केलं. मग थोडी चर्चा झाली.. आणि तेवढ्यात लंच ब्रेक झाला. त्यामुळे, ब्रेकनंतर कंटिन्यू करायचे ठरले.. त्या कंपनीचे लोक फ्रेश होण्यासाठी गेले. त्यांना यायला वेळ होता, तेवढ्या वेळात तिच्याशी बोलून घ्यावं म्हणून त्याने तिला फोन लावला. तिनेही अगदी पहिल्या रिंग लाच फोन उचलला, जणू त्याच्या फोनची ती वाटच पहात होती????... फोनवर त्याचं नाव वाचून वेगळीच लाली आजही तिच्या चेहऱ्यावर आली☺️.....
मल्हार: हॅलो, संजीवनी.... आर यु देअर? हॅलो... हॅलो...
(इकडे आपल्या मॅडम एवढ्या लाजत होत्या की तोंडातून हॅलो सुद्धा निघायला तयार नव्हता)
मल्हार: हॅलो, संजीवनी, ऐकतेस ना... काय झालं?
(मग मॅडमनेही जरा स्वतःला कंट्रोल करत)
संजीवनी: हॅलो... अरे, मल्हार, बोल ना... ते मी ...
मल्हार: ओ ... काय करतेस?ओह ओ ओ... वेट वेट ... लेट मी गेस.... आर यू ब्लशिंग☺️☺️?... ओ माय गॉड! अजूनही तू नवीन लग्न झालेल्या नववधू सारखी लाजत आहेस.... आय कांट बिलीव्ह???? .... शीट यार, मी आता तिथे हवा होतो????... मला तुझं ते लाजणं बघायचं आहे????... थांब थांब... मी व्हिडिओ कॉल करतो.
(तो लगेच व्हिडिओ कॉल करतो आणि तिला असे लाजतांना बघून तो परत एकदा तिच्या प्रेमात पडत असतो)
मल्हार: संजीवनी, असं फक्त लाजणारच आहेस कि माझ्याशी काही बोलणार पण आहेस... संजीवनी?
संजीवनीः हम्म ☺️... बोल न????...
मल्हारः संजीवनी... संजीवनी... संजीवनी, किती सार्थ आहे हे तुझं नाव माझ्यासाठी.... जसं संजीवनी ने लक्ष्मणाला नवजीवन दिलं होतं, तसंच तू माझ्या आयुष्यात येऊन मला नवजीवन दिलं आहेस ????... आय एम व्हेरी मच थँकफुल टू यु.... लव्ह यू डियर????????.... असं वाटतंय आज माझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. माझं तरुणपणापासूनचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. तू खरंच माझ्यासाठी खूप लकी आहेस. थँक यू सो मच डियर ????????????.. अशीच नेहमी माझ्यासोबत रहा.
(संजीवनी त्याला थांबवत)
संजीवनीः बस बस ... खूप झालं माझं कौतुक! आणि हे जे स्वप्नांचं आहे ते काही माझ्यामुळे नाही झालं... ते सगळं तुझ्यामुळेच झालं आहे.. ते तुझ्याच कष्टांची फळं आहेत... तुझीच मेहनत आहे... तू एवढा जीव तोडून मेहनत घेतलीस, त्याचीच ही फळं आहेत.. मी फक्त निमित्तमात्र आहे....
मल्हारः अगं, पण अशीच मेहनत मी आधीही नाही घेतली का? नेहमीच मी निष्ठेने आणि मनापासून काम करत आलो आहे. पण किती गोष्टी पूर्ण झाल्या, हे तुला पण माहित आहे... आफ्टर ऑल यु आर ओन्ली अँड वन विटनेस ऑफ ऑल डीज... मी खरंच खूप खचून गेलो होतो ग????... आज हा जो मी उभा आहे नं, तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच!! तू माझ्या आयुष्यात नसतीस, तर मी आज कुठे आणि कसा असतो, हे मला पण नाही माहित????????♂️.... तू नेहमी माझ्या सोबत होतीस, प्रत्येक कठीण प्रसंगात तू मला साथ दिलीस... तू माझी बेस्टी होतीस आणि यापुढेही राहशील.... आज तू माझी बायको आहे, पण कालपर्यंत तू माझी मैत्रीण, प्रेयसी, आई होतीस... तशीच यापुढेही माझी सावली बनून राहा... या वयात अजून काय पाहिजे गं... हे मन, शरीर फक्त प्रेमाचा भुकेला असते. असंच प्रेम करणारी प्रेयसी, प्रत्येक निर्णय घेण्यात मदत करणारी, भावना समजून घेणारी मैत्रीण बनून, माझ्या आयुष्यात राहशील ना? एक वेळ बायको म्हणून नसलीस तरी प्रेयसी म्हणून मला समजून घे????... राहशील ना अशीच माझ्यासोबत????????...
दोघांच्याही डोळ्यात आता पाणी जमा झालं होतं, पण दोघेही आपले अश्रू लपविण्याचा प्रयत्न करत होते... दोघेही भानावर आले, तसे
संजीवनीः ए मल्हार, नको ना एवढा सेंटी होऊस... मी आता फक्त तुझीच आहे आणि नेहमी तुझीच सावली बनून राहील... ही प्रेयसी कधीच तुला सोडून जाणार नाही.... नेहमी तुझ्यावर भरभरून प्रेम करेन... तू तर माझा सखा, माझा प्रेमी, माझा मितवा आहेस... आज पर्यंत नेहमी कठीण प्रसंगी तू माझ्या सोबत राहिलास.... अशीच नेहमी मला साथ दे.... आय लव यू डियर, फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट❤️❤️ लव यू सो मच...
तेवढ्यात शिपाई आला...
शिपाईः बॉस, ते साहेब लोक जेवायला बोलवत आहेत.
मल्हारः (डोळे पुसत) हो आलोच, सांग त्यांना...
मल्हारः बरं संजीवनी, माझी ही मिटिंग संपली की मी लगेच घरी येतो. मग आपण खूप गप्पा मारू. लवकर येतो... चल बाय ...लव यू????????????
संजीवनीः हो जा... ऑल दि बेस्ट???????? आणि लव यु टू????????????...
संजीवनी एवढी लाजली की मल्हार परत एकदा पाणी पाणी झाला... मल्हार ने फोन ठेवला आणि कंपनीच्या लोकांसोबत जेवायला गेला. मग जेवणानंतर परत पुढील चर्चा झाली आणि शेवटी त्या लोकांनी मल्हारच्या कंपनीसोबत टाय अप केलं????????... आज मल्हार खूप खुश होता. इतक्या दिवसांचं त्याचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं... त्याच्या कंपनीने आज एका मोठ्या कंपनीसोबत टाय अप केलं होतं.... इकडे संजीवनी पण खूप खुश होती. आज बऱ्याच वर्षानंतर तिला खूप मोकळं वाटत होतं????????????????... पुन्हा नव्या उमेदीने जगावसं वाटत होतं. खूप उत्साह संचारला होता तिच्यात! तिला तर काय करु आणि काय नको असं झालं होतं.... आज तो लवकर येणार म्हणून ती तयार व्हायला लागली....
पाच वाजले तशी डोअरबेल वाजली... जशी बेल वाजली, तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली????... परत बेल वाजली तशी ती भानावर आली आणि पळतच दरवाजा उघडायला गेली. जसा दरवाजा उघडला, तसा तो समोर उभा होता, एक हात कमरेवर आणि एक हात बेलवर.. दोघांच्याही चेहऱ्यावर लाली☺️ आणि डोळ्यात प्रेम काठोकाठ भरलेले????.... दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले????... तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तसे ते दोघेही भानावर आले... तशी ती पळतच पाठमोरी घरात जाऊन उभी राहीली.... काही केल्या तिच्या हृदयाची धडधड कमी होत नव्हती... त्याने फोन चेक केला तर नेहमीप्रमाणे मोबाईल कंपनीचा कॉल होता, त्याने तो कट केला. धावत जाऊन तिला मागून मिठी मारली आणि तिला उचलून गोल गोल फिरवत...
मल्हारः संजीवनी, संजीवनी, संजीवनी, आज मी खूप खूप खूप खुश आहे... आज माझं मोठं स्वप्न पूर्ण झालं आणि हो हा सगळा तुझाच पायगुण आहे.... थँक यु सो मच डियर...
संजीवनीः अरे, हो हो हो... आधी मला खाली तर उतरव, मला चक्कर येईल... आणि तसंही हे काय आपलं वय आहे का अशा गोष्टी करायचं?
मल्हारः (तिला खाली उतरवत जरा संशयाने) हे संजू, आपलं काय वय झालं आहे का? अभी तो हम जवाँ हैं, बुढे होंगे अपने दुश्मन????... चल तयार हो, आज आपण बाहेरच जाऊ जेवायला... माझ्याकडून तुला पार्टी...
संजीवनीः (खुश होऊन) ओके. चल, तू पण फ्रेश होऊन ये. मी तुझा स्पेशल ब्लॅक टी घेऊन येते.
मल्हारः ओके. आण लवकर मग.
ती किचन मध्ये जाते त्याचा आवडता ब्लॅक टी विथ लेमन बनवायला आणि तो फ्रेश व्हायला... फ्रेश होऊन तो तयार होऊनच बाहेर येतो.. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहते... मस्त रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन मधला ड्रेस अप, चेहऱ्यावर वेगळाच फ्रेशनेस आणि नेहमीसारखाच हँडसम????????... त्याने चुटकी वाजविली, तशी ती भानावर आली आणि स्वतःच लाजतच डोक्यावर हात मारत तयार व्हायला गेली. हा मस्त गॅलरीत जाऊन चहा एंजॉय करत बसला. त्याने एक कॉल केला . तशी थोड्या वेळात ती तयार होऊन आली. तोही तिच्याकडे पाहतच राहिला.... मस्त रेड कलरचा वन पीस, केस कर्ली केलेले, हलकासा मेकअप... खूप सुंदर दिसत होती ती! अगदी नवयौवना????????! दोघं मस्त एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून निघाले. आज तो स्वतः गाडी चालवत होता. गाडीत लावलेली आशा - किशोर ची गाणी ऐकत गाडी एका आलीशान हॉटेल समोर उभी राहिली, तसे तिथल्या गार्डने दरवाजा उघडला आणि दोघं आत गेले... तसं ते समोरचं डेकोरेशन पाहून ती पहातच राहिली... मंद सुगंध सगळीकडे दरवळत होता.... जागोजागी फुगे लावलेले होते.... मंद लाइट्स... टेबल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला... ठिकठिकाणी टेबलवर लावलेल्या कॅन्डल्स आणि सोबतीला मागे हळू आवाजात सुरू असलेलं संगीत... मेणबत्तीच्या प्रकाशात फक्त दोघांचे चेहरे उजळून निघाले होते... अगदी रोमँटिक वातावरण होतं... ती हे सर्व पाहून हरखून गेली आणि तिचे डोळे पाणावले... तिच्या डोळ्यात पाणी पाहून तो काय ते समजून गेला. त्याने अलगत तिचे अश्रू टिपले आणि...
मल्हारः आज मी तुला वचन देतो की यापुढे कधीही तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही... आयुष्यभर तुझी साथ देईन, अगदी मरणापर्यंत!
तो गुडघ्यावर बसला आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटात अंगठी घातली आणि तिच्या हाताला कीस केला. तशी ती पण बावरली... खाली वाकुन तिने त्याला हात देऊन उठवलं आणि झटकन त्याच्या मिठीत गेली. तो पण तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत होता... त्याने पण ती मिठी आणखी घट्ट केली. मग दोघांनीही जेवणाचा आस्वाद घेतला... आजची त्यांची ही पहिलीच डेट एन्जॉय करून ते घरी परतले ????...
....... क्रमशः
दीप????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा