Oct 24, 2021
कथामालिका

खजिना

Read Later
खजिना

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

खजिना शोधण्यासाठी म्हणून वाट वाकडी करून एका गावात शिरलो,
सापडलेल्या त्या नकाशावरून गावाला पोहचेपर्यंत फार उशीर झालेला, त्याच गावात कुठेतरी वस्ती करावी म्हणून एका आजीबाईंकडे राहायचा विचार केला.

एक साधारण गावाकडील ते टीपीकल कौलारू घर, बाहेर एक मोठं नारळाचं झाड, उजव्या बाजूला परसदारी तुळस, आणि कंबरेतून वाकलेली आजीबाई!

"आजी, आज एका रात्रीपुरत इथं राहिलं, तर चालेल का?" तुळशीसमोर दिवा लावणाऱ्या आजी ला विचारलं. 
माझ्याकडे एक साधारण अनोळखी कटाक्ष टाकत बोलली, "कुठून आला रे लेका?"
"सिंगेवाडीतून निघालो बघा, रात्र झाली म्हणून म्हणलं इथंच मुक्काम करावा"
"जायचंय कुठं मग तुला?"
"नाही, इथंच ह्याच गावात काम ए माझं, आटोपलं की लगेच निघेल!" मी सॅक खाली ठेवत म्हणालो.
घश्याला पडलेली कोरड आणि दिवसभर चालून थकून गेलेले पाय, त्या आजीला माझ्याविषयी जरा जास्तच माहिती देत होते.

"ये, तोंड हात पाय धु, आणि जेवायला बस. तोपर्यंत मी आणखी एक भाकरी करते." असं म्हणत आजी आत गेली सुद्धा. 
मीही मग जास्ती प्रश्न न विचारता, माझं सगळं आवरलं, दिवसभर चालून पाय फार थकून गेले होते, लागलीच जेवायला बसलो आजीसोबत.

"तू खोटं का बरं बोलला?" आजीनं शांत आवाजात विचारलं.
मला ठसका लागला, अचानकपणे आलेल्या प्रश्नांनं जरा अडचण झाली माझी. पण आजी कशाबद्दल बोलत होती, ह्याची काही एक कल्पना नव्हती मला. 

मी शहरात राहतो, इतिहासाचा प्राध्यापक आहे, एके दिवशी एक नकाशा चुकून हाती लागला आणि तिथे जाऊन खजिना मिळवायचाच, म्हणून लगेच बाहेर पडलेलो, इकडे कुणाला शंका येऊ नये म्हणून, तो शहरी टोन बदलून बोलत होतो, आता ह्यातलं नक्की आजीला काय सांगायचं, कळत नव्हतं मला.

"खजिना शोधायला आला का रे?" आजी चा पुढचा प्रश्न माझ्या डोक्यातून आरपार आवाज करत गेला, ह्यांना कसं कळालं?

To be continued...

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Aditya Sadashiv Mali

Student

पावसात मारताना बघितलंय अनेक लेखकांना, त्यामुळे लिहीत असावा मीही!