*ध्येयवेडा संघर्ष...(Biopic Of Queen )*भाग 3

...सगळ संपल काहिच राहिल नाहिये,माझी स्वप्न,माझ करियर,माझ्या ईच्छा काहिच मोल नाही का या सगळ्याला.की माझीच किंमत नाहिये इथे कोणाला अश्या अनेक प्रश्नाच ओझ मनात ठेऊन मयुरी बेड वर आडवी पडली....
मयुरी ला दहावी मध्ये चांगले गुण मिळाले त्या मुळे ती भलतीच खुष होती.पप्पा तर एकदम हवेतच होते.शेवटी त्यांची कन्या आज चांगल्या मार्क ने परिक्षे मध्ये यशस्वी झाली होती.त्याना सुद्धा खुप आनंद झाला..
मयुरी च्या पप्पांनी तर सर्वाना पेढे वाटले आणी कौतुकाने सगळ्याना सांगितल की माझी गुड्डूने परिक्षेत छान गुण मिळवले.
तिच्या यशाचा आनंद तर सर्वाना झाला शिवाय तिच्या आईच्या!
आणी ही गोष्ट मयुरिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.पण तरीहि उगाच खोटी आशा मनात होती की कुठे तरी आईच मन बदलेल.तिला वाटलेल की आता तरी आईला कौतुक वाटेल माझ.माझ्या शिक्षणाचा तिला त्रास नसेल आणी सपोर्ट करेल...पण म्हणतात ना जे नशीबात वाढून ठेवलय त्याला सामोर जायला दोन हात करावे लागतातच....
असेच दिवस जात होते.मयुरी तिच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत होती पण नियतीला ते काही मान्य नव्हते तिचा संघर्ष अगदी मानगुटिवर बसला होता तिच्या....
काही दिवसा नंतर मयुरिच्या नातेवाईकांमध्ये कोणाच तरी लग्न होत आणी कधी कुठे मयुरी जात नाही म्हणून आईने तिचा पिच्छा केला होता की तू कधीच कुठे जात नाहीस तर माझ्या साठी या लग्नाला तू चल....
आईला नाही म्हणायला तिला काही कारणच नव्हत मग तिने जास्त विचार न करता जाण्याचा निर्णय घेतला..
मुळातच निसर्गतः सौंदर्य बहाल असणारी मयुरी आता वयात आली होती आणी तिच रुप अगदीच खुललं होत,खुपच छान दिसत होती.अगदी कुणी पाहील तर एका नजरेत तिला पसंद करेल अशी दिसत होती.

अश्या लग्नात मयुरी पहिल्यांदा आली होती त्यामूळे ती जास्त कोणाशी ओळख नसल्याने शांत शांत होती आणी तो कार्यक्रम एन्जॉय करत होती..
आईच्या नात्यातन लग्न असल्याने तिच्या तर गप्पाच चालू होत्या ती तिच्याच नादात होती..

तेव्हा मयुरिच्या एक गोष्ट लक्षात आली..2 मुली आणी 1 मुलगा सारख तिच्या कडेच बघत आहेत आणी काहितरी बोलत आहे. मध्येच त्या मुली वाकुन मयुरी ला बघत होत्या आणी तो मुलगा हळुच गालात हसत होता..समजदार मयुरी ला या गोष्टी काही लक्षात आल्या नाही बर का...!
मयुरी ने नंतर त्यांच्या कडे दुर्लक्ष केल.. पुन्हा पाहिलं तर ते तिघे तिथे नव्हतेच आणि तिला मागून आवाज आला तिने मागे वळून पाहिलं तेव्हा जरा शॉक मध्ये त्यांच्याकडे बघत होती कारण आवाज देणारी मुलगी त्या तीन पैकी एक जण होती.
मयुरी उसने अवसान आणत चेहऱ्यावर स्माईल केलं आणि त्या मुलीने बोलायला सुरुवात केली.

...हाय कशी आहेस ?तुझं नाव काय आहे ?

मयुरी जरा विचारातच पडली.
पन लगेच तिने हसतच उत्तर दिलं मयुरी.
तिचं नाव ऐकताच त्या मुलाच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली हे मयुरी ने नोटीस केले पण तेव्हा सुद्धा तिने दुर्लक्ष केले.
त्यानंतर त्या दोन मुली मयुरी सोबत थोडसं बोलून तिथून निघून गेल्या बराच वेळ गेल्यानंतर मयुरीचा डोक्यातून पण तो विषय बाजूला पडला नंतर जेवण झाल्यावर मयुरी आईला शोधत होती तेव्हा तिला त्या दोन मुली आणि तो मुलगा तिच्या आईसोबत काहीतरी बोलताना दिसले पण नात्यातून ओळख असल्यामुळे आणि मगाशी त्यांच्यासोबत ओळख झाल्यामुळे मयुरी त्यांना जॉईन झाली. मयुरी त्यांच्याकडे येतीये हे जाणवताच त्यांनी विषय बदलला असं उगाच मयुरीला वाटलं.
पन आईच्या चेहर्‍यावर मात्र आनंद ओसंडून वाहत होता हे मयुरीच्या नजरेतून काही सुटलं नाही घडलेला सगळा
प्रसंग आठवत मयुरी तिच्या आईसोबत घरी पोहोचली...

लग्ना नंतर घरी आल्यापासून आई वेगळीच वागत होती हे मयुरी च्या लक्षात आल होत.पन ती आईच्या तोंडून तिच्या आनंदाच कारण ऐकायला आतुर झाली होती....
पन आई काही सांगत नाही म्हणून तिने आईला विचारल शेवटी..
काय ग आई तू तिकडून आल्या पासून खुपच खुश दिसतीये..काय झालय काय नक्की?

मयुरीला अंदाज नव्हता की आई काय सांगेल..पन आईच्या आनंदाला काहितरी कारण आहे याचा विचार करुनच ती खुष होती.विचार करतच होती तर आईने सांगायला सुरुवात केली.

तू आता मोठी झालीये तर मी तुझ्या साठी एक मुलगा पाहिला आहे तू त्याला एकदा बघुन घे आणी तुझा होकार कळव...!!

मयुरी आईचे बोलन ऐकूण एकदम तिच्याकडे शॉक लागल्या सारखी बघत होती..तिला अस काहितरी आई बोलेल याचा थोडा सुद्धा अंदाज नव्हता.
एका जागेवर स्तब्ध उभी होती..मनाची चलबीचल कोणाला सांगू आणी कोणाला नको अस तिला झाल होत.
थोड्याच दिवसापूर्वी जी मुलगी उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत होती तिला तिचे भविष्य काहीच नाही आता...
सगळ संपल काहिच राहिल नाहिये,माझी स्वप्न,माझ करियर,माझ्या ईच्छा काहिच मोल नाही का या सगळ्याला.की माझीच किंमत नाहिये इथे कोणाला अश्या अनेक प्रश्नाच ओझ मनात ठेऊन मयुरी बेड वर आडवी पडली....
डोळ्यातून पाणी जे चालू झाल होत ते काही केल्या थांबायच नाव काही घेत नव्हत.आणी आईचे शब्द आठवून तिच मन तिच्या डोळ्यातील अश्रुंना साथ देत होत...

रात्री विचार करुन आणी रडून डोळे एकदम सुजले होते.झोप कधी लागली तिला हे देखील समजल नाही..
झोपेतून उठताच तिच्या लक्षात आल की मी रात्री जेवण न करताच झोपले होते आणी मला आवाज द्यायला देखील कुणीच नाही आल. ती मनातच विचार करत दुखी होत उठली.
बाकी सगळे जाऊदे पण किमान पप्पा तरी ,त्यानी तरी उठवायला यायच होत ना मला.

ईतक्या लहान वयात इवल्याश्या त्या मनावर किती ते आघात होत होते.पण आपली हिरॉईन काय हार मानणाऱ्या मधली नाही..
फ्रेश होऊन खाली नाश्ता करायला आले तेव्हाच समोरच तिला पप्पा दिसले पप्पानी हसतच तिला गुड मोर्निंग विश केलं. ती पप्पांची इतकी लाडकी होती तिला पप्पांना नाराज करता येत नव्हत म्हणून तिने पण हसून त्यांना गुड मॉर्निंग बोलली.आणि मग गप्पा चालू झाल्या तिच्या पप्पांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विचारलं गुड्डू रात्री तू जेवण करायला आली नाहीस खाली तब्येत ठीक आहे ना? तुझी आई सांगत होती की तिला बरं नाहीये म्हणून तू जेवली नाही.
असं म्हणताच मयुरी नी चमकून त्यांच्याकडे एकदा आणि आईकडे एकदा पाहिलं तर आई नजर चोरतच खाली बघून नाश्ता करत होती. तेव्हा नक्की काय प्रकार आहे हे मयुरीच्या लक्षात आलं.पन आई अस का वागली याच उत्तर काय तिला मिळाल नाही..
पप्पा फक्त जेवण बद्दल बोलले याचा अर्थ आईने त्याना लग्ना बद्दल काहीच सांगितल नाही हे समजल तिला.पण त्याना न सांगता का मला तयार करतीय हा प्रश्न तिला सतावत होता..



ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत लिहिली गेली आहे काल्पनिक नाही....

राधा सुमित इंगवले
THANK YOU ?


🎭 Series Post

View all