काहुर अंतीम भाग

The untold love

   काहूर अंतिम भाग

          दिवस येत होता अन् मावळतीला जात होता, पण अनामय दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ होत होता, त्याच्या कुंचल्या चे रंग आता फिके झाले होते. त्याचा कॅनव्हास त्याला आता परका वाटत होता. आत्तापर्यंतची सारी चित्र त्याला भकास वाटत होती. नदीचा काठ, आंब्याचा पार, वडाच झाड आणि देवाचा गाभारा सुना सुना असल्यासारखा जाणवत होता. अनुला आता जाणीव अपेक्षा हवेतच राहायला आवडत होतं. खाणं-पिणं हे कमी झालं होतं, त्यामुळे तब्येतीवर जो व्हायचा तोच परिणाम झाला आणि अनु त्याच्या समाधी अवस्थेकडे ओढला गेला.

         इकडे वैजू ची तगमग केवळ काकूंना म्हणजेच अन आमच्या आईलाच कळत होती. पण अनुचा स्वभाव त्या पुरेपूर ओळखून होत्या याशिवाय शिवानंद ही म्हणजेच अनायमचे वडील वैजू ला कधीही स्वीकारणार नाहीत हेही त्या जाणून होत्या, कारण शिवानंद हे त्या गावातलं फार बडे प्रस्थ होतं, आणि वैजू चे वडील केवळ एक शाळामास्तर. अन आमच्या भावविश्वात जरी वैजयंती नव्हती तरी वैजूच्या भावविश्वाचा अनभिषिक्त सम्राट मात्र अनामयच आहे, हेही त्या जाणून होत्या.

           आणि एका रात्री अचानक अनामय चिडत ,ओरडत असल्याचं काकूला जाणवलं,"अनु! अनामय भानावर ये, अनु काय झालं रे?", अनामय काकुळतीला येऊन म्हणाला,"आई! आई मी तिच्या शिवाय जगू शकत नाही, आई मला ती हवी आहे, रज्जू, रज्जू थांब मला सोडून जाऊ नकोस!". आणि अनामय धाडकन खाली पलंगावर कोसळला. काकूही घाबऱ्या झाल्या होत्या आणि त्यांनी वैजू ला मदतीकरिता बोलावून घेतलं. वैजू ना काकूंना सांभाळलं आणि ती अनायमच्या पलंगाजवळ येऊन बसली. थंड पाण्याच्या पट्ट्या अनुच्या डोक्यावर ठेवताना एकच विचार वैजूच्या मनात होता" हे काय सुरू आहे?" "अनामय असं का करतो आहे?"

              दुसऱ्या दिवशी सकाळी काकून वैजू ला रजू बद्दल सांगितलं आणि वैजू ला काही माहिती आहे का विचारलं. पण वैजू ही अनभिज्ञ होती, काय करावं कोणालाच सुचत नव्हतं आणि आनामय तो तर या दूनीयेतच नव्हता. काकू आणि वैजू च मुक रुदन केवळ त्या घराच्या भिंतीच ऐकत होत्या, बाकी सारं शांत शांत होतं


🎭 Series Post

View all