काहुर भाग तीन

The untold love

  काहूर भाग-3

                  

                 अनामय आपल्याच भावविश्वात दंग असल्याचं बघून, वैजू ना अनुला तिच्या एम ए चाच्या रिझल्ट बद्दल सांगितलं, पण आनु ना केवळ काँग्रॅट्स म्हंटलं आणि तो त्याच्या कल्पने विषयी बोलू लागला.

                    अनु सांगत होता "वैजू माझी चित्र म्हणजे केवळ लाल काााळळ्या या रेघोट्या नाहीत, ह्या माझ्या भावना आहेत. माझी स्वप्न, माझ्या इच्छा, आशा-आकांक्षा, साधना, तपस्या आहेत ही चित्र." "वैजू हे रंग केवळ कुंचल्यानं असे रंग नाहीत त्यांना गंध आहे माझ्या परिश्रमाचा , त्यांना स्पर्श आहे माझ्या प्रेमाचा, आणि या रंगांमध्ये दडलेला अपूर्ण, अस्वस्थ, अशांत, अनाथ, केविलवाणा मी." "वैजू ज्या दिवशी माझी प्रिया, माझी सखी, माझी प्रेरणा ,मला मिळेल ना त्या दिवशी माझी ही तगमग थांबल." "वैजू ती कुठे लपून बसली आहे कोणास ठाऊक ?पण माझी प्रिया माझ्यावर रुसली हे खरं"

               अनु ची सखी आपण नाही हे ऐकून वैजू एक क्षण बधिर झाली, तिच्या मनाला एक क्षण वाटून गेलं की, आत्तापर्यंत तिला जे वाटत होतं ते सारं त्या नदीतल्या तरंगांचा सारखं- आपल्यापासून दूर जाणार! ह्या विचाराने वैजूच्या अंगावर सर्रकन एकदम काटाच आला ,पण आता आपण काय करणार ?अनामय च्या भावविश्वात आपल्याला जागा नाही , आणि आपण तर आपलं सारं विश्वच त्याला मानलं,"देवा हा तुझा कुठला न्याय? काय करू मी?"असे एक ना अनेक विचार वैजूच्या डोक्यामध्ये थैमान घालत होते, आणायचं आपल्यावर प्रेम नाही हे मान्य करायला वैजू च मन  तयार नव्हतच. पण आता फार उशिर झाला होता कारण अनु, वैजू पासून दूर गेला होता मनाने, भावनेने ,आणि प्रेमाने ही.

                दुसऱ्या दिवशी दुपारी बारा साडेबाराला अनु वैजू कडे आला ,वैजू स्वयंपाकच करत होती. पण अनु तिला तसाच ओढत ओढत आपल्या रेघा -रंगांच्या दुनियेत घेऊन आला ,आणि त्याने रेखाटलेलं एक चित्र वैजुला दाखवलं आणि विचारलं "या चित्रात काहीतरी कमतरता आहे पण मला कळतच नाही ! सांग बरं जरा कोणती उणीव आहे ती". वैजू त्याच्या चित्राचे वर्णन करत होती, प्रत्येक गोष्ट बारीकसारीक तपशिलात सांगत होती आणि एकदम तिला उणीव कळली, ती म्हणाली"अनु या चित्रात नदी किनाऱ्यावर ची नाव एकटीच उभी आहे जर त्यासोबत एखाद्या व्यक्तीला रेखाटता आलं तर बघ"अनामय चमत्कारिक नजरेने वैजु कडे बघत होता आणि एकदम त्याला वाटलं की, "अरेच्या खरंच"!


🎭 Series Post

View all