Feb 24, 2024
कथामालिका

काहुर भाग दोन

Read Later
काहुर भाग दोन

   काहूर भाग-2

         

          अनामय ची चिडचिड आईला नवीन नव्हती पण आज काय झालं असेल या चा तिला काहीच अंदाज येत नव्हता. अनाम यायचं असं आदळाआपट करणं, वैजू चे न बोलता निघून जाणं, आज सारंच विलक्षण होतं. मग थोड्या वेळाने आईने हळूच कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, पण सगळंच व्यर्थ तिला काहीच कळेना. अशावेळी आईला वैजू ची फार मदत व्हायची आणि जणू एकदम काहीतरी सुचल्यासारखं करून आई अनामयला म्हणाली,"अरे आज वैजू ला तू काय भेटवस्तू देणार आहेस?""मी का म्हणून उगाच तिला काही गिफ्ट देऊ?, असा काय पराक्रम केलाय तिने?"अन आनामयच्या या अनपेक्षित बोलण्याने काकूंना सगळा उलगडा झाला, म्हणजे वैजून अजूनही तिचा एम .ए .चा रिझल्ट अनामयला सांगितला नव्हता. अनामय

ला काहीतरी सांगावं म्हणून काकू त्याच्याशी बोलणार एवढ्यात ,अनामय तिथून निघूनही गेला, अनामय कुठे गेला याचा काकूंना अंदाज होताच. अनामयला वैजू कडं पाठवण्याची काकूची मात्रा बरोबर लागू पडली होती.

               वैजू च्या घरी गेल्यावर अनामयला परत रागाला आवर घालावी लागली कारण वैजु गेली होती नदीजवळच्या कातळावर. नदीतीरावर वैजू "भाकऱ्या"खेळण्यात दंगली होती अनामयही तिथे आला आणि वैजू ला सोबत म्हणून एक दगड त्यानेही नदीत टाकला, त्यामुळे वैजूच चटकन  आनामयच्या कडे लक्ष गेले."अरे अनामय तू इथं?","का मी येऊ शकत नाही इथं"."नाही तसं काही नाही, बरं चल घरी जाऊया"."का ग बस ना जरा इथंच, मनाला प्रसन्न वाटते आहे, आणि नदीत दगड फेकण्याचा खेळ तर छानच, मला तर मस्त मज्जा आली बुवा"."अनामय तू सारेच विसरलास"-वैजू मनाशीच म्हणाली.

                 "वैजू, पाण्यात निर्माण होणारे आणि मग दूर दूर जात पाण्यातच अदृश्य होणारे हे तरंग, आपल्याला भेटणाऱ्या माणसांसारखेच असतात नाही, एकदम हृदयाच्या जवळ असणारी माणसं काळ आपल्यापासून कशीही राहून येतो ते आपल्याला कळतच नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो". अनुज हे असं बोलणं वैजू ला नवीनच वाटत होतं पण तिने पुस्तकात वाचलं होतं की कलाकार माणसं तत्त्वज्ञान ही असतात आणि जरा विक्षिप्त ही. वैजू ना आणा मायला हळूच मावळतीच्या सूर्याचं पश्चिम क्षितिजावर खरं पोर्ट्रेट दाखवलं आणि दोघही घरची वाट चालू लागले.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//