Feb 24, 2024
माहितीपूर्ण

The Honey Bees

Read Later
The Honey Bees

             "मधमाशा नष्ट झाल्या तर केवळ चार वर्षात मानव सृष्टीच नष्ट होईल"........सर अल्बर्ट आईन्स्टाईन.


                मानवाला सर्वात प्रथम माहित असलेला गोड पदार्थ म्हणजे "मध"  होय. इजिप्त व चीन या देशातून \"मध\" व \"मेणासाठी\"  दोन हजार वर्षापूर्वी मधमाशा पाळल्याचे उल्लेख आहेत.

              मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील गुफा चित्रांपासून ते ऋग्वेद, आयुर्वेद, उपनिषदे यामध्ये मध व मधमाशांचे उल्लेख आढळतात. संपूर्ण जगात मधमाशांच्या 25 हजार प्रजाती अस्तित्वात आहेत.

              मधमाश्यांना फुलांचा लाल रंग ओळखता येत नाही त्यांना तो काळ्या रंगाप्रमाणे भासतो.

                 मधमाशी एका फेरीत 100 ते 150 फुलांना भेट देऊन पंचवीस ते पस्तीस मिलिग्रॅम मकरंद व पराग आणते.

                  मधाचा रंग हा , ज्या झाडाच्या फुलांपासून मकरंद गोळा केलेला असतो,  त्यावर अवलंबून असतो . हलक्या सोनेरी रंगां पासून ते गर्द सोनेरी रंगांच्या छटा मधात आढळतात.

                परागीभवनासाठी पोळ्यात दोन प्रकारच्या माशा असाव्या लागतात. \"राणी माशी\" आणि दुसरी \"कामकरी माशी\" . कामकरी माशी चे आणखीन चार उपप्रकार पडतात ते म्हणजे \"दाई माशी\" , \"संरक्षक माशी\",  \"बांधकाम माशी\" व साफसफाई करणारी माशी. 

(१ )  राणी माशी चे सरासरी आयुष्य हे तीन वर्षे इतके असते.

(२) कामकरी माशी चे आयुष्य तीन ते सहा महिने इतके असते.

(३) राणीमाशी दिवसाला पंधराशे ते दोन हजार अंडी घालते.

(४) काम करी माशा फुलातील मकरंद गोळा करण्याचे काम करतात.

(५) कामकरी मधमाशीच्या पायावर असलेल्या पराग पिशवीमध्ये परागकण साठवून , पोळ्यामध्ये आणले जातात . आणि ते \"परागकण\"अंड्या मधून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात.

           डॉक्टर \"बटलर\" या शास्त्रज्ञाने 1953 मध्ये सर्वप्रथम \"राणी स्त्राव\" पदार्थाचा शोध लावला. राणीमाशीच्या डोक्यातील ग्रंथींतून निघणाऱ्या \"राणी स्त्राव\" या पदार्थामुळे सर्व कामकरी माशा एकत्रित राहून सुसूत्र पद्धतीने काम करतात. या विशिष्ट गंधामुळे कामकरी माशा आपले पोळे शोधतात. एका पोळ्यातील माशी दुसऱ्या पोळ्यात गेल्यावर मारली जाते.

          मधमाशांच्या अर्थगर्भ नृत्याबद्दल सर्वप्रथम असं  1788 मध्ये \"स्पिट्झनर\" संशोधकाने मधमाशांच्या इतर मधमाशांना माहिती देण्याचा हा नृत्याचा प्रकार असल्याचे म्हटले.

             परंतु नंतर 1920 सालापासून \"फॉन फ्रिश\" या जर्मन शास्त्रज्ञाने खूप संशोधन करून 1945 साली यासंबंधी नृत्याचा अर्थ लावण्यात यश मिळविले . त्यांना या त्यांच्या संशोधनाबद्दल 1975 सालचे नोबेल पारितोषिकही मिळाले आहे.

         नृत्य करणाऱ्या मधमाशा त्यांनी गोळा केलेले मकरंदाचे काही कण मृत्य करता करता आपल्या वसाहतीतील सहकारी मधमाशांना देतात . या मकरंद आत असलेल्या वासामुळे सूर्याशी विशिष्ट कोन करून व अंतराचा अंदाज घेऊन निघालेल्या कामकरी माशा फुललेल्या झाडावर अथवा पिकांवर विनासायास येऊन पोहोचतात. ज्यावेळी मधमाशा पाणी गोळा करतात तेव्हा असा वास त्यांना देता येत नाही .तेव्हा आपल्या वास ग्रंथीमधून (नोसोनाव्ह ग्रंथी) हलकासा फवारा त्या पाणी असलेल्या जागी मारतात ,व हा फवारा पेटीतील मधमाशांना पाण्यातून मिळतो व त्या पाणी असलेल्या जागेवर बिनचूक पोहोचतात.


        मधाचे सेवन असे करावे

१. कोमट पाणी एक ग्लास ,अर्धा लिंबू ,तीस ग्राम मध सकाळी व रात्री सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

२. पाच ग्रॅम मध , पाच ग्रॅम तूप यांचं चाटण करून तोंड आलेल्या व्यक्तीस दिल्यास फायदा होतो.

३. एक कप दूध , 30 ग्रॅम मध एकत्र सेवन केल्यास रक्त वाढीस मदत होते.

४. नुसते मध सेवन केल्यास खोकला , सर्दी , पडसे कमी करण्यास उपयुक्त आहे.

         मधू सेवन करण्याचे प्रमाण

१. लहान मुले पाच ते दहा ग्रॅम मधु दिवसातून दोन वेळा.

२. तरुण व्यक्ती 30 ग्रॅम मध दिवसातून दोन वेळा.

३. वयस्क मंडळी 20 ग्रॅम मध दिवसातून दोन वेळा.

                    शुद्ध मध ओळखण्यासाठी , ? मध खाल्ल्यानंतर जवळपास पंधरा सेकंदानंतर तोंडातील गोडी नष्ट होते ,असा मध अस्सल आहे असे समजावे. या टेस्ट ला अॅरोमा टेस्ट असे म्हणतात. मध हा गोड नसून मधुर आहे.(मंडळी तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि आपली मतं आणि अभिप्राय नक्की सुचवा)


     

      


(सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//