शैलपुत्री हे नवदुर्गा किंवा देवीच्या नऊ रूपांपैकी प्रथम स्वरूप आहे आणि नवरात्रीच्या उत्सवात पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. शैलपुत्री मातेला देवी पार्वती , भगवान शिवाची पत्नी , गणेश आणि कार्तिकेयची आई,सती म्हणूनही ओळखले जाते . नंदी या बैलावर स्वार होत असताना देवीच्या कपाळावर अर्धाचंद्र, उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ असते.
शैलपुत्री देवीचं अनन्यसाधारण महत्व म्हणजे तिला निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा खूप मानले जाते .. पहिल्या दिवसाचे औचित्य साधून मला ही पहिली माळ आशा एका स्त्री स्वरूपाला अर्पण करावी वाटतेय ती म्हणजे वंदना शिवा.. आपल्यापैकी बहुतांश लोकांनी हे नाव ऐकलं असेलच .. उत्तर प्रदेशात डेहराडून या गावात जन्माला आलेली ही महिला आज साता समुद्रापार जाऊन जगप्रसिद्ध बिल गेट्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना बेधडक विरोध करत आहे ,तिचं म्हणणं एकच आहे की नैसर्गिक संपत्तीचा विनाश होता कामा नये आणि केमिकल विरहित बियाणे शेतीसाठी वापरण्यात यावी.. यावर तिचा खूप अभ्यास आहे ,आज तिच्यामुळे कित्येक मुलींना बळ मिळतंय या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी..माझी मनापासून वंदना शैलपुत्री स्वरूप मातेला ???
पहिली माळ ही जणू आईची नाळ
तुटली तरी पुत्र प्रेमापोटी जुळून राहते
नसली तरी आजन्म टिकून राहते ❤️
तुटली तरी पुत्र प्रेमापोटी जुळून राहते
नसली तरी आजन्म टिकून राहते ❤️
?जागर नवरात्रीचा देवीच्या नऊ रुपांचा ⚔️