द सिक्रेट मिशन भाग -4

रहस्यकथा - द सिक्रेट मिशन.

द सिक्रेट मिशन.

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

[आधीच्या भागात आपण पाहिले की

मंदिराच्या पूजाऱ्याची भेट घेऊन मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचे धनेश ठरवतो.मागील सर्व मिसिंग केसेसच्या अधिक तपासासाठी मांडके व इतर स्टाफवर जवाबदारी सोपवली. चहाची टपरी चालवणारा जुम्मन बहिणीची मिसिंग कम्प्लेंट घेऊन पो.स्टेशन मधे आला.]

आता पूढे…….

धनेश जगदाळेंना सोबत घेऊन लगेच पाणवठ्याकडे गेला जिथे जुम्मनची बहिण पाण्यासाठी गेली होती.

पाण्याच्या ओढ्यावर दूर एक मटका अडकल्याचे दिसत होते.काही लोकांना पाण्यात उतरवुन तो मटका ताब्यात घेतला.धनेशने जुम्मन करवी तो मटका त्याच्याच घरचा आहे ह्याची खात्री केली.म्हणजे जुम्मनच्या बहिणीचे अपहरण झाले असावे ही तर खात्री पटली पण असे कोण करेल? ह्या मागे कुणाचा हात असेल ह्यावर विचार सुरू झाला.

धनेशने अजून कसुन तपास करत असताना एक ओढणीचा फाटका तुकडा सापडला.तो पाहताच जुम्मन जोरजोराने गळा काढत " ये दुपट्टा सईदा का मेरी बहन का ही है साब। " म्हणत रडायला लागला.

त्यांनी दोन्ही गोष्टी जप्त करून पोलिस स्टेशनवर जमा केल्या.

धनेशने जुम्मनला चौकशीसाठी बोलवून घेतले,

" मला खरे खरे सांग सईदाचे बाहेर काही प्रकरण चालू होते का?"

"नही साब,बडी शरीफ बच्ची थी मेरी बहन।"

" फिर तुम्हारा किसी से कुछ झगडा,मारपीट हुँई है? "

धनेशने चौकशीस्वरूप प्रश्न विचारला.

"साहब,किसी से भी पुँछ लो गाँव मे मै मेरे काम से काम रखता हुँ। इतने सालो मे कभी मेरी किसीसे कोई लडाई झगडा नही हुँआ। हम दोनो भी अपने काम से काम रखते थे।"

किसी रीश्तेदार से कोई अनबन,या फिर कोई सईदा को इकतर्फा प्यार करता हो शायद उसने बताया ना हो।

ह्यावर जुम्मन विचार करत म्हणाला," अब कोई अकेले मे सईदा को पसंद करता हो तो वो तो मै नही जानता साहब लेकिन मुझे नही लगता ऐसी कोई भी बात होगी।

ठिक है,अभी तुम जाओ। हम कुछ पता चला तो तुम्हे खबर करेंगे।

धनेशने लगेच जगदाळे आणि कदमला आेढ्याकडचा सगळा परीसर पिंजून काढायला सांगितले.त्यांना खात्री होती नक्की काहीतरी धागा दोरा मिळेल.

धनेशच्या विचारांचा गूंता वाढत चालला होता.तो बुरखेधारी मनुष्य कोण ? हे ही अजून समजत नव्हते.फाईल मधल्या मिसिंग केसेसचे रहस्य अजुनही उलगडत नव्हते त्यात ही नविन केस उद्भवल्याने धनेशचे डोके बधीर व्हायची वेळ आली

      ~~~~~~~~~~~~~~~~~

आधीच्या मिसिंग केसमधील सर्व संबंधीतांची एक लिस्ट करून धनेशने ती मांडकेंच्या हातात देत म्हणाला," मांडके साहेब ह्या केसेस मधल्या नातेवाईकांशी भेटून पून्हा एकदा चौकशी करा.काही माहिती मिळतीय का बघा."

आता 'घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं' तशी गत झालीय.'इथ आधीच व्याप काय कमी आहेत त्यात ह्याला नव्याने जूनी खरकटी काढायची काय हौस आलीय काय माहित.??? ' मनातल्या मनात पुटपुटत वैतागातच मांडकेंनी लिस्ट घेतली आणि वाघमारे सोबत कामाला निघुन गेले.

तेवढ्यात जगदाळेंचा फोन आला.

"साहेब,नदिवर पाहणी करत असताना एक विचित्र गोष्ट नजरेत पडलीय.तुम्ही जरा तातडीने येता का इकडे?"

जगदाळेंचे बोलणे ऐकुन धनेश घाईघाईनेच ओढ्याकडे गेला.

नदीचे पात्र दोन भागात विभाजीत होऊन जो लहान आेढ्यासारखा भाग होता तिकडे सईदा पाण्याला आली होती.मुख्य पात्र बरेच विस्तिर्ण होते.आेढ्याच्या आसपास बरीच रानटी झाडीझुपटी उगवल्याने ती जमीन पूर्णपणे रान झाडाने अच्छादलेली होती.

धनेश लगेच घटनास्थळी पोहोचला.धनेशला पाहताच जगदाळे धावतच त्याच्या जवळ येऊन कानात कुजबुजला.तसे धनेशने कदमला इशारा करून जवळ बोलावले आणि पो.स्टेशनमधे कोणीच नाहीये.तिकडे जाऊन थांबायचा आदेश दिला.कदमलाही त्या काट्याकुट्यात पाय तुडवायचे जीवावरच आले होते.पडत्या फळाची आज्ञा घेत तो लगेच पो.स्टेशनकडे निघाला.

कदम तिकडून जाताच जगदाळेंनी धनेषला एक ठिकाणी नेले.

ते एक दगडी पूर्वीच्या रचनेसारखे बांधणी असलेले पाणी जाऊन नदिला मिळणारे तोंड होते.पण त्याचे मूख नक्की कुठे जुळलेय हे कळत नव्हते.

जगदाळेंना तिकडे पांढरा द्रव साचल्यासारखा दिसला म्हणुन त्यांनी ती बाब धनेशला दाखवण्यासाठी बोलावले होते.धनेशने त्याचे थोडे सँम्पल एका पाऊच मधे गोळा करून ते ताबडतोब लॅबला चेक करायला पाठवण्याची व्यवस्था केली.

जगदाळेंकडून त्यांना त्या चेहरा झाकलेल्या व्यक्ती विषयी अजुन एक सनसनाटी माहिती मिळाली होती.

धनेशच्या डोक्यात काही धागे दोरे जुळायला लागले तसे त्याचा चेहरा प्रसन्न झाला.इतक्यात ही बाब कुठेही फूटु द्यायची नाही असे जगदाळेंना बजावून दोघेही पून्हा पोलिस स्टेशनला परत आले.

एव्हाना सायंकाळ होऊन सूर्याची लालीमा आसमंतावर पसरली होती.हळुहळु अंधार पडायला सुरवात झाली.टेबलवरच्या फायलींचा पसारा आवरून धनेश जगदाळेंसह पो.स्टेशन बाहेर पडला.

तितक्यात त्याला आठवले.तसे तो जगदाळेंना उद्देशुन म्हणाला," जगदाळे उद्या पहाटे लवकर उठायचेय आपल्याला.लक्षात आहे ना? "

जगदाळेंच्या लक्षात नाही आले तसे त्यांनी प्रश्नार्थक नजरेने धनेशकडे गाडीच्या मिररमधुनच बघितले.

धनेशने स्मित करत लगेच सांगितले," अहो घाबरू नका.कुठेही कामगिरीवर नाही पाठवत आहे तुम्हाला.मी काल बोललो नव्हतो का मंदिराचा पूजारी येतो ती वेळ साधुन मंदिरात जाऊ.आता त्याची वेळ कुठे माहितीय आपल्याला म्हणुन आपण त्या आधी मंदिरात

जाऊन लपून बसू.म्हणजे तो आला की आपल्याला त्याच्याशी बोलता येईल.काय आले का ध्यानात? "

जगदाळेंनी समजूतीची मान हलवतच घराकडे पोहोचले.

    ~~~~~~~~~~~~~~~~~

घरात प्रवेश करताच धनेशची नजर अंगणात अभ्यास करणाऱ्या दूर्वावर पडली.नकळत काळजात चमक उठली.का कुणास ठाऊक धनेशला दूर्वा मनोमन आवडून गेली होती.अत्यंत साधी रहाणी. घरातली सर्व कामे संभाळुन तन्मयतेने अभ्यासासाठी तिची मेहनत पाहून धनेशला खूप कौतुक वाटले.पण हे सर्व मनातच.त्यांना येताना पाहून दूर्वाने आपला पुस्तक वह्यांचा पसारा उचलुन लगबगीने आत पळाली.

ते येताच त्यांना पटकन पाणी आणून दिले.पाणी देताना धनेशची नजरानजर झाली तसे तिने लगेच आपली मान फिरवली आणि खाल मानेनेच रीकामे ग्लास घेऊन आत परतली.

    ~~~~~~~~~~~~~~~~

जेवणे उरकुन धनेश सिगारेट ओढायला घराच्या मागच्या अंगणात गेला तर तिकडून किचनचा दरवाजा दिसत होता जिकडे बसुन दूर्वा आईसोबत भांडे घासत होती.धनेश तिच्याकडे दूरूनच बघत असताना तिचीही नजर धनेशकडे गेली.तिला आपण तिला चोरून बघतोय हे लक्षात येताच धनेशने गडबडीने नजर इकडे तिकडे फिरवली तसे दूर्वाने हलकेसे स्माईल करत पून्हा काम करू लागली.धनेशला खूप कसेतरी वाटत होते." काय वाटेल तिला की आपण तिला एकट्यात चोरून न्याहाळत होतो.तिने ही गोष्ट कुणाजवळ सांगितली तर काय होईल..? " 

संधी मिळेल तेव्हा ह्याबाबतीतला गैरसमज तिच्याशी बोलून नक्की दूर करू असे मनोमन ठरवतच तो जिना चढून वर गेला.

जगदाळेंच्या मस्त पाहुणचाराने आता देह सुस्तावला होता.

सकाळी तीन वाजताचा अलार्म लावून धनेश अंथरूणावर विसावला.निद्रादेवीची आराधना करत असतानाही डोक्यातले पोलिसी विचार काही संपत नव्हते.

सावंतांची केस सोडून बाकी सर्व केसेसची चौकशी मांडके आणि वाघमारेंवर सोपवली होती.उद्या धनेश स्वत: सावंताच्या घरच्यांशी बोलणार होता.

ह्या सगळ्या मिसिंग केसचा आपापसात काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता धनेशला वाटत होती.

खरच ह्या सगळ्या घटनांचा आपापसात काही संबंध असेल? आणि असल्यास काय असेल तो समान दूवा?

बुरखाधारी व्यक्तीचे सत्य नेमके काय आहे?

त्या बुरखाधारीचा संबंध गावातल्या गैर कारवायांशी असेल का?

ओढ्याजवळच्या सांडपाण्याच्या तोंडाशी सापडलेले सँम्पल्स नेमके कशाचे असतील ???

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला पुढील भाग जरूर वाचा.

~~~~~~~~~~~~~~(क्रमश:-4)~~~~~~~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.

हा भाग कसा वाटला?हे कमेंटमधे जरूर कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका


 

🎭 Series Post

View all