द सिक्रेट मिशन भाग -17

रहस्य आणि रोमांचाने भरलेली एक सूंदर कथा द सिक्रेट मिशन.

द सिक्रेट मिशन भाग -17

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

[मागील भाग - धनेशने एनकाऊंटरची मिथ्या कथा रचून इनस्पेक्टर सावंतांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.इकडे बुरखेधाऱ्याच्या एनकाऊंटरची बातमी सगळीकडे पसरली.

आता रंगाकडून काय खबरबात मिळतेय ह्याची धनेश वाट पाहू लागला….. ]

आता पूढे……

दूसऱ्या दिवशी सगळीकडूनच धनेशला अभिनंदन आणि कौतूकाचे मेसेजेस येवू लागले.पण ह्या सगळ्यात आपले मूख्य काम मागे राहता कामा नये ह्यासाठी त्याने स्वत:च रंगाला फोन लावला.

नेहमीप्रमाणेच अगोदर अभिनंदन कौतूकाच्या हारतुऱ्यांचे सोपस्कार पार पडल्यावर मग मूख्य विषयाकडे वळत धनेशने रंगाला विचारले, " मेरा काम कहाँ तक आया रंगा…? दो दिन हुए,मूझे ये इन्फर्मेशन अर्जंटली चाहिए यार…."

त्यावर पलिकडून रंगाने जे काही सांगीतले ते धनेश कान देऊन ऐकू लागला.

त्याच्या वैज्ञानिक तर्कानूसार तो जे बोलत होता ते असे की ………….

काही ठिकाणी पूरातन काळात खूप सारा महत्त्वाचा ऐवज /खजिना कूठेतरी तळघरात लपवून ठेवला जायचा आणि त्याला अशा प्रकारची विशिष्ट रचना असलेली न दिसणारी कुलूपे तयार केली जायची त्यापैकीच हा ही प्रकार आहे. 

means people used to use scientific formulas to operate the locks of important treasures. इकडेही अशाच टेक्निकचा वापर करून हे लॉक बनवले गेले आहे. साधारणपणे प्रत्येक द्रवपदार्थाची घनता वेगवेगळी असते.इकडे दूधाचा वापर केला गेला असला तरी त्यात सोडीयम क्लोराईडच्या चिमूटभर वापराने त्याची संवाहकता बदलते आणि त्या विशिष्ट केमिकल रिअॅक्शनने कुलूप उघडले जाते हेच तत्त्व वापरले गेले असेल असा माझा अंदाज आहे कारण दूध आणि सोडीयम क्लोराईड किंवा साध्या भाषेत खायचे मीठ ह्याची रिअॅक्शन होऊन त्यात काही इलेक्ट्रोकेमिकल फिल्ड तयार होते ज्यामूळे लॉक उघडले जाते.

In scientific language if I put the theory behind this lock,its as written below...... 

(The electrical conductivity of the milk may increase due to the addition of sodium chloride that is common salt which results into opening of lock based on electrical conductivity.)

" तू ट्राय करके देख ले।अगर मेरा रिसर्च सही है तो तेरा काम 100% होना ही चाहिए ।

 गूड लक ब्रो । "

सगळे सांगून रंगाने फोन ठेवला.धनेशला आता अजूनच हुरूप आला.आज रात्रीच जगदाळेंच्या मदतीने हा प्रकार करून बघायचा त्याने निश्चय केला.सगळे ऐकून एक मात्र विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला.आपले पूर्वजही इतक्या पूराण काळात किती अभ्यासू आणि हूशार होते.आता सारखी गूगलची सोय नसूनही त्यांनी कितीतरी गोष्टींचे अभ्यासपूर्ण संशोधन केलेय.

त्या काळी अगदी घरात सहजगत्या उपलब्द्ध होणाऱ्या वस्तूंमधून एक इतके क्लिष्ट कुलूप बनवण्याची कल्पना त्यांना कशी सूचली असेल?  आणि जर खरचच शिवाजी महाराजांनी काही विशेष हेतू मनात बाळगून ह्या मंदिराची बांधणी केली असेल तर मग ह्या मंदिरा खालीही त्यांचा काही द्रव्य साठा किंवा खजिना वगैरे असू शकेल का? तसे असेल तर असा काही पूरातन खजिना मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

धनेशला ह्या नव्या विचारांनी अजूनच उत्साह निर्माण झाला.असा काही शोध लावण्यात जर आपण यशस्वी झालो तर ती आपल्यासाठी एक वेगळीच अॅचिव्हमेंट होईल.त्याच्या आत्ता पर्यंतच्या करीयरवर मानाचा तूरा खोवणारी ही केस होऊ शकणार होती त्यामूळे आता तो जास्तच उत्साहीत झाला होता.त्याला अजिबात धीर धरवत नव्हता.कधी एकदा रात्र होते आणि आपण मंदिरात जातो असे त्याला झालेले….

दिवसभराची कामे आपल्या गतीने संपत कसातरी सूर्य बूडाला.आजची रात्र धनेशसाठी फारच निर्णायक होती.रंगाने सांगितलेल्या क्लूनूसार गूप्त दरवाजा उघडण्यात यश मिळाले तर अजून बरेच सारे खूलासे होणार होते त्यामूळेच रात्र होण्याची कोण घाई झालेली त्याला.

जगदाळें सोबत तो घरी जायची तयारी करतच होता एवढ्यात रंगाचा फोन आला.आजूबाजूला कोणी नाही ह्याची खात्री करतच धनेशने फोन उचलला.

धनेश - " हा..बोल रंगा..कैसा है? सब ठिक ना? "

रंगा - " हा ...सब ठिक है। वो परसो जो बात हुई उसी के बारे में थोडी बात करनी थी। it's important. Actually in the morning I was busy so cdnt talk to you in detailed. " 

धनेश - " yes.. I can understand. No problem But can't talk right now.I'm on my way to home.Can we talk after half an hour? "

रंगा - " Yeah.! ok .! see you.bye."

धनेशने रस्त्यात बोलणे मूद्दामच टाळले.

दोघेही घरी आले.धनेष कुणाशीही न बोलता डायरेक्ट आपल्या रूमवर पोहोचला. तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊन दार बंद करून लगेच त्याने फोन लावला….

धनेश - " हॅलोऽऽऽ….हा….अब बोल क्या हूवा ? "

रंगा - " हुवा कुछ नही।एक बात मै तुम्हे सुबह बोलना भूल गया इसलिए तुरंत कॉल किया। "

धनेश - " हाऽऽ,बोल ना। "

रंगा - " तूम जब वहाँ जाओगे तो एक काम करना। तीन अलग अलग टाईप के कॉम्बीनेशन बनाकर ले जाना।

1)फ्लास्क नंबर वन - तापवून रूम टेंपरेचरला आलेले दूध.(Boiled milk but shd be in moderate temperature.)

2) फ्लास्क नंबर टू - तापवलेले परंतू पुर्णपणे थंडगार झालेले दूध.(Boiled but totally cold milk.)

3)फ्लास्क नंबर थ्री - कच्चे/निरसे, न तापवलेले दूध (Raw milk)

साथ मे सोडीयम क्लोराईड अलग से ले जा। एक टी स्पून एक फ़्लास्क मे अच्छे से मिलाकर तुरंत उपयोग करना। जादा देर तक नमक दूध मे मिलाकर रखा तो मिल्क बेकार हो जाएगा ये याद रखना।Be Careful… गूड लक ब्रो…!! "

धनेशने त्याच्या सर्व इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे जगदाळेंना काटकोर सूचना देऊन हव्या त्या साहित्याची सगळी तयारी करायला सांगितले.

     ~~~~~~~~~~~~~~~~~

हळूहळू अंधार पडायला सूरवात झाली तसतसे जगदाळेंच्या मनात चिंतेचे सावट पसरायला सूरवात झाली.हे काम तसे खूपच जोखमीचे होतो.इकडे जीवाची पैज होती.दुर्दैवाने काही उलट सूलट घडले तर डायरेक्ट यमसदनाचीच वाट होती.मनातल्या विचारांना मनातच थोपवत जगदाळे त्याच भोलेनाथाला साकडे घालू लागले.आमच्या कार्यात आम्हाला यश दे देवाऽऽ…! असा मनोमन धावा चाललेला.इकडे धनेशही जरासा टेन्स्ड होताच पण आपणच हातपाय गाळले तर जगदाळेंना कोण धीर देणार म्हणून तो शांत रहायचा प्रयत्न करू लागला.

रात्र झाली.जेवणे उरकली.आता रात्रीचे बारा वाजायची वाट होती.

हे मधले दोन तीन तास जास्त जीवघेणे होते.मागील वेळेसारखीच ह्याही वेळी सर्व जय्यत तयारी करून दोघेही निघायला सज्ज झाले.

घड्याळ्याने बाराचे ठोके दिले तसे दोघेही वाकळ पांघरून सावधगिरी बाळगत आजूबाजूचा अंदाज घेत मंदिराकडे निघाले.

निर्जन रस्त्याने रातकिड्यांची किर्रऽऽ किर्रऽऽ त्या भयाण शांततेला अजूनच भयाण करत होती.

थोड्याच वेळात ते मंदिराजवळ पोहोचले.दोघेही लपत-छपत सभामंडप पार करून गर्भागाराच्या जाळी दरवाजाजवळ पोहोचले.जगदाळेंनी हळूच आवाज न होऊ देता कुलूप उघडले.ह्यावेळी मात्र धनेशने जगदाळेंनाही आपल्या सोबत आत घेतले.दोघांनी जाळी दरवाजा बंद करून आत प्रवेश केला.धनेशच्या ह्रदयाची धडधड अचानक वाढायला लागली.दोघांनीही सर्वात प्रथम नतमस्तक होऊन पिंडीला नमस्कार केला.ह्या कार्यात तुझे पाठबळ आमच्या सोबत असू दे असा आशीर्वाद मागतच धनेशने कामाला सूरवात केली.

सगळ्यात आधी गरम पण रूम टेंपरेचरला आलेल्या दूधाच्या फ्लास्कमधे रंगाने सांगीतले तेवढेच मीठ मिसळून व्यवस्थित हलवून सावधगिरीने ते दूध पिंडीच्या मधोमध असलेल्या त्या छिद्रावर बारीक धारेने सोडायला सूरवात केली.पूर्ण फ्लास्क रिकामा झाला पण कुठलाच परीणाम झाला नाही. नाही म्हणायला मन थोडे खट्टू झाले पण ह्यावेळी अजून दोन कॉम्बिनेशन्स त्यांच्याकडे ऑप्शन्समधे शिल्लक होते.मनातल्या मनात देवाचा धावा करत धनेशने दूसरा फ्लास्क ज्यात गरम करून पूर्ण गार झालेले दूध घेतले. सारख्याच क्वान्टीटीत मीठ मिसळून तेही पिंडीवर ओतले.तरीही काहीच घडले नाही.आता धनेशच्या मनातही शंकांची भूते नाचायला लागली.जर शेवटच्या फ्लास्कनेही काहीच परीणाम साधला नाही तरऽऽ ???!!! तर काय करायचे.??

तिसरा फ्लास्क हाती घेण्याआधी धनेश शांतपणे तिकडेच डोळे मिटून बसला.मनोमन देवाची प्रार्थना केली….. जर ह्या वाईट शापातून ही वास्तू मूक्त व्हावी असे तूलाही वाटत असेल तर

मला यश दे देवा...कृपा करून मला मार्ग दाखव."

मनातली प्रार्थना संपवून एक दीर्घ श्वास घेत धनेशने तिसरा फ्लास्क ज्यात कच्चे निरसे दूध होते तो घेतला.तितक्याच प्रमाणात मीठ मिसळून व्यवस्थित हलवून पून्हा देवाला नमस्कार करून ते दूध त्याने संथ गतीने पिंडीच्या त्या छिद्रात सोडायला सूरवात केली….अर्धा फ्लास्क दूध पोटात गेले आणि काय आश्चर्य….!!

महादेवाची ती महाकाय शाळूंका मोठा आवाज करत दोन भागात वेगळी झाली.जगदाळे आणि धनेश तो नजारा थक्क होऊन पहात राहीले.ही गोष्ट कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हती.अखेरीस पेनड्राईव्ह मधे जसे दिसले तसेच सगळे घडवून आणण्यात त्याला यश मिळाले होते.त्यांचे प्रयत्न फळद्रूप झालेले बघून दोघांनी एकमेकांना गच्च मिठी मारून आनंद व्यक्त केला.

इथवर तर यश मिळाले पण अजूनही एक अडथळा होताच..

ती शाळूंका दोन भागात विभाजीत होऊन एखादी पेटी उघडावी तशी उघडली तर गेली पण आतल्या बाजूला अजून एक शीळा होती.अजून एक छूपा दरवाजाच म्हणा नाऽऽ… पण ते उघडण्याची कुठलीही कळ किंवा बटन काहीही आजूबाजूला दिसत नव्हते.आणि व्हीडीओमधेही हया दगडी शीळारूपी दरवाजाला कसे उघडायचे ह्याचा कुठलाच क्लू दिसला नव्हता. म्हणजे इतके करूनही पूढे जायचा रस्ता अजूनही बंदच होता.सगळे मूसळ केरात अशीच गत झालेली.काय करावे धनेशला सूचेना.पण एक मात्र होते निंबाळकरांच्या डायरीप्रमाणे

जेव्हा ते लोक मधला दरवाजा बंद करून आत गेले त्यानंतर दार आतून बंद असूनही गाभाऱ्यात कोणीच नव्हते.ह्याचाच अर्थ ह्या दूसऱ्या शीळेला उघडायची कळही इथेच कुठेतरी असली पाहिजे.मग जगदाळे आणि धनेशने गाभाऱ्याचा कोपरान् कोपरा नीट तपासायला सूरवात केली.पण कुठेच काही विशेष सापडले नाही.गाभाऱ्यात लटकणारा लामणदिवा दिसल्यावर धनेशने त्या दिव्याची साखळीही ओढून पाहीली पण तिथेही अपयश.

अचानक जगदाळेंची नजर समोरच्या कोनाड्यातल्या एका दगडी मूर्तीवर पडली.तेल पिऊन पिऊन ती चिकट झालेली होती.

शंकराच्या मंदिरात ह्या मूर्तीवर इतके तेल का आेतलेय? 

ही शनिची तर मूर्ती नाही ना?

पण शंकराच्या मंदिरातल्या कोनाड्यात नियमानूसार देवी पार्वतीची मूर्ती असते मग ही मूर्ती कसली??

 ते उत्सुकतेने मूर्तीचे निरीक्षण करू लागले.

ती मूर्ती कुठल्यातरी देवतेचीच होती हे तिच्या अंगावर कोरलेल्या कपडे आणि आभूषणांच्या नक्षीकामातून स्पष्ट दिसत होते.

पण मग ह्या पार्वतीच्या मूर्तीला इतका तैलाभिषेक कशासाठी?

 हा विचार काही त्यांच्या डोक्यातून जाईना.

त्यांनी त्या मूर्तीला स्पर्श करून मागे पूढे हात लावून बघायला गेले.कसा काेण जाणे ती मूर्ती थोडी हलवली की हलतेय हे त्यांच्या लक्षात आले.

मग ही मूर्तीच तर कळ नसेल!!! 

त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.इतके केलेय तर ही मूर्तीही हलवून पाहू म्हणून हळूहळू जोर देत त्यांनी ती मूर्ती आधी घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने फिरवली पण म्हणावा असा कुठलाच परीणाम दिसला नाही मग हळूहळू त्यांनी मूर्ती विरूद्ध दिशेने फिरवायला सूरवात केली आणि काय चमत्कार…!! जसजशी मूर्ती अँटीक्लॉकवाईज डिरेक्शनने फिरवली जाऊ लागली ती शीळा फटकन आवाज होऊन बाजूला झाली.

धनेश आणि जगदाळे विस्फारल्या नजरेने त्या उघडलेल्या दरवाजाकडे पाहू लागले.ती शीळा वर सरकून आत काही दगडी पायऱ्या खालच्या दिशेने जाताना दिसत होत्या.

हे एक मोठे गूढच त्यांच्यासमोर उलगडताना दिसत होते.जणू काही पूढच्या यशाचाच मार्ग त्यांच्यापूढे खूला झाला होता पण पूढे किर्रऽऽ काळोख.डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका अंधार होता.

कदाचित दरवाज्यातून खाली जाताना सुरक्षा कवच म्हणून काही विषारी सर्प वगैरे सोडलेले असण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.

कारण पूर्वी अशा धनसाठा किंवा खजिना दडवलेल्या जागी विषारी सर्प रक्षणाकरता सोडल्याचे ऐकिवात होते.त्यात जर आत प्रवेश केल्या बरोबर परतीची वाट बंद झाली तर बाहेर यायचे सगळेच मार्ग बंद होतील आणि आत फक्त गुदमरून जीव जाणे हेच प्राक्तन ठरले असते.त्यामूळे उगीच रिस्क घेऊन विना नियोजन कुठलेही धाडस करायचा बेत रद्द करून प्रॉपर प्लॅनिंग करून आत प्रवेश करायचा असे दोघांनी संगनमताने ठरवले.

हे सगळे होईपर्यंत दोन अडीच तास उलटून गेले होते.म्हणजे साधारण अडीच तीनची वेळ होत आलेली.ह्याहून जास्त वेळ त्या परीसरात रहाणे धोकादायक होते.कुठल्याही क्षणी पूजारी रोजची पूजा करायला येण्याची चिन्हे होती.त्याला गाभाऱ्यात कूणीतरी चोरप्रवेश केलाय ह्याचा पुसटसा संशयही यायला नको होता.म्हणून दोघांनीही सगळ्या गोष्टी पूर्ववत करत परतीच्या वाटेने जायला निघाले.घरी जाऊन पून्हा त्यांना रोजच्या दर्शनासाठीही यायचेच होते.

आता धनेशच्या मनात एक नविनच प्लॅन शिजत होता परंतु त्यासाठी जगदाळेंशी चर्चा करणे आवश्यक होते…..!!!

~~~~~~~~~~(क्रमश:17)~~~~~~~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.

काय होता तो प्लॅन?

जगदाळे त्या प्लॅनमधे धनेशची मदत करायला तयार होतील का…?

हे सगळे जाणून घ्यायला वाचत रहा ' द सिक्रेट मिशन '

आजचा भाग कसा वाटला? हे कमेंट द्वारे जरूर कळवा..

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.

माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद

@राधिका.

 

🎭 Series Post

View all